उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांच्या थेट खात्यात पैसे जमा


नागरिकांनी कृपया बाहेर पडू नये
घरपोच मिळणार सिलेंडर सेवा
अमरावती, दि. 02 : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना एप्रिल ते जून या कालावधीत विनामूल्य गॅस रिफील करुन देण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. त्यानुसार एप्रिल ते जून या कालावधीत गॅस सिलेंडर रिफील करण्यासाठी लागणारा निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात अग्रिम स्वरुपात जमा करण्यात येणार आहे. थेट खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. गॅस कंपन्यांकडून गॅस रिफिलिंगची घरपोच सेवा देण्यात येत आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी गॅस वितरकांच्या दुकानावर गर्दी करू नये. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी घराबाहेर पडू नये व योग्य ती दक्षता घ्यावी. आपणास ही सेवा घरपोच मिळणार आहे. त्यामुळे दक्षता घ्यावी असे आवाहन भारत पेट्रोलियमचे विभागीय व्यवस्थापक शिवा रेड्डी यांनी केले आहे

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती