गत सहा दिवसांत 2 हजार 358 मे. टन अन्नधान्य वितरीत

          
पुरवठा कार्यवाहीला वेग
अमरावती, दि. 6 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊन काळात जिल्ह्यातील गरजूंना अन्नधान्य मिळण्यासाठी रेशन तत्काळ वाटपाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हा पुरवठा यंत्रणेनुसार, जिल्ह्यात 80 हजार 520 कार्डधारकांना आजपर्यंत 2 हजार 358 मेट्रिक टन अन्नधान्याचे वाटप करण्यात आले आहे. त्यात 3 हजार 248 शिधापत्रिकाधारकांनी पोर्टबिलीटी यंत्रणेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य उचलले आहे.
            जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत होत असून दि. 1 ते 6  एप्रिल, 2020 या सहा दिवसात जिल्ह्यातील 80 हजार 520 शिधापत्रिकाधारकांना 2 हजार 358  मे. टन अन्नधान्याचे वाटप करण्यात आले आहे . तसेच वाटपात गैरप्रकार करणाऱ्या 2 दुकानदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल टाकसाळे यांनी दिली.
जिल्ह्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी  तसेच शेतकरी लाभार्थी याची असून एकूण 5 लाख 28 हजार 147 रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे 25 लाख 47 हजार 396 इतकी आहे. या लाभार्थ्यांना 1 हजार 939 स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो. माहे एप्रिल 2020 साठी अंत्योदय योजनेअंतर्गत 2 रुपये किलो दराने प्रति कार्ड 15 किलो गहू , 3 रुपये किलो दराने प्रति कार्ड 20 किलो तांदूळ दिला जात आहे.  तर प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना 2 रु किलो दराने प्रति व्यक्ती 3 किलो गहू आणि 3 रु किलो दराने प्रति  व्यक्ती 2 किलो तांदूळ दिला जात आहे. शेतकरी लाभार्थी कार्ड वर 2 रु किलो दराने प्रति व्यक्ती 3 किलो गहू आणि 3 रु किलो दराने प्रति  व्यक्ती 2 किलो तांदूळ दिला जात आहे.
     त्याचबरोबर, स्थलांतरित झालेले परंतु लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या सुमारे 3 हजार 248 शिधापत्रिकाधारकांनी ते जेथे राहत आहेत त्याठिकाणी शासनाच्या पोर्टबिलीटी यंत्रणेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे.
               
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत एप्रिल ते जून पर्यंत अंत्योदय योजना या प्राधान्य लाभार्थी योजनेतील कार्डवर प्रति लाभार्थी प्रति महीना 5 किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. पात्र रेशनकार्ड धारकाने नियमित स्वस्त धान्य खरेदी केल्यानंतर त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला 5 किलो अतिरिक्त तांदूळ मोफत देण्यात येणार आहे. त्यामुळे आता प्रत्येक पात्र रेशन कार्डधारकाला नियमित धान्य घेतल्यानंतर 8 दिवसांनी प्रति व्यक्ती 5 किलो तांदुळ  कुटुंबातील व्यक्तींच्या संख्येनुसार मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.  हा मोफत तांदूळ माहे एप्रिल सोबतच मे आणि जुनमध्ये सुध्दा त्या त्या महिन्यात उपलब्ध करून दिला जाणार आहे

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती