कृती दलामार्फत कोयना प्रकल्पग्रस्तांच्या
ऊर्वरित समस्या तत्काळ सोडवाव्यात
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबईदि. 19 : कोयना प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कृती दलाची (टास्क फोर्स) स्थापना करून प्रकल्पग्रस्तांच्या ऊर्वरित प्रश्नांचा तत्काळ निपटारा करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.
            कोयना धरण प्रकल्पग्रस्तांच्या समस्यासंदर्भात आज विधानमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले.
            प्रकल्पग्रस्तांच्या समस्या दूर करण्यासाठी वॉररुम स्थापन करणेप्रकल्पग्रस्तांना पडिक जमिनी ऐवजी पर्यायी चांगली जमिन देणेनोकरीत प्राधान्य देणेप्रकल्पग्रस्तांना पाणी व विजपुरवठा करणेतसेच धरणाच्या परिसरातील गावांमध्ये पर्यटनासाठी बोटींग सुरू करण्याची परवानगी देणेपर्यावरण विकास आराखडा राबविणेपायाभूत सुविधा देणे आदी विविध विषयांवर यावेळी सविस्तर चर्चा झाली.
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने येत्या तीन महिन्यात प्रकल्पग्रस्तांची माहिती गोळा करून, किती गावांतील नागरिकांची याबाबत माहिती जमा करण्याची राहिली आहे याचा अहवाल देण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.
यावेळी महसूलमदत व पुर्नवसन मंत्री चंद्रकांत पाटीलराज्यमंत्री विजय शिवतारेदिलीप कांबळेखासदार छत्रपती उदयनराजे भोसलेआमदार शंभूराजे देसाईमंदा म्हात्रेमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशीमदत व पुनर्वसन विभागाच्या अपर मुख्य सचिव मेधा गाडगीळऊर्जा विभागाचे प्रधान सचिव अरविंद सिंहपुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवीसाताऱ्याच्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघलसांगलीचे जिल्हाधिकारी विजय काळमसाताऱ्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदेप्रकल्पग्रस्त कृती समितीचे भारत पाटणकर यांच्यासह विविध पदाधिकारीअधिकारी यावेळी उपस्थित होते.
००००

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती