मुख्यमंत्री सहायता निधीसाठी नितीन कदम यांची मदत पालकमंत्र्यांकडे धनादेश केला सुपुर्द


अमरावती, दि. 10 : कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी विविध मान्यवर, संस्थांनी मदत करण्याचे आवाहन शासनाकडून केले जात आहे. त्याला प्रतिसाद देत येथील उद्योजक नितीन कदम यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 55 हजार 555 रूपयांचा धनादेश आज जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्याकडे सुपूर्द केला.
श्री. कदम हे हॉटेल व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी मदतीचा धनादेश आज सकाळी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्याकडे सुपुर्द केला. त्याबद्दल पालकमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन करत धन्यवाद दिले. कोव्हिड १९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन काटेकोर उपाययोजना करत असून कोरोनाच्या वैश्विक संकटाचा मुकाबला करण्यासाठी आपले  योगदान म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी निधी देण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे. 

खात्याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.


मुख्यमंत्री  सहाय्यता निधी-कोविड 19
बँकेचे बचत खाते क्रमांक- 39239591720
स्टेट बँक ऑफ इंडिया,
मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई 400023
शाखा कोड 00300
आयएफएससी कोड SBIN0000300
सदर देणग्यांना आयकर अधिनियम 1961 च्या 80 (G) नुसार आयकर कपातीतून 100 टक्के सूट देण्यात येते.

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती