कामे मनरेगाची शाश्वत विकासाची
समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेच्या चित्ररथाचा शुभारंभ

अमरावती, दि. 19 : ‘मनरेगा’अंतर्गत समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेबाबत जनजागृती करण्यासाठी दोन चित्ररथांचा शुभारंभ जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून आज जिल्हाधिकारी कार्यालयात झाला.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, रोहयो उपजिल्हाधिकारी डी. आर. काळे यांच्यासह अनेक अधिकारी- कर्मचारी यावेळी उपस्थित होते. या चित्ररथांद्वारे जिल्ह्यात विविध ठिकाणी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील  11  कलमी कार्यक्रमाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. 
‘मनरेगा’तून रोजगारनिर्मितीबरोबरच भरीव व शाश्वत विकासाची कामे व्हावीत, असा योजनेचा उद्देश आहे. 11 कलमी कार्यक्रमात अहिल्यादेवी सिंचन विहीर, अंकुर रोपवाटिका, निर्मल शोषखड्डा, कल्पवृक्ष फळबाग लागवड, भू-संजीवनी व्हर्मी कंपोस्टिंग, समृद्ध ग्राम योजना, निर्मल शौचालय, समृद्ध गावतलाव, नंदनवन वृक्ष लागवड, अमृतकुंड शेततळे, भू- संजीवनी नाडेप कंपोस्टिंग आदी उपक्रमांचा समावेश आहे.  नरेगा योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामपंचायत, पंचायत समिती, तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा नरेगा विनामूल्य मदत वाहिनी (टोल फ्री क्रमांक) 1800-22-3839 ही सेवाही उपलब्ध आहे.

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती