कर्करोगाचे त्वरित  अचूक निदान होणे गरजेचेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

                                               राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटलच्या नवीन अत्याधुनिक इमारतीचे भूमिपूजन
राज्य शासनातर्फे कर्करुग्णांच्या सेवेसाठी भरीव मदत

            नागपूरदि. 18 : विविध प्रकारच्या कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून कर्करोगाचे त्वरित  अचूक निदान होणे गरजेचे आहे. हॉस्पिटल  रिसर्च सेंटरसाठी राज्य शासनातर्फे भरीव मदत देण्यात येईलअशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस यांनी दिली.
कॅन्सर रिलिफ सोसायटी यांच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रादेशिक कॅन्सर हॉस्पिटल  रिसर्च सेंटरच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजनप्रसंगी मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी केंद्रिय परिवहन मंत्री नितीन गडकरी,पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेआमदार सर्वश्री सुधाकर कोहळेसुनिल केदारडॉ. मिलिंद मानेकॅन्सर रिलिफ सोसायटीचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त अनूप कुमारउपाध्यक्ष बसंतलाल सावसचिव अशोक कृपालिनीरणधीर जव्हेरी,आवतराम चावलासुरेश शर्माडॉ. मदन काफरेसंचालक डॉ. सुभ्रजीत दासगुप्तामहानगरपालिका आयुक्त अश्विन मुद्गलआरोग्य उपसंचालक डॉ. संजीव जयस्वाल आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेराष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी गरिबांबाबत संवेदना कायम जपल्या. याच शिकवणीच्या आधारावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रादेशिक कॅन्सर हॉस्पिटल  रिसर्च सेंटर ही संस्था मागील 45 वर्षांपासूनगरीब कर्करुग्णांची अविरत सेवा करीत आहे. विविध प्रकारच्या कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून यासाठी कर्करोगाचे त्वरित  अचूक निदान होणे गरजेचे असते. कर्करोगाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्य शासनाकडूनही विविधउपाययोजना करण्यात येत असून याअंतर्गत कर्करोगाच्या निदानासाठी मोहिमही राबविण्यात येत आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रादेशिक कॅन्सर हॉस्पिटल  रिसर्च सेंटरच्या नवीन इमारतीमध्ये कर्करुग्णांना सुविधा मिळतील. केंद्र  राज्य शासनामार्फत या रुग्णालयाला भरीव मदत करण्यात येईलअसेही श्री. फडणवीस यांनी सांगितले.
            श्री.गडकरी म्हणालेराष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रादेशिक कॅन्सर हॉस्पिटल  रिसर्च सेंटर आता नवीन रुपात उभारण्यात येणार आहे. दिवसेंदिवस विविध प्रकारच्या कर्करुग्णांची संख्या वाढत आहे. नागपूर येथे विदर्भासह छत्तीसगड,मध्यप्रदेश  अन्य राज्यातूनही कर्करोगावरील उपचारांसाठी रुग्ण मोठ्या प्रमाणात येत असतात. गरीब रुग्णांना माफक शुल्कात सेवासुविधा देण्यात याव्यात. कर्करोगाचे त्वरित  अचूक निदान व्हावे. या सेवा दर्जेदार असाव्यातअसेही श्री. गडकरीयांनी सांगितले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नवीन  अत्याधुनिक इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन करुन कोनशिलेचेअनावरण केले. यावेळी यावेळी कर्करोगाच्या निदान चाचणीसंदर्भातील माहितीपत्रकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
विदर्भ कॅन्सर सोसायटीचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी स्वागत केले. संचालक डॉ.दासगुप्ता यांनी प्रास्ताविकात सांगितले की, मध्य भारतातील कर्करुग्णांना अल्पदरात उपचार उपलब्ध व्हावेत या हेतूने राष्ट्रसंततुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटलतर्फे 1974 पासून कार्यरत आहे. या संस्थेच्या संशोधन  उपचार केंद्राच्या उभारणीसाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून भरीव निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. कर्करुग्णांसाठी 200 खाटांच्या रुग्णालयातसहा अत्याधुनिक मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर्सआयसोलेशन कक्षकेमोथेरपी कक्षखासगी वातानुकुलित कक्षअतिदक्षता विभागडॉयग्नोस्टिक्स ॲण्ड रेडिओलॉजी विभागस्टेट सीएसएसटी डे केअरडेंटल युनिट आणि आकस्मिक विभागतयार करण्यात येणार आहे. याशिवाय ऑन्को सर्जरीमेडिकल ऑन्कोलॉजीरेडिओथेरपीअनेस्थेशिया आणि पेन मॅनेजमेंट विभागाचे विस्तारीकरण करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी दिली.
यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संस्थान मोझरी येथील जनार्धन बोथेतसेच नागपूरसह विदर्भातून गुरुदेव सेवामंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0000



Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती