कोरोना प्रतिबंधासाठी अंगणवाडी सेविका अविश्रांत कार्यरत



पार पाडताहेत सर्वेक्षण व संपर्काची महत्वाची जबाबदारी



अमरावती, दि. 16 : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध यंत्रणा कार्यरत आहेत. डॉक्टर, पारिचारिका, सफाई कर्मचारी, पोलीस यांच्यासह अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर अहोरात्र कार्यरत आहेत. जिल्ह्यात सुमारे 2 हजार अंगणवाडी सेविका व 2 हजार 84 आशा वर्कर या ग्रामपातळीवर सर्वेक्षणाचे  काम करत आहेत.
महिला व बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी बालकांना पूर्ण प्राथमिक शिक्षण देणे, तसेच माता बालक यांच्या आरोग्य, आहार, कुपोषण निर्मूलन या बाबींकडे लक्ष पुरवणे आदी कामे अंगणवाडी सेविका करत आहेत. जनता व आरोग्य कर्मचारी यांच्यात दुव्याचे काम आशा वर्कर करत आहेत. त्याशिवाय समाजात आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करणे, आरोग्यविषयक योजना, उपक्रमांना चालना देणे , पालकांना वेळोवेळी मार्गदर्शन करणे, ग्रामीण भागातील महिलांना आहार व आरोग्याविषयी योग्य मार्गदर्शन करणे ही कामेही त्यांच्याकडून केली जातात. जिल्ह्यात ५९ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ३३३ उपकेंद्रे असून, सुमारे दोन हजार ६४०अंगणवाडी कार्यरत आहेत . 

 कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविकांना सर्वेक्षण व संपर्काची महत्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या सर्वेक्षणामध्ये गावातील प्रत्येक व्यक्तीची माहिती त्यांच्याघरी जाऊन घेण्यात येते. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तींची नोंद केली जाते, तसेच कोरोना विषाणूसंदर्भात लोकांमध्ये जनजागृती , स्वच्छता मोहिम राबविणे, आरोग्याची काळजी घेणे, माहिती देत असताना लक्षणे आढळल्यास त्याची विशेष नोंदणी करणे आदी कामे जोखीम पत्करून व अहोरात्र मेहनत घेऊन पूर्ण करताना दिसत आहेत.
साथरोग नियंत्रणासाठी महिला डॉक्टर, परिचारिका, महिला अधिकारी यांच्यासह अंगणवाडी सेविका  मदतनीस कार्यरत आहेत. सर्वेक्षण करताना तसे जनजागृती करताना समाजामध्ये नेक अडचणींना सामोरे जावे लागते, तरीसुद्धा सर्व अडचणींवर मात करून आपली कामे  व्यवस्थित करत आहेत. 
सर्वेक्षण हे सध्या महत्वाचे आहे, त्यामुळे सर्वेक्षणासाठी आलेल्या व्यक्तीला व्यवस्थित आणि चूक माहिती देणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. सर्वेक्षणामुळे गावामधील लोकांची संख्या, आजारी लोकांचीसंख्या, बाहेरून आलेल्या जुरांची संख्या, आजारी व्यक्तींमध्ये कोरोनाची लक्षणे दिसताच त्याची तात्काळ चाचणी करण्याची व्यवस्था करणे, हा सगळा डेटा अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांच्याकडून प्रशासनाला मिळतो. त्यामुळे सध्याच्या काळात अंगणवाडी सेविकाताई व ‘आशा’ताई या दोघीही अत्यंत मोलाची भूमिका बजावत आहेत.
                                                                        000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती