Tuesday, April 21, 2020

पूर्णानगरच्या शिरभाते भावंडांकडून मुख्यमंत्री सहायता निधीला मदत



चिमुकल्यांची मदत कौतुकास्पद
               -  पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती, दि. 21 : तिवस्यानजिक पूर्णानगर येथील शिरभाते कुटुंबातील स्वराली व स्वरित या दोन चिमुकल्या भावंडांनी आपल्या खाऊच्या पैश्यांतून साठवलेले 11 हजार रूपये मुख्यमंत्री सहायता निधीला दिले आहेत. त्यांनी हा निधी राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्याकडे सुपुर्द केला.
पूर्णानगर येथील पंकज शिरभाते यांची ही मुले आहेत. आपल्या पत्नीचे कर्करोगासारख्या दुर्धर आजाराने निधन झाल्यावर पंकज शिरभाते यांनी आपल्या कुटुंबाची जबाबदारी खंबीरपणे सांभाळली व मुलांवर उत्तम संस्कार केले. त्या चिमुकल्यांनीच आज आपल्या खाऊच्या पैश्यांतून साठवलेले 11 हजार मुख्यमंत्री सहायता निधीला दिले आहेत. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी या निधीचा विनियोग होणार आहे. चिमुकल्या भावंडांची ही संवेदनशीलता कौतुकास्पद आहे, अशी प्रतिक्रिया श्रीमती ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केली.
कोरोना विषाणु विरुद्ध लढतांना मदत करण्यासाठी  मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड १९ हे स्वतंत्र खाते उघडण्यात आले असून त्याचा बचतखाते क्रमांक  39239591720 आहे.  

खात्याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे. 

मुख्यमंत्री  सहाय्यता निधी-कोविड 19
बँकेचे बचत खाते क्रमांक- 39239591720
स्टेट बँक ऑफ इंडिया,
मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई 400023
शाखा कोड 00300
आयएफएससी कोड SBIN0000300

सदर देणग्यांना आयकर अधिनियम 1961 च्या 80 (G) नुसार प्राप्तीकर कपातीतून 100 टक्के सूट देण्यात येते. या खात्यात सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...