कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू आहे. सेवा-सुविधांबाबत राज्य शासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना
अ) लॉकडाऊनच्या कालावधीत खालील सेवा प्रतिबंधित राहतील.
1. सुरक्षेच्या कारणाशिवाय रेल्वेमधून सर्व प्रवासी हालचाल बंद राहील.
2. सार्वजनिक वाहतुकीसाठीच्या बसेस बंद राहतील.
3. वैद्यकीय कारणाशिवाय किंवा या मार्गदर्शक तत्वानुसार परवानगी असलेल्या व्यक्ती वगळून इतर व्यक्तीना
आंतरजिल्हा व आंतरराज्य संचाराला बंदी राहील.
4. सर्व शैक्षणीक प्रशिक्षण, संस्था व शिकवणी वर्ग बंद राहतील.
5. या मार्गदर्शक तत्वानुसार विशेष परवानगी असलेल्या व्यतीरिक्त इतर सर्व औद्योगीक व वाणिज्यिक आस्थापना बंद राहतील.
6. या मार्गदर्शक तत्वानुसार विशेष परवानगी असलेल्या परवान्याशिवाय अतिथ्य सेवा बंद राहतील.
7. टॅक्सी (अॅटो रिक्षा आणि सायकल रिक्षासह आणि कॅब ॲग्रीग्रेटरच्या सेवा)
8. सर्व सिनेमा हॉल, मॉल, शॉपिंग कॉम्पलेक्स, व्यायामशाळा व क्रिडा कॉम्पलेक्स, जलतरण तलाव, मनोरंजन
पार्क, थिएटर, बार आणि सभागृह, असेब्ली हॉल व इतर तत्सम ठिकाणे ।
9. सर्व सामाजिक धार्मिक कार्य, सांस्कृतीक, शैक्षणिक, करमणुक,खेळ, राजकीय, इतर मेळावे.
10. सर्व धार्मिक स्थळे तसेच धार्मिक कार्यक्रम परिषदा, पुजेची ठिकाणे भाविकासाठी बंद ठेवण्यात इत्यादीवर बंदी राहील.
11. वाईन शॉप, FL-II सर्व देशी विदेशी दारुची दुकाणे, CL-III सर्व परमिट रुम बार, FL-III सर्व बिअर शॉपी,
FL BR II क्लब, FL-IV सर्व देशी मद्य विक्रीच्या किरकोळ व ठोक अनुज्ञप्ती सुरु ठेवण्यास मनाई राहील.
12. तंबाखू, तंबाखूजन्य विक्री करणारी सर्व प्रतिष्ठान/ पानटपरी चालू ठेवण्यास मनाई राहील.
13. अंत्यविधीसारख्या प्रसंगी वीस पेक्षा अधिक व्यक्तींना परवानगी दिली जाणार नाही.
आ) हॉटस्पॉट व कंटेनमेंट झोन मध्ये पालन करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना
1.हॉटस्पॉट म्हणजेच ज्या क्षेत्रामध्ये कोव्हीड १९ या साथीच्या रोगाचा मोठया प्रमाणावर उदेक झालेला आहे, असे क्षेत्र किंवा असे क्लस्टर जेथे कोव्हीड १९ चा लक्षणीय प्रसार झालेला आहे,असे क्षेत्र, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार करण्यात आलेले आहे.अशा Containment Zone मध्ये प्रवेश करणे व त्याच्या बाहेर येण्यास मनाई करण्यात येत आहे.
2. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय (MoHFW) मध्ये दिलेल्या मार्गदर्शक सुचनेनुसार अशा हॉटस्पॉट, कंटेनमेंट झोन चे राज्य शासन / जिल्हा प्रशासनाव्दारे सिमांकन करण्यात आलेले आहे.
3. अशा हॉटस्पॉट/कंटेनमेट झोनमध्ये मार्गदर्शक सुचनामध्ये परवानगी दिलेल्या बाबींनासुध्दा प्रतिबंधीत करण्यात येत आहे. कंटेनमेंट झोनच्या परिसरामध्ये स्ट्रिक्ट नियंत्रण ठेवण्यात यावे, याची खात्री करण्याकरिता अशा परिसरामध्ये आपातकालीन अत्यावश्यक सेवा (वैद्यकीय अत्यावश्यक सेवा, कायदा व सुव्यवस्थेशी निगडीत सेवा) वगळता इतर कोणतीही व्यक्ती Containment Zone चे आंत किंवा बाहेर तपासणी केल्याशिवाय सोडता कामा नये,या संदर्भात राज्य शासनाने व स्थानिक जिल्हा प्रशासनाने आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय (MOHFW) ने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोर अंमलबजावणी सर्व संबंधीत यंत्रणांनी करावी.
लॉकडाऊनच्या कालावधीत खालील मार्गदर्शक तत्वांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणेबाबत.
इ) सर्व आरोग्य सेवा (Ayush सह) सुरु राहतील ज्यामध्ये खालील बाबीचा समावेश आहे.
(रुग्णालये, नर्सिंग होम, क्लिनिक, टेलिमेडिसिन सुविधा. डिस्पेन्सरीज, केमिस्ट, औषधी दुकाने (जनऔषधी केंद्र आणि वैद्यकीय साहित्याचे दुकान),
1. सर्व आरोग्यसेवा (आयुषसह) सुरू राहतील.
2. रुग्णालय, नर्सिंग होम, क्लिनीक, टेलिमेडिसिन सुविधा
3. वैद्यकीय प्रयोगशाळा, संग्रह केंद्रे
4. औषधी व वैद्यकीय प्रयोगशाळा
5. पशुवैद्यकीय रुग्णालये, दवाखाने, क्लिनीक, पॅथालॉजी, औषधी विक्री व पुरवठा.
6. अधिकृत खाजगी आस्थापना जी कोविड -19 च्या आवश्यकतेच्या सेवा तरतुदीसाठी किंवा हा आजार
रोखण्याच्या प्रयत्नांना समर्थन देतात ज्यात होमकेअर, प्रदाते. डायग्नोस्टिक रुग्णालये, पुरवठा साखळी पुरविणारे फर्म, सेवा देणारे रुग्णालये.
7. औषधे, फार्मास्युटिकल, वैद्यकीय उपकरणे, वैद्यकीय ऑक्सीजन तसेच त्यांचे पॅकेजिंग साहित्य, कच्चा माल, आणि मध्यवर्ती घटकांचे युनिट
8. रुग्णवाहिका निर्मितीसह वैद्यकीय आरोग्याच्या पायाभूत सुविधांचे बांधकाम
9. वैद्यकीय आणी पशुवैद्यकी व्यक्ती, वैज्ञानिक, परिचारिका, पॅरामेडीकल स्टॉफ, प्रयोगशाळा, तंत्रज्ञ, दाई आणि इतर आरोग्यविषयक सेवा (रुग्णवाहिकेसहित)
ई. कृषी व कृषी संबधित कामे
1. शेती व फळबागासंबंधातील सर्व कामे पूर्णपणे कार्यरत राहतील.
2. शेतामध्ये शेतकरी व शेतमजूर यांना शेतीविषयक कामे करण्यास मुभा राहील.
3. कृषी उत्पादने खरेदी करणा-या यंत्रणा तसेच शेतमालाची उद्योगाव्दारे, शेतक-याव्दारे शेतकरी गटाव्दारे किंवा
शासनाद्वारे होणारे थेट विपणन हमी भावाने खरेदी करणा-या यंत्रणांची कामे सुरु राहतील.
4. कृषी उत्पन बाजार समितीच्या वतीने चालविण्यात येणा-या मंडी किंवा महाराष्ट्र शासनाने अधिसूचीत केलेल्या मंडी सुरु राहतील.
5. शेतीविषयक यंत्राची व त्यांचे सुटे भागाची विक्री व दुरुस्ती करणारे दुकाने हे त्यांचे पुरवठा साखळीसह सुरु
राहतील.
6. शेतीकरिता उपयोगात येणारे भाडेतत्वावरील अवजारे पुरवठा करणारे सेंटर्स
7. रासायनिक खते, किटकनाशके व बि-बियाणे यांचे उत्पादन वितरण व किरकोळ विक्री सुरु राहतील.
8. शेतमालाची काढणी व पेरणी करणा-या आणी इतर कृषी अवजारे राज्याअंतर्गत व आंतरराज्य वाहतुक सुरु राहील.
उ. मासेमारीच्या अनुषंगाने असलेले सर्व व्यवसाय सुरु राहतील.
मासेमारीय व अनुषंगिक व्यवसायाकरिता वाहतुकीची मुभा राहील.
ऊ. पशुवैद्यकीय विभागाशी संबंधितविषयक खालीलप्रमाणे काम सुरु राहतील.
1. दूध संकलन करणे, त्यावर प्रक्रिया करणे, त्याचे वितरण, विक्री, फरसाण व स्वीट मार्ट (टेक वे, होम डिलिव्हरी) इतर कामे सुरु राहतील.
2. पशुपालन, कुक्कुटपालन व अनुषंगिक कामे सुरु राहतील.
3. जनावरांच्या छावण्या व गोशाळा सुरु राहतील.
ए. वनेसंबंधित उपक्रम
1. पेसा, नॉन पेसा आणि एफआरए भागातील किरकोळ वनोपज उपक्रम (संग्रहण, प्रक्रिया, वाहतूक व विक्री) जसे की, तेंदूपत्ता व वनक्षेत्रातून संकलन केंद्र स्थापन करणे तसेच गोदामामध्ये वाहतुकीसह संकलन
2.जंगलातील आगीपासून बचाव करण्यासाठी जंगलात पडलेल्या इमारती लाकडाचा संग्रह आणि तात्पुरती विक्री, आगाराकडे वाहतूक
ऐ. आर्थिक बाबीशी संबंधित खालील कामकाज सुरु राहतील.
1. बँका, एटीएम, बँकेसाठी आवश्यक आयटीसेवा, बँकिंग संवादक, प्रतिनिधी सेवा आदी बँकिंग सेवा
2. बँकाना नेमून दिलेल्या वेळेनुसार बँक शाखा सुरु राहतील.
3. स्थानिक प्रशासनाने बँकेमध्ये सुरक्षारक्षक नेमावे तसेच बँक कर्मचारी व ग्राहक यांच्याकडून सामाजिक अंतर, तसेच कायदा व सुव्यवस्था राखल्या जाईल याबाबत कार्यवाही करावी.
ओ. सामाजिक क्षेत्र
1. लहान मुले, अपंग, मतिमंद, ज्येष्ठ नागरीक, महिला, विधवा यांचेसंबंधी चालविण्यात येणारी निवारागृहे.
2. लहान मुले यांचेसाठी चालविली जाणारी निरिक्षणगृहे, संगोपन केंद्र व सुरक्षागृहे.
3. सामाजिक सुरक्षा, निवृत्ती वेतन वाटप, जसे की, वृद्ध, विधवा, स्वातंत्र्य संग्राम सैनिक, भविष्य निर्वाह निधी
देणा-या संस्था.
4. अंगणवाडीसंबंधित कामे जसे की, पोषण आहाराचे घरपोच वाटप
5. जिल्हयात कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांवर पोलीस विभागाने जातीने लक्ष देऊन कार्यवाही करावी. तसेच
हिंसाचार करण्या-या व्यक्तीवर प्रतिबंधात्मक कार्यवाही करावी, केलेल्या कार्यवाहीचा नियमित अहवाल
जिल्हा दंडाधिकारी यांना सादर करावा.
औ. ऑनलाईन शिक्षण प्रोत्साहन सुविधा
1. सर्व शैक्षणिक प्रशिक्षण, शिकवणी संस्था बंद राहतील.
2. तथापि या वरील संस्थांनी ऑनलाईन अध्यापनाव्दारे त्यांचे शैक्षणिक सत्र सुरु ठेवावे.
3.शिक्षणासाठी शैक्षणिक वाहिन्या व दूरदर्शन यांचा वापर करावा.
4. ऑनलाईन शैक्षणिक पुस्तके मागविण्याबाबत घरपोच सेवा,
अं. मनरेगामधून द्यावयाची कामे
1. सामाजिक अंतर व तोंडाला मास्क लावणे याबाबतची अंमलबजावणी आदेशित करून मनरेगाची कामे मंजूर करावी.
2. मनरेगामधून सिंचन व जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देण्यात यावे.
3. पाटबंधारे आणि जलसंधारण क्षेत्रातील इतर केंद्र आणि राज्य योजनांनाही मनरेगा कामांशी सांगड घालून
अंमलबजावणी करण्यास मुभा राहील.
अ: . सार्वजनिक उपक्रम पुढीलप्रमाणे कार्यान्वित राहतील.
1. पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस, यांची वाहतूक वितरण, साठवण व विक्री सुरु राहील.
2. राज्यामध्ये वीज निर्मिती, वीज पारेषण व वीज वितरण या बाबी सुरु राहतील.
3. पोस्ट ऑफीस संबंधित सर्व सेवा सुरु राहतील
4. पाणी, स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापनाबाबतची कार्यवाही याबाबतच्या सुविधा नगर परिषद स्तरावर सुरु
राहतील.
5. दूरसंचार व इंटरनेट या सेवा सुरु राहतील.
ऋ. माल (माल चढविणे/उतरविणे) इत्यादी माल वाहतुकीबाबत सूचना
1. वाहतूक करणारे ट्रक त्यासोबत दोन वाहन चालक व एक मदतनीस असावा. मालवाहतुकीसाठी जाणारे रिकामे ट्रक किंवा मालवाहतुक करुन परत जाणारे ट्रक यांना सुध्दा परवानगी राहील. परंतु चालक यांनी वाहन
चालविण्याचा परवाना सोबत ठेवणे बंधनकारक आहे.
2. राज्य शासनाने ठरवून दिलेल्या किमान अंतरासह महामार्गावरील ट्रक दुरुस्तीची दुकाने सुरु राहतील.
क. खाली नमूद केलेल्या जीवनावश्यक वस्तुचा पुरवठा सुरु राहील.
1. जीवनावश्यक वस्तुंच्या पुरवठयामधील सर्व सुविधा सुरु राहतील.
2. जीवनाश्यक वस्तू विकणारे प्रतिष्ठान, धान्य व किराणा, बेकरी, फळे, व भाज्या, कृषी संबंधित सर्व दुकाने,
पेट्रोल पंप, दुधाची दुकाने, अंडे, मांस, मासे, पशुखाद्य व त्यांचा चारा विक्रीची दुकाने सुरु राहतील. सामाजिक अंतराचा नियम पाळण्यात यावा.
3. घरपोच सेवा देण्याबाबत जास्तीत जास्त कार्यवाही करण्यात यावी जेणेकरुन कुठेही गर्दी होणार नाही..
ख. खाली नमूद केलेल्या व्यापारी आस्थापना सुरु राहतील.
1. प्रिंट व इलेक्ट्रॉनिक्स मिडीया, डी.टी.एच व केबल वाहिनी सेवा.
2. माहिती व तंत्रज्ञानाच्या सेवा 50 टक्के कर्मचा-यांसह सुरु राहतील.
3. शासकीय कामाकरिता डाटा आणि कॉल सेटर त्यांचे कमीत कमी कर्मचा-यासह सुरु राहतील
4. ई-कॉमर्स कंपन्या, ई-कॉमर्स ऑपरेटरव्दारे वापरलेली वाहने आवश्यक परवानग्या चालविण्यास परवानगी
देतील. अन्न, फार्मास्युटिकल्स, वैद्यकीय उपकरणे, विद्युत आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणासह सर्व वस्तू आणि
वस्तूंची ई-कॉमर्स वितरण कुरिअर सेवा.
5. शीतगृहे आणी वखार महामंडळाची गोदामे सुरु राहतील.
6. कार्यालय आणि निवासी संकुलाची देखभाल आणि देखभाल करण्यासाठी खाजगी सुरक्षा सेवा आणि सुविधा व्यवस्थापन सेवा.
7. लॉकडाऊनमुळे वैद्यकीय व आपत्कालीन कर्मचारी व अडकलेल्या पर्यटक आणि व्यक्तीसाठी हॉटेल, लॉज सुरु राहतील.
8. सेवा देणा-या व्यक्ती जसे, इलेक्ट्रिशियन, संगणक / मोबाईल दुरुस्ती वाहन दुरुस्ती करणारे केंद्र, नळ कारागीर, सुतार यांच्या सेवा सुरु राहतील.
9. एम.एस.एम.ई अंतर्गत गव्हाचे पीठ, डाळी, आणि खाद्यतेल इत्यादी उत्पादनांत गुंतलेली संस्था.
ग. उद्योग / औद्योगिक आस्थापना (शासकीय व खाजगी) यांना खालील कामे करण्याची मुभा राहील.
1. महानगरपालिका हद्दीबाहेरील व ग्रामीण भागातील उद्योग अशा प्रकारचे उद्योग सुरु ठेवण्यासाठी कामगारांची
त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करावी.
2. औद्योगीक आस्थापनामध्ये कामगारांना कामाचे ठिकाण पोहचविण्याची व्यवस्था सामाजिक अंतराच्या
नियमाची अंमलबजावणी करुन कंत्राटदाराने करावी.
3. जीवनावश्यक वस्तुचे उत्पादन करणारे युनिटस् जसे औषधी उत्पादन, वैद्यकीय उपकरणे व त्या संबंधी
लागणारा कच्चा माल सुरु राहतील.
4. उत्पादन करणारे युनिटे ज्यांना सतत प्रक्रिया आणि त्यांची पुरवठा साखळी आवश्यक असते.
5. आय टी हार्डवेअर उत्पादन सुरु राहतील..
6. कोळसा उत्पादन खाणी व खनिज उत्पादन, त्याची वाहतूक तसचे विस्फोटकांचा पुरवठा आणि प्रासंगिक खाणकामे
7. पॅकेजिंग साम्रगीचे उत्पादन युनिट
8. ताग उद्योग जेथे पाळीने काम चालते यामध्ये सामाजिक अंतराच्या नियमाची अंमलबजावणी करण्यात यावी.
9. महानगरपालिका क्षेत्राबाहेरील व ग्रामीण भागातील वीटभट्टी
घ. बांधकामे खालील प्रकारच्या बांधकामास परवानगी देण्यात येत आहे.
1. महानगरपालिका क्षेत्राचे हदीबाहेरील व ग्रामीण भागातील उद्योग
2. नविनीकरण ऊर्जा प्रकल्पाचे बांधकाम
3. महानगरपालीका हद्दीतील सुरु असलेली बांधकामे जेथे मजूर उपलब्ध आहे व बाहेरुन मजूर आणण्याची गरज पडणार नाही अशी कामे सुरु राहतील. ज्या ठिकाणी काम आहे त्याच ठिकाणी मजूर राहतील व मजुराची वाहतूक होणार नाही या अटीवर.
4. मान्सूनपूर्व संबंधित सर्व कामे
ङ. पुढील प्रकरणांमध्ये व्यक्तींच्या हालचाली करण्यास परवानगी आहे.
1. आपत्कालीन सेवांसाठी वैद्यकीय आणि पशुवैद्यकीय सेवा आणि आवश्यक वस्तू खरेदीसाठी खाजगी वाहने, अशा परिस्थितीत चारचाकी वाहनांच्या बाबतीत खाजगी वाहन चालकाव्यतिरिका एका प्रवाश्याला परवानगी दिली जाऊ शकते. मात्र, दुचाकी वाहनांच्या बाबतीत केवळ वाहन चालकास परवानगी असेल.
2. जिल्हा प्राधिकरणाच्या सूचनेनुसार कामाच्या ठिकाणी जाणारे व कामावरुन येणारे सर्व कर्मचारी संबंधित
कार्यालय प्रमुखाने कर्मचा-यास आदेश पासेस निर्गमित करण्यात यावे.
च. केंद्र शासनाचे कार्य खालीलप्रमाणे सुरु राहतील
आरोग्य व कुटुंब कल्याण, आपत्ती व्यवस्थापन, जिल्हा सूचना व विज्ञान केंद्र, एनसीसी, नेहरु युवा केंद्र
छ. राज्य शासनाचे खालील कार्यालय सुरु राहतील
1. पोलीस, होमगार्ड, अग्निशामक, आपत्कालीन सेवा, आपत्ती व्यवस्थापन, कारागृहे आणि नगर परिषद, नगर पंचायती ही निर्बंधाशिवाय सुरु राहतील.
2. राज्य शासनाचे इतर खात्याचे वर्ग अ व वर्ग ब चे अधिकारी आवश्यकतेनुसार कार्यालयात उपस्थित राहतील. तसेच गट क कर्मचारी यांची 10 टक्के उपस्थितीसह कार्यालये सुरु राहतील. परंतु, सदर कर्मचारी यांनी सामाजिक अंतर पाळून काम करतील. तथापि, असे असले तरी सामान्य जनतेला पूर्ण सेवा मिळेल याची खात्री करावी.
3. जिल्हा प्रशासन व कोषागार ही कार्यालये मर्यादित कर्मचारी संख्येने सुरु राहतील.
4. तथापि, सार्वजनिक सेवा उपलब्ध होईल याची खात्री करावी व त्याच्यासाठी आवश्यक कर्मचारी वर्ग नेमलेला असावा.
5. वन कार्यालय, कर्मचारी, प्राणी संग्रहालय, रोपवाटिका, वन्यजीव, जंगलातील वणवा, आग नियंत्रण करणारी यंत्रणा, वृक्षारोपन, गस्त घालणे इत्यादी कामे
ज. विलगीकरणामध्ये राहणाऱ्या व्यक्ती खालीलप्रमाणे असतील
1) स्थानिक आरोग्य प्राधिकारणाने त्यांनी दिलेल्या कालावधीकरिता घरगुती विलगीकरण/ संस्थात्मक विलगीकरणात राहण्याबाबत सूचित केलेल्या व्यक्ती
2) विलगीकरणाचा नियम तोडण्याविरुद्ध व्यक्तींना भारतीय दंडसंहिता 1860 चे कलम 188 अन्वये कारवाई करण्यात यावी.
3) दि. 15.02.2020 नंतर भारतामध्ये आलेले परंतू विलगीकरणात असेलेल्या सर्व व्यक्ती त्यांचा विलगीकरणाचा कालावधी संपला आहे व तपासणीनंतर ते कोवीड-19 निगेटिव्ह आलेले आहे अशा विलगीकृत व्यक्तींना गृह मंत्रालय, भारत सरकारने निर्गमित केलेल्या एसओपी नुसार सुट्टी देण्यात यावी.
झ. लॉक डाऊनबाबत सुचना :
1) या आदेशासोबत परिशिष्ट 1 मध्ये राष्ट्रीय कोवीड-19 संबंधित दिलेल्या निर्देशाचे कडक व काटेकारेपणे पालन करण्यात यावे.
2) सर्व औद्योगिक व वाणिज्यिक प्रतिष्ठाने, कामाच्या ठिकाणी कामाची सुरुवात करण्यापुर्वी परिशिष्ट 2 प्रमाणे एसओपी प्रमाणे कारवाई करण्यात येणार असल्याबाबतचे हमीपत्र संबंधित विभागास सादर करतील.
3) प्रतिबंधित केलेल्या बाबींची उपाययोजनेची अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित क्षेत्राकरिता जिल्हा दंडाधिकारी यांचेकडून कार्यकारी दंडाधिकारी यांची incident commander म्हणून नेमणूक करण्यात आलेल्या असून त्यांच्या कार्यक्षेत्रात उपाययोजना करण्याची जबाबदारी नेमण्यात आलेल्या incident commander यांची राहील. incident commander च्या कार्यक्षेत्रातील इतर खात्याचे अधिकारी incident commander यांच्या सूचनेप्रमाणे काम करतील. incident commander आवश्यकतेनुसार अत्यावश्यक सेवेकरीता पासेस निर्गमित करतील. तसेच यापुर्वी आदेशाप्रमाणे कार्यालय प्रमुखही पासेस वितरीत करु शकतील व निर्गमित केलेल्या पासेस धारकांची यादी पोलीस अधिक्षक यांच्या कार्यालयास दररोज सायं. 5 वाजता सादर करतील.
4) दवाखान्यातील पायाभूत सुविधा व इतर सोयी कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरु राहतील. याची खात्री incident commander हे वारंवार करत राहतील.
No comments:
Post a Comment