नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या
1,759.71 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास मुख्यमंत्र्यांची मंजुरी
- प्राधिकरणाच्या दुसऱ्या बैठकीत सादर झाला 2018-19चा अर्थसंकल्प
- रिंग रोडकचऱ्यापासून इंधनविविध तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी तरतूद
- प्राधिकरणाच्या 188 पदांच्या आकृती बंधास मंजुरी

मुंबईदि. 26 : नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या सन 2018-19 च्या 1,759.71 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीस मंजुरी देण्यात आली. या वर्षात रिंग रोड जंक्शनवर लॉजिस्टिक पार्क उभारणेविभागीय कार्यालयांची स्थापनाकचऱ्यापासून इंधन तयार करण्याचा प्रकल्प उभारणेमहानगर क्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरे उपलब्ध करून देणेकामठी रोडवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेंशन सेंटर उभारणेस्वदेश योजनेअंतर्गत दीक्षाभूमी व ड्रॅगन पॅलेसचा विकासश्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान तीर्थस्थळाचा विकास आदी प्रकल्पांसाठी तरतूद करण्यात आली आहे. याचबरोबर फुटाळा तलाव परिसराचे सुशोभिकरण करणेअनधिकृत बांधकामे नियमित करून घेण्यास मुदतवाढ देणे आदी विविध विषयांनाही या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
यावेळी नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेजिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निशा सावरकरमहापौर नंदा जिचकारआमदार सर्वश्री सुधाकर देशमुखविकास कुंभारेसुधाकर कोहळे,डॉ. मिलिंद मानेसमीर मेघेगिरीश व्यासमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशीनगर विकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीरनागपूर महानगरप्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त दिपक म्हैसेकरनागपूर महानगरपालिकेचे आयुक्त अश्विन मुद्गल आदी यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेनागपूर महानगर विकास प्राधिकरणाने आपल्या क्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत किमान 1 लाख घरे बांधण्याचे नियोजन करावे. तसेच या क्षेत्रातील आरक्षित भूखंडावर लक्ष ठेवण्यासाठी MRSAC ची मदत घेऊन यंत्रणा उभी करावी. तसेच या भूखंडांवरील अनधिकृत बांधकामे रोखण्यासाठी अधिकाऱ्यांना जबाबदारी द्यावी.
प्राधिकरणाने आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात सुधार योजनेतील विविध विकास कामे (70 कोटी),  रस्ते व पूलांची कामे (40 कोटी)सांडपाणी व्यवस्थापन (10 कोटी)फुटाळा तलाव येथे संगीत कारंजे व अंबाझरी उद्यान येथे मल्टिमीडिया शो उभारणे (30 कोटी)शासकीय व प्राधिकरणाच्या सहयोगाने श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानकोराडी तीर्थस्थळाचा विकास (122 कोटी),प्राधिकरणाच्या तरतुदीतून  श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानचा विकासासाठी (26 कोटी)चिंचोली येथील शांतीवनमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैयक्तिक वापराच्या वस्तूचे जतन व संवर्धनासाठी संग्रहालयाच्या आधुनिकीकरण करणे (28.25 कोटी)स्वदेश योजनेअंतर्गत दीक्षाभूमी व ड्रॅगन पॅलेसचा विकास (30 कोटी)ड्रॅगन पॅलेस परिसरात मूलभूत सुविधा उभारणे (20 कोटी)अल्प उत्पन्न गटासाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घर बांधणी (700 कोटी)उत्तर नागपूरमधील कामठी रोडवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेंशन सेंटर उभारणे (89.64 कोटी) आदी विविध विकास कामांसाठी तरतूद करण्यात आली आहे.
            अर्थसंकल्पाशिवाय नागपूर महानगर क्षेत्राअंतर्गत खडका-किरमीटी-शिवमडकासुमठाणा-पांजरी आणि सुमठाणा ते परसोडी या दोन योजनांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत वाकीआदासाधापेवाडापारडसिंगाछोटा ताजबागतेलंगखेडीगिरडा या धार्मिक सर्किट अंतर्गत तीर्थक्षेत्र विकास प्रकल्पांच्या कामांना मंजुरी देण्यात आली. फुटाळा तलाव येथे संगीत कारंजेलाईट साऊंड व लेझर शो तसेच अंबाझरी उद्यान येथे स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित लाईट व साउंड व लेझर मल्टिमीडिया शो उभारण्यासही मंजुरी देण्यात आली. महानगर क्षेत्रातील बिना मंजुरी उभारण्यात आलेल्या भूखंड/अभिन्यास/बांधकामे यांना प्रशमन संरचना म्हणून घोषित करण्यासाठी अर्ज स्विकारण्याची मुदत 31 ऑक्टोबर 2018 पर्यंत वाढविण्यासही यावेळी मंजुरी देण्यात आली. तसेच प्राधिकरणाच्या 188 पदांच्या आकृतीबंधास यावेळी मंजुरी देण्यात आली.
००००

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती