इंडियन मेडिकल असोसिएशनच्या निवेदनाची पालकमंत्र्यांकडून दखल




    शासन, प्रशासन खंबीरपणे आरोग्य सेवेच्या पाठीशी
     - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती, दि. 21 :  सध्याच्या संकट काळात डॉक्टर, पारिचारिका, आरोग्य कर्मचारी हे कोरोना वॉरियर्स असून, त्यांचे मनोबल खच्ची होता कामा नये.  जीवाची पर्वा न करता ही मंडळी काम करत आहेत. शासन व प्रशासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असा दिलासा महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री श्रीमती ॲड. यशोमती ठाकूर यांनी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पदाधिका-यांना दिला.
कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे देशात बिकट परिस्थिती निर्माण झाली असून, कोरोनाच्या प्रतिबंधासाठी आरोग्य यंत्रणा आघाडीवर काम करत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेचे मनोबल टिकवून ठेवण्याच्या अनुषंगाने निवेदन इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे पालकमंत्री ॲड. ठाकूर, जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना देण्यात आले. सदर निवेदनाची दखल घेत हे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सादर केले आहे.
आमदार बळवंत वानखडे, आमदार देवेंद्र भुयार, असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अनिल रोहणकर, सचिव डॉ. आशिष साबू, डॉ. प्रफुल्ल कडू, डॉ. अश्विनीकुमार, डॉ. अनुपमा देशमुख, डॉ. वसंत लुंगे, तसेच इतर पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे देशच नव्हे, तर संपूर्ण जग थांबले आहे. या बिकट परिस्थितीत आरोग्य यंत्रणा व इतर यंत्रणा खंबीरपणे काम करत आहेत. जीवावर उदार होऊन पूर्ण क्षमतेने आम्ही काम करत आहोत. या काळात त्यांचे मनोबल वाढविणे आवश्यक आहे. त्यांचे मनोबल खच्ची होऊन त्यांचे काम थांबले तर खूप मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागू शकते. त्यामुळे डॉक्टरांच्या व इतर आरोग्य यंत्रणेच्या मनोबलावर परिणाम होईल, असे वक्तव्य किंवा कृती कुणीही करू नये, असे निवेदन मेडिकल असोसिएशनने पालकमंत्री व जिल्हाधिका-यांना सादर केले.
 या संकटकाळात डॉक्टर, पारिचारिका, आरोग्य कर्मचारी, पोलीस, महसूल प्रशासन अशा विविध यंत्रणा पूर्ण क्षमतेने काम करत आहेत. आपले मनोबल खच्ची होऊ देऊ नका. आम्ही सर्वजण आपल्या पाठीशी आहोत, असा दिलासा पालकमंत्र्यांनी सर्वांना दिला.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती