Monday, March 26, 2018

कस्तुरचंद पार्कच्या विविध विकासकामांचे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन

नागपूर दि.25: नागपूर महानगरपालिका व सोलर इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेडनागपूर यांच्या सहकार्याने कस्तुरचंद पार्क येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध जनसुविधांच्या कामांचे भूमिपूजन  करण्यात आले.
        यावेळी अध्यक्षस्थानी केंद्रीय रस्ते वाहतूक व जलसंपदा मंत्री नितीन गडकरीपालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेमहापौर नंदाताई जिचकारआमदार सुधाकर देशमुखसोलर इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेडचे चेअरमन सत्यनारायण नुवालमनपाचे सत्तापक्ष नेते संदीप जोशीविरोधी पक्षनेते तानाजी वनवेमहानगर पालिका आयुक्त अश्विन मुदगल यांची प्रमुख उपस्थिती होती.
      नागपूर महानगर पालिका व सोलर इंडिया लिमीटेड यांच्या सहकार्यातून येथील जनतेला ऐतिहासिक कस्तुरचंद पार्क येथे विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीकोनातून जॉगींगवॉकींगसायकल ट्रँकवृक्षलागवडहिरवळनिर्मिती करण्याचे काम हाती घेण्यात आले आहेयाच ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलेतसेच जनसुविधांच्या कामाचे कोनशिला अनावरणही करण्यात आले.
     यावेळी मान्यवरांनी सोलर इंडिया लिमीटेड कंपनी यांनी करावयाच्या कामाचे संकल्पचित्र आणि चित्रफितीची पाहणी केली.
    यामध्ये अशोक स्तंभ व सेल्फी पॉईंटविविध कंपन्यांकडून आय लव्ह नागपूरचा लोगो बनविण्यात येणार आहेपावसाच्या पाण्याचे पुर्नभरणमेट्रो स्टेशन वॉल आदि कामे याअंतर्गत होणार आहेत

००००

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...