अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना 5 किलो विनामुल्य तांदूळ



अमरावती,दि.02 : देशातील कोरोना व्हायरस (COVID-19) प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत सार्वजनिक व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांसाठी माहे एप्रिल ते माहे जुन-2020 या कालावधीसाठी अन्नधान्याच्या नियमित नियतानुसार अन्नधान्याचे वाटप त्या त्या महिन्यात करण्यात येत आहे.
माहे एप्रिल ते माहे जुन-2020 या महिन्याचे अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटूंब लाभार्थी योजना या लाभार्थ्यांना नियमित धान्य वाटप त्या संबंधित महिन्यात करण्यात येणार आहे. नियमित धान्य वाटप झाल्यानंतर त्याच महिन्यात अंत्योदय अन्नयोजना, प्राधान्य कुटूंब लाभार्थी योजना या लाभार्थ्यांना 5 किलो प्रती व्यक्ती मोफत तांदूळ वितरीत करण्यात येणार आहे. शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांना नियमित धान्याचे वाटप करण्यात येणार आहे.
माहे एप्रिल ते माहे जुन-2020 मध्ये अंत्योदय अन्नयोजनेनुसार 15 किलो गहू, 20 किलो तांदूळ नियमित वाटप होणार असून 5 किलो तांदूळ प्रतिव्यक्ती मोफत वाटप होणार आहे.  प्राधान्य कुटूंब लाभार्थी योजनेंतर्गत 3 किलो गहू, 2 किलो तांदूळ नियमित वाटप होणार असून 5 किलो तांदूळ प्रतिव्यक्ती मोफत वाटप होणार आहे. शेतकरी लाभार्थी योजनेंतर्गत 3 किलो गहू, 2 किलो तांदूळ नियमित वाटप होणार असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल टाकसाळे यांनी कळविले आहे
0000


Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती