Saturday, April 18, 2020

अमरावतीत आणखी एक पॉझिटिव्ह


अमरावती, दि. 18 : अमरावती शहरातील नुरानी चौक परिसरातील निधन झालेल्या एका व्यक्तीच्या मुलाचा थ्रोट स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे अद्यापपर्यंत पॉझिटिव्ह व्यक्तींची संख्या एका मयत व्यक्तीसह एकूण 6 झाली आहे.
सदर व्यक्तीचा 12 एप्रिलला निधन झाले. निधन झालेल्या व्यक्तीचे वय 53 वर्षे होते. त्यांचा मुलाचा स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आला असून, त्याचे वय 16 वर्षे आहे.
नुरानी चौक परिसरातील एका व्यक्तीचे निधन (होम डेथ) झाल्याची माहिती वैद्यकीय पथकाला मिळाली. त्यामुळे खबरदारी म्हणून या कुटुंबातील सदस्यांचे थ्रोट स्वॅब घेण्यात आले. त्यापैकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, 2 प्रलंबित आहेत. दरम्यान, प्राथमिक चौकशीनुसार या रूग्णाच्या संपर्कातील एकूण 23 जणांची तपासणी करून त्यांना आयसोलेट करण्यात आले आहे. अद्यापही तपासणी सुरू आहेत.  
सदर परिसर कंटेनमेंट झोन म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने महापालिका आयुक्तांना प्राधिकृत करण्यात आले आहे. त्याबाबत कार्यवाही महापालिकेच्या पथकांकडून होत आहे.  
                             000


No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...