Posts

Showing posts from April, 2020

कोरोनाविरोधातील लढ्याला समाजातील दातृत्वाचे पाठबळ दात्यांचा मोठा प्रतिसाद दिलासा देणारा - पालकमंत्री यशोमती ठाकूर

Image
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना पाठबळ म्हणून समाजातील अनेक दाते समोर येत आहेत. या संकटकाळात दात्यांचा हा प्रतिसाद त्यांची संवेदनशील वृत्ती दर्शविणारा व दिलासा देणारा असल्याची प्रतिक्रिया राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे व्यक्त केली. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीच्या स्वतंत्र बँक खात्यात व्यक्ती व संस्थांनी योगदान देण्यासाठी आवाहन पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी केले होते. त्याला अनुसरून विविध दाते मदतीसाठी पुढे येत आहेत. त्यानुसार जिल्ह्यातून अद्यापपर्यंत एक कोटीहून अधिक रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्यात आली आहे. हे योगदान देणाऱ्या सर्वांचे पालकमंत्र्यांनी आभार मानले आहेत. ग्रामीण भागातून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मोठी मदत मिळत आहे. पार्डी येथील राहूलसिंह जाखड यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक लक्ष रूपयांचा धनादेश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्याकडे सुपुर्द केला. युवक काँग्रेसचे राजूभाऊ पिसे, पार्डी येथील मा

पालकमंत्र्यांकडून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पणन मंत्र्यांना पत्र तूरखरेदीची 1 महिना मुदत वाढवावी - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

Image
 कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने राज्यात संचारबंदी लागू आहे. त्यामुळे अनेक शेतकरी बांधव नाफेड खरेदी केंद्रावर पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे तूर खरेदीची मुदत 31 मेपर्यंत वाढविण्याची मागणी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे केली आहे. तसे निवेदन पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह संबंधित मंत्री महोदयांना पाठविले आहे. जिल्ह्यात तूर हे प्रमुख पीक असून, तूर उत्पादक शेतकरी बांधवांची संख्या मोठी आहे. कोरोना संकटामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून संचारबंदी लागू आहे. या कालावधीत अनेक शेतकरी बांधवांना नाफेडच्या खरेदी केंद्रावर पोहोचता येऊ शकले नाही. त्यामुळे तूर उत्पादक शेतकरी बांधवांची अडचण लक्षात घेऊन ही बाब पालकमंत्र्यांनी तत्काळ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पणन मंत्री व महसूल मंत्र्यांकडे निवेदन पाठवून व चर्चा करून त्यांच्या निदर्शनास आणून दिली. राज्यात नाफेडअंतर्गत तूर खरेदी करण्याची मुदत 30 एप्रिल

कोटा येथे अडकलेले अमरावतीचे 72 विद्यार्थी लवकरच परतणार स्वगृही पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या प्रयत्नांना यश

Image
             राजस्थानातील कोटा येथे अडकलेल्या अमरावती जिल्ह्यातील विद्यार्थी व पालकांना सुखरूप परत आणण्यासाठी पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी व प्रशासनाने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. पालकमंत्री व प्रशासनाच्या पाठपुराव्याने परिवहन विभागाकडून एसटी वाहनांची व्यवस्था करण्यात येत असून, जिल्ह्यातील एकूण 72 विद्यार्थी लवकरच कोटा येथून स्वगृही परतणार आहेत. आय.आय.टी. व मेडिकलच्या प्रवेश परीक्षेची तयारी करण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील विद्यार्थी राजस्थानमधील कोटा येथे गेले होते. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशात सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे ते विद्यार्थी त्या ठिकाणीच अडकले होते. त्यांना परत गावाकडे आणण्याच्या पालकांच्या मागणीनुसार राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री तथा पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे विनंती केली, त्याचप्रमाणे, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्याही ही बाब निदर्शनास आणून विद्यार्थ्यांना परत येण्यासाठी परवानगी देण्याची विनंती केली. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनीही या बाबीचा कोटा प्रश

कर्जासाठी शेतकरी बांधवांची अडवणूक केल्यास बँकांविरूद्ध एफआयआर - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

Image
खरीप हंगाम 2020-21 नियोजन बैठक खरीप पतपुरवठा सुरळीत ठेवा अमरावती, दि. 29 : खरीप पीक हंगामासाठी शेतकरी बांधवांना पतपुरवठा सुरळीत झाला पाहिजे. एकही शेतकरी वंचित राहता कामा नये. सध्याच्या परिस्थितीचे गांभीर्य ओळखा. कर्ज मिळण्यात शेतकऱ्यांना अडचणी आल्यास खपवून घेतले जाणार नाही. कर्जपुरवठ्यात हयगय केल्याचे आढळल्यास बँकांवर एफआयआर दाखल करण्यात यावेत, असे स्पष्ट निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.              जिल्हा खरीप हंगाम 2020-21 नियोजन बैठक पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आज नियोजनभवनात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू, खासदार नवनीत राणा,आमदार सुलभाताई खोडके, आमदार बळवंतराव वानखडे, आमदार देवेंद्र भुयार, आमदार प्रताप अडसड,   जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलू देशमुख, उपाध्यक्ष विठ्ठलराव चव्हाण, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी विजय चवाळे आदी यावेळी उपस्थित होते.                पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, कोरोना संकटामुळे सध

स्थानिक लॅबच्या मान्यतेचा मार्ग मोकळा

Image
लॅबमधील तज्ज्ञांच्या तपासणी अहवाल एम्सच्या अहवालाशी जुळला              अमरावती, दि. 28 : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामधील कोरोना चाचणी लॅबमधून तपासण्यात आलेले कोरोनाचे नमुने एम्सच्या नमुन्याशी जुळले आहेत. तसा अहवालही एम्सने दिल्लीच्या आयसीएमआरला पाठविला आहे. त्यामुळे आता लॅब सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.           पालकमंत्री  ॲड  यशोमती ठाकुर यांच्याकडून  सातत्याने लॅब लवकर कार्यान्वित होण्याकरीता पाठपुरावा होत आहे.      विद्यापीठाच्या सीआयसीमध्ये तयार करण्यात आलेल्या लॅबमध्ये 2 मशीन उपलब्ध आहेत. सोबतच येथील तज्ज्ञांनी एम्समध्ये आपले प्रशिक्षण पुर्ण केले आहे. या तज्ज्ञांनी आसीएमआरने दिलेल्या मानकानूसार थ्रोट स्वॅब चे नमुने तपासणे व ते जुळणे हे लॅबची मान्याता प्रक्रिया  पुर्ण होण्यासाठी अत्यंत आवश्यक होते.   सोमवारी तज्ज्ञ डॉ.प्रशांत ठाकरे यांनी रात्री 3 वाजता नमुन्यांची तपासणी करुन अन्य औपचारिकता पुर्ण केली. त्यानंतर या नमुन्यांचा अहवाल एम्सला पाठविला. हा अहवाल एम्सच्या अहवालासोबत जुळल्यामुळे आता एम्सकडून हा अहवाल आयसीएमआरला पाठविण्यात येईल. याच अहवालाच्या आधारावर आ

संचारबंदीत प्रवास करुन येणाऱ्यांचे संस्थात्मक विलगीकरण करा - जिल्हाधिकारी शैलेश नवाल

Image
          अमरावती, दि. 28 : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव ग्रामीण भागात होऊ नये याची विशेष काळजी घेणे आवश्यक असून, तालुक्याचा हद्दीत व ग्रामीण भागात बाहेरुन प्रवास करुन येणाऱ्या नागरीकांचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात यावे असे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले आहेत.           जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सद्यस्थितीत अमरावती शहरामध्ये वाढत असल्याचे दिसुन येत आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून वेगवेगळ्या उपाययोजना लागु करण्यात आल्या आहेत. त्याकरीता जिल्ह्यामध्ये लॉकडॉऊन व संचारबंदीचे काटेकोरपणे पालन करण्यात येत असून सर्व शासकीय यंत्रणा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता प्रभावी अंमलबजावणी करत आहेत.            अश्यापरिस्थितीमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव ग्रामीण भागात होऊ नये, याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. याकरीता विशेष खबरदारी म्हणून संबंधित तहसिलदारांनी  तालुक्याचे हद्दीमध्ये/ ग्रामीण भागामध्ये बाहेरुन प्रवास करुन जे प्रवासी, मजुर, विद्यार्थी अथवा इतर कोणताही ना

कोरोना प्रतिबंध उपाययोजनांचा पालकमंत्र्यांकडून आढावा

Image
अवैध दारूविक्रीविरोधात कठोर कारवाई करा -           पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचे निर्देश -             अमरावती, दि. 28 : कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू आहे. या काळात अवैध दारूनिर्मिती व विक्री होत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर येत आहेत. त्याला प्रतिबंध घालण्यासाठी कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.    कायद्याचा धाक नसेल तर असे प्रकार फोफावतात. त्यामुळे अशा प्रकारांविरुद्ध कठोरपणे कारवाई करावी व विशेष मोहिम राबविण्याचे निर्देश राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले. कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीद्वारे आढावा घेतला. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की,    अवैध दारूची निर्मिती, परराज्यातून दारू येणे व त्याची विक्री होणे असे प्रकार घडत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. अवैध दारूमुळे घातक परिणाम होऊन बळी जाण्याचाही संभव असतो. त्याशिवाय, अशा प्रकारां

जिल्ह्यात 25 हून अधिक शिबिरांतून तेराशे नागरिकांकडून रक्तदान

Image
रक्तदानातून जपली सामाजिक बांधिलकी             अमरावती दि.27: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू आहे. अशा परिस्थितीत रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून आणि रक्ताची गरज लक्षात घेता ‘रक्तदान हेच श्रेष्ठ दान’ हे बोधवाक्य कृतीतून अंगीकारण्याच्या उद्देशाने जिल्हा सामान्य रुग्णालयातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आले. त्यानुसार जिल्ह्यात 25हून अधिक शिबिरे आयोजित करण्यात येऊन त्याद्वारे 1 हजार 310 रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. कोविड-19 या आजाराने जगभरात थैमान मांडले आहे. देशात व राज्यातही या संसर्गजन्य विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी आहे. अशा परिस्थितीत रक्तदान शिबिरांची संख्या रोडावली होती. मात्र, रक्ताचा तुटवडा होऊ नये, यासाठी सोशल डिस्टन्सिंग पाळून व इतर दक्षता घेऊन रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याचा निर्णय आरोग्य व महसूल प्रशासनाने घेतला. संचारबंदीचा भंग न करता, पण काळाची गरज लक्षात घेऊन रक्तदान करणे गरजेचे आहे. म्हणून सोशल डिस्टन्सिंग आणि शिस्त पाळून रक्तदान करावे. शासनाच्या  नियमांचे प

जीवनावश्यक वस्तू खरेदी करताना खबरदारी घेणे आवश्यक - जिल्हाधिकारी शैलेश नवाल

Image
  बाहेरून येताना आपण कोरोना सोबत तर आणत नाही ना? अमरावती, दि. 27 : जीवनावश्यक वस्तू खरेदी करताना काळजी घ्या. मास्क लावूनच घराबाहेर पडा आणि सोशल डिस्टन्स राखा. वस्तू घेऊन जाताना आपण कोरोना सोबत तर नेत नाही ना, हे लक्षात ठेवले पाहिजे. सजग राहून व नियम पाळलेच पाहिजेत, असे कळकळीचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे. जिल्हा प्रशासनाने या अनुषंगाने जनजागृती मोहिम हाती घेतली असून, क्लस्टर कंटेनमेंट झोनसह विविध ठिकाणी उद्घोषणा, फलक, सोशल मीडिया आदी विविध माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे. संचारबंदीच्या काळात जीवनावश्यक वस्तू नागरिकांना उपलब्ध व्हाव्यात, यासाठी सकाळी 8 ते दुपारी 12 अशी वेळ निश्चित करून देण्यात आली आहे. मात्र, या काळात नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखून मास्क लावूनच घराबाहेर पडावे. दुकानात सोशल डिस्टन्स राखले जाईल याची दक्षता घ्यावी. अनावश्यक कारणासाठी घराबाहेर पडू नये. या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्याच्या अनुषंगाने जीवनावश्यक वस्तूंच्या घरपोच सेवेचा अधिकाधिक विस्तार करण्यासाठी प्रयत्न होत आहेत. दरम्यान, जिल्हा

सेवायोजन कार्यालयात नोंदणी केलेल्यांनी नोंदणीस आधार क्रमांक लिंक करावा

सेवायोजन कार्यालयात नोंदणी केलेल्यांनी नोंदणीस आधार क्रमांक लिंक करावा -कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे आवाहन उमेदवारांच्या सोयीसाठी  www.mahaswayam.gov.in  संकेतस्थळ उपलब्ध अमरावती, दि. 26 :  जिल्ह्यातील सर्व नोकरी इच्छुक तसेच नोकरीसाठी सेवायोजन कार्यालयाकडे नाव नोंदणी केलेल्या बेरोजगार युवकांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राव्दारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आपला आधार कार्ड क्रमांक नोंदणीला जोडणे आवश्यक आहे. यासाठी केंद्रामार्फत उपलब्ध करुन दिलेल्या  www.mahaswayam.gov.in  या संकेतस्थळावर  उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने आपला आधार कार्ड क्रमांक लिंक करण्याचे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाव्दारे करण्यात आले आहे.             महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या सर्व सेवा-सुविधा ह्या उपरोक्त वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन पध्दतीने पुरविण्यात येतात. या संकेतस्थळाच्या माध्यमातून बेरोजगार युवक युवतींना राज्यभरात वेळोवेळी आयोजित करण्यात येणाऱ्या विविध रोजगार मेळाव्याची माहिती मिळविणे

पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी जिल्हा खरीप नियोजन आढावा बैठक

Image
अमरावती, दि. 27 :   अमरावती जिल्ह्यातील खरीप हंगाम 2020 च्या नियोजनाचा आढावा घेण्यासाठी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक (29 एप्रिल) सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजनभवनात होणार आहे.    या अनुषंगाने पालकमंत्र्यांनी कृषी अधिका-यांशी चर्चा करून माहिती घेतली व परिपूर्ण नियोजन करण्याचे निर्देश दिले. बैठकीस सर्व संबंधित अधिका-यांनी संपूर्ण सविस्तर माहितीसह उपस्थित राहण्याचे निर्देशही त्यांनी दिले. जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी, विविध उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी पालकमंत्र्यांनी चर्चा करून पूर्वतयारीची माहिती घेतली. खरीप नियोजनाच्या बैठकीत मागील बैठकीच्या इतिवृत्तावरील अनुपालन, खरीप हंगामातील प्रस्तावित पेरणी क्षेत्र, बियाणे नियोजन, खत पुरवठा, प्रमुख पीकाची प्रस्तावित उत्पादकता, गुण नियंत्रण कामाचे नियोजन व कार्यवाही, कृषी विभागातील विविध योजना व प्रकल्पांची माहिती , नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, पीक विमा, नैसर्गिक आपत्ती निधी, पीक कर्ज, सिंचन क्षमता, कृषी वीजपुरवठा, जिल्

पालकमंत्र्यांचे आदिवासी विकास मंत्र्यांना निवेदन

Image
मेळघाटातील आदिवासी बांधवांना मिळावा एकाधिकार योजनेतून धान्याचा लाभ -           पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर अमरावती, दि. 27 : आदिवासी विकास महामंडळाच्या एकाधिकार योजनेतून मेळघाटातील आदिवासींना अन्नधान्याचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री अॅड.यशोमती ठाकूर यांनी आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांना पत्राद्वारे केली आहे.              शासनाकडून आदिवासी विकास महामंडळाच्या एकाधिकार योजनेमार्फत आदिवासीबहुल जिल्ह्यामधील निश्चित केलेल्या ठिकाणी अन्नधान्याचे वाटप करण्यात येत आहे. यावर्षीच्या अन्नधान्य वाटप सूचनांचे अवलोकन केले असता, नाशिक, पालघर, ठाणे, पुणे, रायगड व सातारा येथील आदिम आदिवासी, कातकरी यांच्या सर्व कुटुंबांना लाभार्थी म्हणून निवडीबाबतची मान्यता देण्यात आलेली आहे. तसेच नंदुरबार जिल्ह्याकरिता वर्ष 2019-20 च्या रोजगार हमी योजनेवरील ‘जॉब होल्डर’ हा निकष मान्य केला आहे. यवतमाळ, नांदेड, गडचिरोली जिल्ह्यामधील कोलाम, माडिया कुटूंबांना लाभ देणे निश्चित केलेले आहे, परंतू अमरावती जिल्ह्यातील मनरेगाअंतर्गत 100 दिवस काम केलेले मजूर अश