हेल्पलाईनवरून सुमारे एक हजार व्यक्तींचे शंका समाधान



कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी व दक्षतेबाबत जनजागृतीसाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना होत आहेत. नागरिकांच्या शंका समाधानासाठी जिल्हा प्रशासनाकडून हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात आले असून, त्याद्वारे एक हजारहून अधिक व्यक्तींचे शंकासमाधान करण्यात आले आहे.
आवश्यक माहिती मिळवू इच्छिणा-या व्यक्तीला जिल्हाधिकारी कार्यालयातून संवाद कक्षातून, कोरोना यंत्रणा कक्षातून परिपूर्ण माहिती देण्यात येत आहे. आवश्यक तिथे जिल्हाधिकारी शैलेश नवाल हे स्वत:ही कॉल रिसिव्ह करून नागरिकांचे शंकासमाधान करत आहेत. नागरिकांचे शंभरहून अधिक कॉल स्वत:  जिल्हाधिका-यांनी रिसिव्ह केले.   संवाद कक्ष व कोरोना नियंत्रण कक्षाद्वारे 125 हून अधिक कॉलला परिपूर्ण उत्तरे देण्यात आली.  जिल्हाधिकारी कार्यालयातील लँडलाईन क्रमांकाद्वारे सुमारे 70 हून अधिक व्यक्तींना माहिती देण्यात आली.  महापालिकेतर्फे हेल्पलाईनद्वारे दीडशेहून अधिक नागरिकांचे शंकासमाधान करण्यात आले. जिल्हा परिषदेद्वारेही हेल्पलाईनद्वारे दीडशेवर अधिक नागरिकांना माहिती देण्यात आली.
त्याशिवाय, जिल्हा सामान्य रूग्णालय, पोलीस आयुक्तालय व अधिक्षक कार्यालयातर्फे हेल्पलाईन सुरू आहेत.
          शासनाकडून वेळोवेळी अधिकृत माहिती प्रसारित करण्यात येत आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवू नये. सजग राहून खबरदारी घ्यावी. कुठलीही शंका असल्यास हेल्पलाईनला फोन करून माहिती घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले. हेल्पलाईनसाठी जिल्हाधिकारी कार्यालय टोल फ्री क्रमांक  1800 233 6396 व संवाद कक्षाचा (0721) 2661355 असा आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाचा दूरध्वनी क्रमांक  (0721) 2663337, आपत्ती नियंत्रण कक्षाचा (0721) 2662025, अमरावती महापालिकेचा  8408816166, तर जिल्हा परिषदेचा (0721) 2662591, जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयाच्या नियंत्रण कक्षाचा (0721) 2665041, तर पोलीस आयुक्तालय नियंत्रण कक्षाचा (0721) 2551000 असा आहे.
 राज्य नियंत्रण कक्षाचा (020) 26127394, एकात्मिक रोग सर्वेक्षण प्रकल्प कक्ष (020) 27290066 आणि टोल फ्री क्रमांक 104 हा आहे.

000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती