कोरोना चाचणीला अमरावतीतून लवकरच सुरूवात



लॅबसाठी डीपीडीसीतून निधी देणार

विद्यापीठ व पीडीएमसीत तयारी

-         पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर                            
अमरावती, दि. 13 : कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर कोरोना चाचणीसाठी अमरावती येथे लवकरच विद्यापीठ व पीडीएमसी येथे लॅब सुरु होणार असून, त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणे व इतर कार्यवाही होत आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशीही चर्चा करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज दिली.

विद्यापीठ आणि पीडीएमसीला प्रयोगशाळेसाठी आवश्यक असलेल्या यंत्रसामुग्रीकरिता आवश्यक निधी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यासाठी निर्देश त्यांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना दिले आहेत. अमरावती हे विभागीय मुख्यालयाचे ठिकाण आहे. त्यानुसार येथे दोन लॅब असाव्यात, असा प्रस्ताव मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्याकडे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मांडण्यात आला. याठिकाणी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आणि डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय येथे चाचणी प्रयोगशाळा सुरु होणार असून लवकरच आवश्यक यंत्रसामुग्रीची पूर्तता होणार आहे. केंद्र स्तरावरील आयसीएमआर प्राधिकरणाद्वारे ऑनलाईन चाचणी करण्यात आल्यानंतर या प्रयोगशाळांमध्ये कोरोनासोबतच अन्य संसर्गजन्य आजारांच्या चाचण्या सुरु होणार आहेत, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

            कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी चाचणी अहवाल तत्काळ मिळाल्यास प्रतिबंधात्मक कार्यवाहीला गती येईल. त्यामुळे अमरावतीसारख्या विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी कोरोना व इतर संसर्गजन्य आजारांचे  निदान करणा-या प्रयोगशाळा असाव्यात, असा प्रस्ताव पालकमंत्र्यांनी मांडला होता.  अमरावती विद्यापीठ आणि पीडीएमसीने सदर प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी तयारी दर्शविली. त्यानुसार तिथे प्रयोगशाळा सुरू होण्याबाबत कार्यवाहीने गती घेतली आहे. 

लवकरच अमरावती विद्यापीठ आणि पीडीएमसीला प्रयोगशाळेसाठी यंत्रसामुग्री उपलब्ध होणार आहे. केंद्र स्तरावरील आयसीएमआर प्राधिकरणाद्वारे ऑनलाईन निरिक्षण करण्यात येईल व लगेच या दोन्ही प्रयोगशाळांमधून कोरोनासह अन्य संसर्गजन्य आजारांसाठी चाचण्या करुन निदान करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. सध्या अमरावती विभागातील कोरोनाच्या चाचण्यांसाठी थ्रोट स्वॅब नागपूरच्या प्रयोगशाळांमध्ये पाठविण्यात येत असल्याने त्याचे अहवाल उशिरा प्राप्त होत आहेत. अमरावतीमध्ये या प्रयोगशाळा स्थापन झाल्यानंतर ही अडचण दूर होणार आहे.
                                                000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती