अर्थसंकल्पीय अधिवेशनात 20 विधेयके मंजूर
शेतकऱ्यांना दिलासा देणारे महत्वपूर्ण निर्णय
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 28 : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भूसंपादन, हुक्काबारचे कायद्याद्वारे नियमन यासारखे 20 महत्वपूर्ण विधेयक दोन्ही सभागृहामध्ये मंजूर करण्यात आले. अर्थमंत्र्यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाचे समाजाच्या सर्वच क्षेत्रातून स्वागत करण्यात आले, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा समारोपानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग मंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री दिवाकर रावते, संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट उपस्थित होते.
मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, अर्थमंत्र्यांनी पुरोगामी अर्थसंकल्प मांडला. कृषी, पायाभूत सुविधा, जलसिंचन यासह विविध क्षेत्रात भरीव तरतूद करण्यात आली. त्यामुळे समाजाच्या सर्वच क्षेत्रातून या अर्थसंकल्पाचे स्वागत करण्यात आले. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. दुष्काळ, गारपीट, बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने मदत देण्यात आले. बोंडअळीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्य शासनाच्या निधीतून तातडीने मदत करण्यात आली.
या अधिवेशनात 31 विधेयके विचारात घेण्यात आली होती. त्यापैकी दोन्ही सभागृहात 20 विधेयके मंजूर करण्यात आली. त्यातील भूसंपादनाचे विधेयक महत्वाचे असून यामुळे केंद्र शासनाच्या कायद्यानुसार भूसंपादनाचा मोबदला देण्यात येणार आहे. त्यामुळे विविध प्रकल्प मार्गी लागतील. असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. प्लास्टिक बंदीबाबत देखील महत्वपूर्ण निर्णय या काळात घेण्यात आला.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात संमत झालेली विधेयके अशी
(१)               सन 2018 चे विधान सभा विधेयक क्र. 6.- महाराष्ट्र (पुरवणी) विनियोजन विधेयक, 2018 (वित्त विभाग)  (सन 2017-2018 या वित्तीय  वर्षाकरिता आणखी पुरवणी मागण्या) (पुर:स्थापित व दोन्ही सभागृहात संमत दि. 07.03.2018)
(२)               सन २०१8 चे विधानसभा विधेयक क्र. 3. महाराष्ट्र ग्रामपंचायत (सुधारणा) विधेयक2018 (ग्रामविकास विभाग)    (ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास सहा महिन्याची मुदत देणेबाबत)(अध्यादेश क्रमांक 5/2018 चे रूपांतर), पुर:स्थापित दि. 27.02.2018 विधान सभेत विचारार्थ दि. 01/05/06/07/08.03.2018 विधान सभेत संमत 08.03.2018- विधान परिषदेत विचारार्थ दि. 09/13/14/15.03.2018 विधान परिषदेत संमत दि. 15.03.2018).
(३)               सन २०१8 चे विधानसभा विधेयक क्र.1 .- पंढरपूर मंदिरे (सुधारणा) विधेयक, 2018 (विधि व न्याय विभाग) (मंदिरे समितीच्या कामकाजाचे प्रभावीपणे पार पडण्यासाठी तिला सल्ला देणारी एक सल्लागार परिषद गठित करणे.) (अध्यादेश क्रमांक 3/2018 चे रूपांतर) पुर्नस्थापित 27.02.२०१८.  विधान सभेत विचारार्थ  दि. 28.02.2018-01/05/06/07.03.2018 - विधान सभेत संमत दि. 07.03.2018 विधान परिषदेत विचारार्थ दि. 08/09/13/14/15/16/19.03.2018 विधान परिषदेत संमत19.03.2018.)
(४)               सन २०१8 चे विधानसभा विधेयक क्र.11- महाराष्ट्र महानगरपालिका व महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) विधेयक, 2018 (नगरविकास विभाग) (निवडणुकीमध्ये जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास सहा महिन्याची मुदत देणेबाबत) (पुर:स्थापित दि. 15.03.2018) ( विधान सभेत विचारार्थ दि. 19.03.2018 विधान सभेत संमत19.03.2018- विधान परिषदेत विचारार्थ दि. 20.03.2018 विधान परिषदेत संमत दि. 20.03.2018)
(५)               सन २०१8 चे विधानसभा विधेयक क्र. 5 .-  महाराष्ट्र वेश्म मालकी (सुधारणा) विधेयक, 2018, (गृहनिर्माण विभाग) (इमारत पुन: बांधकाम/पुन:विकासासाठी बहुसंख्य वेश्म मालकांची परवानगीबाबत) (पुर:स्थापित) दि. 01.03.2018 - विधान सभेत विचारार्थ दि.05/06/07/08.03.2018 - विधान सभेत संमत - विधान परिषदेत विचारार्थ दि. 09/13/14/15/16/19/20.03.2018-विधान परिषदेत संमत दि. 20.03.2018)
(६)               सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक 12. - विद्युत (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, 2018 (पुर:स्थापनार्थ दि. 19.03.2018) (विद्युत कंपन्यांच्या सेवकांना लोकसेवका सारखे संरक्षण देणे) विधान सभेत संमत दि. 20.03.2018) (विधान परिषदेत विचारार्थ दि. 22.03.2018(विधान परिषदेत संमत दि. 22.03.2018)
(७)               सन २०१8 चे विधानसभा विधेयक क्र. 2 .- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नागरी (सुधारणा) विधेयक, 2018  (नगर विकास विभाग) - (नगरपंचायतीच्या अध्यक्षास काढुन टाकण्याची तरतूद करणे,  वित्तीय स्वेच्छा अधिकार प्रदान करणे. मुख्याधिकाऱ्याची जबाबदारी निश्चित करणे, त्याच्या कर्तव्यांमध्ये व जबाबदाऱ्यांमध्ये सुस्पष्टता आणणे)(अध्यादेश क्रमांक 4/2018 चे रूपांतर) पुर्नस्थापित 27.02.२०१८विधन सभेत विचारार्थ दि. 28.02.2018. - 01/05/06/07.03.2018 विधान सभेत संमत दि. 07.03.2018 विधान परिषदेत विचारार्थ दि. 09/13/14/15/16/19/20/21/22.03.2018- विधान परिषदेत संमत दि. 22.03.2018).
(८)               सन २०१8७ चे विधान सभा विधेयक क्र. 16.- महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (सुधारणा) विधेयक, 2018 (ग्रामविकास विभाग) (नवीन विधेयक) (निवडणुकीमध्ये जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास सहा महिन्याची मुदत देणेबाबत) (पुरःस्थापनार्थ दि. 21/22.03.2018विधान सभेत संमत दि.22.03.2018- विधान परिषदेत संमत दि. 23.03.2018)
(९)               सन 2018 चे विधानसभा विधेयक क्र 15.महाराष्ट्र  करविषयक कायदे (कर बसविणे, सुधारणा व विधिग्राह्यीकरण) विधेयक, 2018 (पुरःस्थापनार्थ दि. 21/22.03.2018) विचारार्थ दि.22/23.03.2018 विधानसभेत संमत दिनांक २३.०३.२०१८, विधान परिषदेत संमत दिनांक २३.०३.२०१८)
(१०)            सन 2018 चे विधानसभा विधेयक क्र 17.- महाराष्ट्र विनियोजन विधेयक, 2018 (वित्त विभाग)  (सन 2018-2019  या वित्तीय  वर्षाकरिता आणखी अर्थसंकल्पीय तरतुदी) (पुर:स्थापनार्थ व दोन्ही सभागृहात संमत दि. 23.03.2018)
(११)          सन २०१७ चे विधानसभा विधेयक  क्र 68.-महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) विधेयक, २०१७ (उच्च व तंत्र शिक्षण विभाग) (व्यवस्थापन परिषदेवर मागासवर्गीयांची निवड करावयाच्या पद्धतीत सुधारणा, विद्यापीठाचे विद्यापीठाची प्राधिकरणे स्थापन करण्याबाबत असलेल्या मुदतीत तात्पुरती वाढ,विद्यार्थी परिषद घटीत करण्याबाबत तात्पुरत्या तरतुदी, नवीन महाविद्यालय किंवा नवीन पाठ्यक्रम, विषय, विद्याशाखा, तुकडी  सुरु करण्यासाठीच्या परवानगी देण्याविषयी असलेल्या मुदतीमध्ये तात्पुरती सुधारणा,  विद्यापीठ अधिनियम अंमलात येणाच्या दिनांकास अस्तित्वात असलेली विद्यापीठांची विद्यमान प्राधिकरणे दि. 1 मार्च 2018 पर्यंत चालू राहतील यासाठी तरतुदी) (अध्यादेश क्रमांक  28  /2017 चे रूपांतर) पुर्नस्थापित ११.१२.२०१८ विधान संमत विधान परिषदेत विचारार्थ दि. 05/06/07/08/09/13/14/15/16/19/20.03.2018- विधान परिषदेत सुधारणांसह संमत दि. 20.03.2018-विधान सभेत- सुधारणांना सहमती दि. 23.03.2018)
(१२)          सन २०१८ चा महाराष्ट्र अध्यादेश  क्र.7-  भुमिसंपादन, पुर्नवसन व पुर्नवसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, 2018 (महसूल व वन विभाग) (राज्याच्या आर्थिक विकासाला आणखी गती मिळणेसाठी  भूसंपादनाच्या केंद्रीय अधिनियमातील तरतुदी योग्य अशा फेरफारांसह राज्य अधिनियमातील तरतुदी खालील भूसंपादनाच्या प्रक्रियेस लागू करणे)  (पुर:स्थापित दि. 09.03.2018 विधान सभेत विचारार्थ दि.  दि. 13/14/15/19/20/21/22.03.2018- विधान सभेत संमत दि. 22.03.2018- विधान परिषदेत संमत दि. 23.03.2018)
(१३)          सन 2018 चे विधानसभा विधेयक क्र 13.जी. एच. रायसोनी विद्यापीठ,  अमरावती, अधिनियम, 2018  (स्वयंअर्थसहायित विद्यापीठाची स्थापना करणे, त्याचे विधिसंस्थापन व विनियमन करणे). (पुर:स्थापित दि. 20.03.2018- विचारार्थ दि. 21/22/23/26.03.2018-विधान सभेत संमत दि. 26.03.2018- विधान परिषदेत संमत दि. 26.03.2018)
(१४)          सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्र.9-   महाराष्ट्र परिचारिका (सुधारणा) विधेयक, 2018 (वैद्यकीय शिक्षण विभाग) (महाराष्ट्र परिचारिका परिषदेच्या निवडणुका वेळे होण्याकरिता तसेच अशा निवडणुका होऊ न शकल्यास प्रशासकाच्या नियुक्तीबाबत एक सहायकतारी (enabling)   तरतूद करणे) पुर:स्थापनार्थ दि. 13.03.2018 -  पुर:स्थापित 14.03.2018 - विचारार्थ दि. 15/19/20/21/22.03.2018- विधान सभेत संमत दि. 22.03.2018- विधान परिषदेत विचारार्थ दि. 27.03.2018विधान परिषदेत संमत दि. 27.03.2018).
(१५)          सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्र 27. -छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ, पनवेल विधेयक २०१८ (स्वयंअर्थसहायित विद्यापीठाची स्थापना करणे, त्याचे विधिसंस्थापन व विनियमन करणे) (पुरःस्थापित दि. 26.03.2018- विचारार्थ दि. 27.03.2018- विधान सभेत संमत दि. 27.03.2018- विधान परिषदेत विचारार्थ दि. 28.03.2018विधान परिषदेत संमत दि. 28.03.2018)
(१६)          सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्र. 10-  महाराष्ट्र पायाभूत सुविधा विकास सक्षम प्राधिकरण विधेयक, 2018 (सार्वजनिक बांधकाम विभाग) (पायाभुत सुविधांच्या अंमलबजावणी करण्यासाठीच्या तरतुदी (Swiss Challenge पध्दती(अध्यादेश क्र. 7/2018 चे रूपांतर) (नविन विधेयक) (पुर:स्थापित 14.03.2018 -  विचारार्थ दि. 15/19/20/21/22/23.03.2018 विधानसभेत संमत दिनांक २३.०३.२०१८- विधान परिषदेत विचारार्थ दि. 26/27.03.2018).
(१७)          सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्र. 18-  मुंबई महानगरपालिका (सुधारणा) विधेयक, २०१८ (नगर विकास विभाग)  महानगरपालिका बाजारांत जनावरे, शोभिवंत किंवा विदेशी पक्ष्यांची आणि शोभिवंत व विदेशी माशांची (वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, 1972 या अन्वये किंवा त्या त्यावेळी अंमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्यान्वये प्रतिबंधित केलेली जनावरे, पक्षी आणि मासे वगळून) खरेदी व विक्री करण्यासाठी किंवा त्यांचा व्यापार करण्यासाठी तरतूद करणे. (पुर:स्थापित  दि. 23.03.2018- विचारार्थ दि. 27.03.2018- विधान सभेत संमत दि. 27.03.2018- विधान परिषदेत विचारार्थ दि. 28.03.2018)
(१८)          सन २०१८चे विधानसभा विधेयक क्र. 33 – श्री करवीर निवासीनी महालक्ष्मी (अंबाबाई) मंदिर (कोल्हापूर) विधेयक, २०१८ (पुरःस्थापित दि. 27.03.2018- विधान सभेत विचारार्थ व संमत दि. 28.03.2018- विधान परिषदेत विचारार्थ दि. 28.03.2018)
(१९)          सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्र 30.- सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने (जाहिरातीस प्रतिबंध आणि व्यापार व वाणिज्य व्यवहार आणि उत्पादन, पुरवठा व वितरण यांचे विनियमन) (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक,  २०१८ (हुक्काबारचे कायद्याद्वारे नियमन करणे). (पुरःस्थापित दि. 27.03.2018- विधान सभेत विचारार्थ व संमत दि. 28.03.2018-- विधान परिषदेत विचारार्थ दि. 28.03.2018)
(२०)          सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्र.28- महाराष्ट्र मोटार वाहन कर (सुधारणा) विधेयक, 2018 (मोटार सुरक्षा उपकर दिनांक २४ ऑक्टोबर २०१६ पासून भूतलक्षी प्रभावाने बसविण्याकरीता तरतुदी) ((पुरःस्थापित दि. 27.03.2018- विधान सभेत विचारार्थ व संमत दि. 28.03.2018- विधान परिषदेत विचारार्थ दि. 28.03.2018)
विधान सभेत प्रलंबित विधेयके

(१)               सन २०१७ चे विधानसभा विधेयक क्र. 64 .- महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन)  (दुसरी सुधारणा) विधेयक, 2017  राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने घ्यावयाच्या निवडणुकांकरिता नियम करण्यासाठीचा कालावधी वाढविणे व प्रशासकास किंवा प्रशासकीय मंडळास निवडणुका घेण्यासाठी कालावधी वाढवून देणे यांकरिता तरतूद करणे.(अध्यादेश क्रमांक 2०/2017 चे रूपांतर) (पणन विभाग) विधान सभेत विचारार्थ दि. 20/21/22/२३/26/27/28.03.2018)
(२)               सन २०१8 चे विधानसभा विधेयक क्र4 हैदराबाद अतियात चौकशी (सुधारणा) विधेयक, २०१८ (महसूल व वन विभाग) (खिदमतमाश जमिनींचा कालानुरूप वापर करणे शक्य व्हावे यासाठी हैदराबाद अनियात चौकशी अधिनियम, 1952 च्या कलम ६ मध्ये सुधारणा करणेबाबत).(अध्यादेश क्रमांक 6/2018 चे रूपांतर). पुर:स्थापित दि. 28.02.2018- विधान सभेत विचारार्थ दि. 01/05/06/07/08/09/13/14.03.2018)
(३)               सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्र 14.- महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ (सुधारणा) विधेयक, 2018 (जलसंधारण विभाग) (महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाच्या कामकाजामध्ये लोक सहभाग वाढविणे). ( पुर:स्थापित दि. 20.03.2018-विचारार्थ दि. 21/22/23/26/27/28.03.2018)
(४)               सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्र.26 -  महाराष्ट्र सहकारी संस्था (सुधारणा) विधेयक, 2018 (सहकारी संस्थाच्यां ज्या समित्यांची मुदती संपली आहे अशा समित्यांचे पदाधिकारी, निवडणुकीचा निकाल घोषित होईतोपर्यत किंवा प्रस्तावित अधिनियमाच्या प्रारंभाच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या कालावधी पर्यत यापैकी जे अगोदर घडेल तो पर्यत पद धारण करण्याचे चालू ठेवील अशी तरतूद  करणे.) (पुरःस्थापित दि. 26.03.2018) (विचारार्थ दि. 26/27/28.03.2018)
(५)               सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्र. 29 महाराष्ट्र (लोकसेवकांची) विसंगत प्रमाणातील मालमत्ता सरकारजमा करण्याबाबत विधेयक, 2018.(फौजदारीपात्र गैरवर्तनाचा अपराध केलेल्या  लोकसेवकांची मालमत्ता सरकारजमा करण्याकरिताआणि त्याच्याशी संबंधित किंवा तदानुषंगिक बाबीकरिता तरतूद करणे (पुरःस्थापित दि. 27.03.2018- विधान सभेत विचारार्थ दि. 28.03.2018)

(६)               सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्र.31- महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण (सुधारणा) विधेयक, 2018 (ठेवीदारांच्या  हितसंबंधाचे संरक्षण करण्याकरीता (Pre-emptive) कारवाई करणे शक्य व्हावे याकरीता तरतूद तसेच अधिनियमाच्या तरतुदींचे उल्लंघन केल्यास,  कारावासाच्या शिक्षेत दहा वर्षापर्यंत आणि द्रव्यदंड, हा पंचवीस लाख रुपयांपर्यंत असू शकेल इतका  वाढविण्याचे आणि तसेच अशी वित्तीय संस्था ही एक कोटी रुपयांपर्यंत असू शकेल, इतका द्रव्यदंड देण्यास पात्र ठरेल अशी तरतूद करणे.) (पुरःस्थापित दि. 27.03.2018- विधान सभेत विचारार्थ दि. 28.03.2018)
(७)               सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्र.32- महाराष्ट्र झोपडपट्टीगुंड, हातभट्टीवाले, औषधिद्रव्यविषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कलाकृतींचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती (व्हिडीओ पायरेट्स), वाळू तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणाऱ्या व्यक्ती, यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत (सुधारणा) विधेयक, 2018 (बेकायदेशीर जुगार व बेकायदेशीर लॉटरी चालविणाऱ्या आणि मानवी अपव्यापार करणा-या व्यक्तींना उक्त अधिनियमांच्या अधिकार कक्षेत आणणे). (पुरःस्थापित दि. 27.03.2018- विधान सभेत विचारार्थ दि. 28.03.2018)
विधान परिषदेत प्रलंबित

(१)               सन 2017 चे विधान सभा विधेयक क्र. 56.- महाराष्ट्र ग्रामपंचायत (सुधारणा) विधेयक, 2017 (सरपंचाची थेट निवडणुकीव्दारे निवड करणे) (अध्यादेश क्र. 18/2017 चे रूपांतर) (पुर:स्थापित दि. 10.08.2017)(विधानसभेने २०.१२.२0१7 रोजी सुधारणेसह संमत, विधानपरिषदेमध्ये २2.१२.२०१7 रोजी पुढील सुधारणेसह संमत) (ग्रामविकास विभाग)  विधान परिषदेने केलेल्या सुधारणांना सहमती देण्याकरिता तसेच अन्य सुधारणांकरिता दि. 08.03.2018 विधान सभेत संमत दि. 08.03.2018 - विधान परिषदेत विचारार्थ दि. 19/20/21/22/23/26/27.03.2018).
(२)               सन २०१७ चे विधान सभा विधेयक क्र. 72 .- महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (सुधारणा) विधेयक, 2017 (ग्रामविकास विभाग) (नवीन विधेयक) (वारंवार बोलाविण्यात आलेल्या जिल्हा परिषदेच्या विशेष बैठकांमुळे जिल्हा परिषदेच्या कामकाजावर होणारा विपरित परिणाम टाळण्याकरिता, अशी विशेष बैठक बोलाविण्यावर काही निर्बंध घालणे, अशी विशेष बैठक बोलाविण्यासाठी आवश्यक असलेली परिषद सदस्यांची संख्या एक - पंचमांशावरून दोन- पंचमांश एवढी वाढविणे, मागील बैठकीपासून साठ दिवसांच्या आत विशेष बैठक बोलाविण्यात येणार नाही आणि अशी विशेष बैठक बोलाविण्यासाठीची विनंती अध्यक्षाला मान्य करता येणे किंवा फेटाळता येणे अशी सुस्पष्ट तरतूद करणे) (अध्यादेश क्र. 21/2017 चे रूपांतर) (पुर:स्थापित दि. 18.12.2017) विचारार्थ दि. 21.12.2017 - विधान सभेत संमत दि. 21.12.2017 -  विधान परिषदेत विचारार्थ दि. 21/ 22.12.2017)
(३)               सन २०१8 चे विधानसभा विधेयक क्र. 8.-   महाराष्ट्र भूमिगत नळमार्ग व भूमिगत वाहिन्या उभारण्याबाबत (जमिनीवरील वापर हक्काचे संपादन) विधेयक, 2018 (महसूल व वन विभाग) (भूमिगत पाईपलाईन्स लोकोपयोगी सेवासुविधा पुरविण्यासाठी भूमिगत वाहिन्या, गटारे अशा प्रकल्पांकरिता लागणारी जमीन संपादित केली जाणार नसून केवळ त्याच्या वापराचे अधिकार शासनास प्राप्त होणार आहेत) (नविन विधेयक). पुर:स्थापनार्थ दि. 13.03.2018 -  पुर:स्थापित 14.03.2018 - विचारार्थ दि. 15/19/20.03.2018विधान सभेत संमत दि. 20.03.2018) विधान परिषदेत विचारार्थ दि.21/22/23/26/27.03.2018).
(४)               सन २०१७ चे विधानसभा विधेयक क्र. 71- महाराष्ट्र स्वयं- अर्थसहाय्यित शाळा (सुधारणा) विधेयक २०१७ (शालेय शिक्षण) - (कंपनीला स्वंयअर्थसहाय्यित शाळा स्थापण्यास परवानगी देण्याबाबत सहायकारी तरतूद करणे.) (नवीन विधेयक) (पुर:स्थापित दि. 18.12.2017) विचारार्थ दि. 21.12.2017 - विधान सभेत संमत दि. 20.12.2017, विधान परिषदेत विचारार्थ दि. 21/ 22.12.2017) विधान परिषदेत विचारार्थ दि. 01/05/06/07/08/09/13/14/15/16/19/20/21.03.2018)(विधान सभेत दुसऱ्यांदा संमत दि. २६.०३.२०१८- विधान परिषदेत चिचारार्थ दि. 27.03.2018)
-----000-----

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती