पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचा पाठपुरावा


आमदार रोहित पवार यांच्याकडून जिल्ह्यासाठी 500 लीटर सॅनिटायझर उपलब्ध
            अमरावती, दि. 8 : जिल्ह्यात सॅनिटायझर उपलब्ध व्हावे यासाठी  पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर या प्रयत्नरत असून, त्यांच्या मागणीनुसार आमदार रोहित पवार यांनी 500 लीटर सॅनिटायझर जिल्ह्यासाठी उपलब्ध करून दिले आहे. हे सॅनिटायझर जिल्हा प्रशासनाकडे सुपुर्द करण्यात आले आहे.  
कोरोना विषाणू संसर्गासाठी विविध उपाययोजना होत असताना पोलीस, आरोग्य व विविध यंत्रणा अहोरात्र राबत आहेत. त्यांच्यासह सर्व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सॅनिटायझर व इतर आवश्यक साधने उपलब्ध झाली पाहिजेत, यासाठी पालकमंत्री ॲड. ठाकूर यांच्याकडून विविध प्रयत्न होत आहेत. त्यांच्या निर्देशानुसार जिल्हा कारागृहातील बंदीजनांकडून, तसेच महिला बचत गटांकडून मास्कनिर्मितीचे काम गतीने होत आहे.   
त्यानुसार पालकमंत्री यांच्या मागणीस तत्काळ प्रतिसाद देत आमदार श्री. पवार यांनी पाचशे लीटर सॅनिटायझर उपलब्ध करून दिले आहे. पालकमंत्र्यांकडून हे सॅनिटायझर जिल्हा प्रशासनाच्या सुपूर्द करण्यात आले. कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने अहोरात्र सेवा बजावत असलेल्या आरोग्य यंत्रणा, पोलीस आदी यंत्रणांना हे सॅनिटायझर उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी येथे सांगितले.
                                    000   


Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती