* तपासणीसाठी स्वतंत्र पथके
अमरावती, दि. 02 : सध्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर काळाबाजार व अतिरिक्त भाव वाढीच्या अनेक ठिकाणाहून तक्रारी प्राप्त होत आहेत. जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी किंवा चढ्या दराने विक्री केल्यास सात वर्षापर्यंत कैद होऊ शकते. याबाबत कार्यवाहीसाठी स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहेत.
पुरवठा विभाग,वैध मापन शास्त्र विभाग व पोलीस यांना संयुक्त कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार त्यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत.
अवाजवी किंवा चढ्यादराने विक्री होत असल्याचे आढळल्यास तात्काळ पोलीसांकडे तक्रार दाखल करून कारवाई करावी असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी या पथकांना दिले आहेत.
या पथकांनी सजग राहून तपासण्या कराव्यात. जीवनावश्यक वस्तू नागरीकांना वैध दरात मिळाल्या पाहिजेत. अतिरीक्त दर लावून विक्री होत असल्याचे आढळल्यास तात्काळ एफआयआर दाखल करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.
0000

No comments:
Post a Comment