Wednesday, April 1, 2020

आपण शूर सैनिकाप्रमाणे जीवाची बाजी लावून लढत आहात महिला व बालकल्याण मंत्र्यांचा डॉक्टर, पारिचारिकांशी संवाद


 डॉक्टर, पारिचारिकांच्या अविरत सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त

अमरावती, दि. 1 :  कोरोनाविरुद्धच्या लढाईत डॉक्टर, पारिचारिका व आरोग्य सेवेतील कर्मचारी हे आघाडीवर राहून लढणा-या शूर सैनिकाप्रमाणे जीवाची बाजी लावून अहोरात्र लढत आहेत. आपल्या या देशसेवेबद्दल प्रत्येक नागरिकाच्या मनात कायम कृतज्ञता आहे. आपल्या या कार्याला मानाचा मुजरा करते, अशा शब्दांत आज राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी डॉक्टर, पारिचारिका व आरोग्य सेवेतील कर्मचा-यांशी संवाद साधत कृतज्ञता व्यक्त केली.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी आज दूरध्वनीवरून विविध रूग्णालयांतील डॉक्टर, पारिचारिका, कर्मचारी आदींशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंध, उपचारांसाठी विविध रूग्णालयांत डॉक्टर, पारिचारिका व इतर कर्मचारी स्वत;चा जीव धोक्यात घालून अहोरात्र सेवा देत आहेत. सद्‌य:स्थितीत त्यांचे हे कार्य देशासाठी लढणा-या सैनिकासारखे आहे. तुम्ही दाखवत असलेल्या धीरामुळे रूग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना बळ मिळत आहे. या कार्यात कुठलीही अडचण आली तर तत्काळ माहिती द्या. आपल्या काही सूचना असल्या तर आम्हाला जरूर कळवा. स्वतः ची व आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या. कोरोनाला हरविण्यासाठी लढाई अशीच सुरू ठेवूया व सर्वांनी मिळून या संकटावर मात करूया, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...