वयोवृद्ध, अपंग किंवा एकाकी ज्येष्ठ नागरिकांना घरपोच वस्तू

 

       स्वयंसेवी संस्थांनीही सहभागाचे जिल्हाधिका-यांचे आवाहन

·        मनपा, जिल्हापरिषदेतर्फे हेल्पलाईन

* दिव्यांगांना घरपोच रेशनचे वाटप

अमरावती, दि. 3 :   कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील वयोवृद्ध, अपंग आणि एकाकी राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना जीवनावश्यक वस्तू सुलभतेने उपलब्ध करून देण्यासाठी कार्यपद्धती निश्चित केली असून अशा व्यक्तींना घरपोच सेवा आजपासून सुरु करण्यात आली आहे. संबंधित गरजू व्यक्तींने हेल्पलाईनवर संपर्क साधल्यानंतर ही सेवा त्यांना उपलब्ध होऊ शकेल. या कामात स्वयंसेवी संस्थांनीही प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे.

            वयोवृद्ध, अपंग किंवा एकाकी राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना घराच्या बाहेर पडावे लागू नये तसेच त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.   यासाठी स्वतंत्र हेल्पलाईन सुरू करण्यात आली  आहे. या हेल्पलाईनवर गरजू व्यक्तीने माहिती देताच त्यांना आवश्यक वस्तू घरपोच दिल्या जाणार आहेत.   अत्यावश्यक वस्तू जसे- अन्नधान्य, औषधे अशा बाबींचा पुरवठा करणाऱ्या संस्थांचे सहकार्य मिळविण्यात येत आहे. जिल्हा परिषद व महापालिकेच्या यंत्रणेकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाभरात सुरु असलेल्या संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर दिव्यांग व्यक्ती, निराधार यांना अडचणी होऊ नयेत, यासाठी विशेष काळजी घेण्याबाबत श्री. नवाल यांनी दिले आहेत. दरम्यान, आज शहरातील दिव्यांग बांधवाना रेशनचे घरपोच वाटप आले.

 

ज्यांच्याकडे रेशनकार्ड उपलब्ध आहे अतितीव्र दिव्यांग व्यक्तीला गहू, तांदूळ, डाळ आदी रेशन प्राधान्याने सार्वजनिक अन्नधान्य वितरण व्यवस्थेद्वारे उपलब्ध करून देण्यात यावे, हालचाल न करू शकणा-या दिव्यांगांना ग्रामसेवक यांनी आशा, अंगणवाडी सेविका, यांच्या सहाय्याने घरपोच वस्तू द्याव्यात, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. राष्ट्रीयीकृत बँका, इतर बँका व इतर ठिकाणी दिव्यांगांना रांगेत न थांबवता तत्काळ सेवा देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.  

दिव्यांगांना  निराधार योजनेअंतर्गत देय असणारी एक महिन्याची पेन्शन आगाऊ स्वरूपात द्यावी. दिव्यांगांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी विशेष दिव्यांग सुविधा कक्ष सुरु करण्यात आला आहे. अमरावती महापालिकेच्या क्षेत्रासाठी हेल्पलाईन क्रमांक 9356705163 किंवा 9356731419, तर ग्रामीण भागासाठी 9881910189 किंवा 7378999124 असे आहेत. जिल्ह्याचा आपत्कालीन सेवा क्रमांक (0721) 2662025 असा आहे.

महापालिकेच्या क्षेत्रात 14 स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने, तर ग्रामीण भागात ग्रामसेवक, आशा सेविका अंगणवाडी सेविका यांच्या मदतीने या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे, विविध सेवाभावी संस्थांना या कामात सहभागी होण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती