जिल्हा कृषी महोत्सवाचा समारोप
समृद्ध शेतीसाठी नैसर्गिक संसाधनांचा वापर व्हावा   
 -         डॉ. नंदकुमार चिखले
अमरावती, दि. 21 : रासायनिक खते व कीटकनाशकांचा अतिरेक मानवी आरोग्यासह शेतीलाही हानीकारक असतो. त्यामुळे शेतक-यांनी अधिकाधिक नैसर्गिक संसाधनांचा वापर करावा. या पार्श्वभूमीवर अनेक बचत गटांच्या माध्यमातून स्थानिक सेंद्रिय उत्पादनांचा जिल्हा कृषी महोत्सवातील समावेश महत्वपूर्ण आहे, असे श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नंदकुमार चिखले यांनी येथे सांगितले.
कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने सायन्सकोर मैदानावर आयोजित जिल्हा कृषी महोत्सवाचा समारोप आज झाला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी अनिल खर्चान, ‘आत्मा’चे अंबादास मिसाळ, ‘एमएआयडीसी’चे विभागीय व्यवस्थापक सत्यजीत ठोसरे, उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शशांक देशमुख, डॉ. अनिल ठाकरे, कृषी विज्ञान केंद्राचे श्री. दाबके, तंत्रज्ञान व्यवस्थापक ज्ञानेश्वर नवले, ‘स्मार्ट आत्मा’ या संस्थेचे डॉ. मंगेश देशमुख,  वसुंधरा मित्र मंडळाचे श्री. आंबेकर आदी उपस्थित होते.
डॉ. चिखले म्हणाले की, नैसर्गिक संसाधनांच्या अधिकाधिक वापरामुळे सेंद्रिय उत्पादन तर मिळतेच शिवाय खर्चातही बचत होते. त्यामुळे रासायनिक खते, कीटकनाशकांचा अतिरेक टाळून नैसर्गिक संसाधनांच्या वापराकडे वळले पाहिजे. अमरावती जिल्ह्यात मोठे संत्रा उत्पादन पाहता संत्रा प्रक्रिया उद्योगांची संख्या वाढण्याची गरज असल्याचे श्री. दाबके यांनी सांगितले. स्मार्ट आत्मा संस्थेतर्फे मोझरी येथे गुरुकुंज आश्रमात 25 मार्चला शेतक-यांसाठी मार्गदर्शनपर शिबिर आयोजित केले असून, त्याला शेतकरी बांधवांनी प्रतिसाद देण्याचे आवाहन डॉ. देशमुख यांनी केले.  श्री. मिसाळ यांनी आभार मानले. वरिष्ठ सहायक प्राजक्ता राऊत यांनी सूत्रसंचालन केले.
 प्रयोगशील शेतकरी व विविध संस्थांचा यावेळी गौरव करण्यात आला. परंपरागत कृषी विकास योजनेतही विविध गटांना यावेळी गौरविण्यात आले.  
अमरावती तालुक्यातील पिंपरी गावाचे माऊली सेंद्रीय शेतमाल उत्पादक संघ, देवरा गावाचे राष्ट्रसंत सेंद्रीय शेतमाल उत्पादक संघ, भातकुली तालुक्यातील भालसीचे श्री. भोलेश्वर सेंद्रीय शेतकरी गट, उत्तमसराचे महात्मा फुले सेंद्रीय शेतकरी गट, नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील बेलोरा गावाचे श्री. छत्रपती सेंद्रीय शेती उत्पादक गट, बोपी गावचे पंजाबराव देशमुख सेंद्रीय शेती उत्पादक गट, अजनी गावचे कृषिमित्र सेंद्रीय शेती उत्पादक गट, धामणगाव रेल्वे तालुक्यातील भिल्ली गावचे सात्विक सेंद्रीय शेती गट, शेंदुर्जना येथील कृषी दर्शन गट, तरोडा येथील जय हनुमान गट, चांदूर रेल्वे तालुक्यातील आमला विश्वरचे विश्वेसर गट, निमलाचे श्री. संत एकनाथ महाराज गट, मोर्शी तालुक्यातील अंबाड्याचे जनमत गट, उदखेडचे सहयोग गट, वरुड तालुक्यातील जरुडचे जरुड गट, बेनोड्याचे कृषी मित्र गट, तिवसा तालुक्यातील रघुनाथपुरचे वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गट, धोत्राचे मानीकग्राम गट, चांदूर बाजार तालुक्यातील शिरजगाव कसबाचे विदर्भ गट, देऊरवाड्याचे नृहसिंह-गंगामाई गट, अचलपूर तालुक्यातील पांढरीचे पांढरी सेंद्रीय गट, वाढोणाचे गजानन गट, सावळापूरचे सावळापूर सेंद्रीय गट, अंजनगाव सुर्जी तालुक्यातील सातेगावचे शिवार गट, चिंचोली शिंगणी मा भवानी गट, दर्यापूर तालुक्यातील धामोडीचे डॉ.पंजाबराव देशमुख गट, हिंगणी. नि. चे संत गाडगेबाबा गट, चिखलदरा तालुक्यातील बदनापूरचे आदिवासी राधाकृष्ण गट, वस्तापूरचे माऊली गट, भामादेवी-डोमाचे मेळघाट कृषक मित्र गट, मेहरीअमचे शिवकृपा गट, धारणी तालुक्यातील हरीसालचे आदिवासी सेंद्रीय शेतकरी गट.  
                  
सेंद्रिय उत्पादनांची मोठी विक्री
जिल्ह्यातील काळ्या कसदार मातीत उत्पादित तूर डाळ, हळद, गूळ आदी सेंद्रिय उत्पादनांना बचत गटांच्या विविध कक्षांतून मोठी मागणी होती. कृष्णा शेतकरी ग्रुपच्या एकाच कक्षातून हळद, मटकी, तीळ आदी उत्पादनांची साडेतीन लाख रुपयांची विक्री झाल्याचे राजेश चोपडे यांनी सांगितले.
     
00000




Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती