स्थानिक लॅबच्या मान्यतेचा मार्ग मोकळा


लॅबमधील तज्ज्ञांच्या तपासणी अहवाल एम्सच्या अहवालाशी जुळला   
          अमरावती, दि. 28 : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामधील कोरोना चाचणी लॅबमधून तपासण्यात आलेले कोरोनाचे नमुने एम्सच्या नमुन्याशी जुळले आहेत. तसा अहवालही एम्सने दिल्लीच्या आयसीएमआरला पाठविला आहे. त्यामुळे आता लॅब सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
          पालकमंत्री ॲड यशोमती ठाकुर यांच्याकडून  सातत्याने लॅब लवकर कार्यान्वित होण्याकरीता पाठपुरावा होत आहे.      विद्यापीठाच्या सीआयसीमध्ये तयार करण्यात आलेल्या लॅबमध्ये 2 मशीन उपलब्ध आहेत. सोबतच येथील तज्ज्ञांनी एम्समध्ये आपले प्रशिक्षण पुर्ण केले आहे. या तज्ज्ञांनी आसीएमआरने दिलेल्या मानकानूसार थ्रोट स्वॅब चे नमुने तपासणे व ते जुळणे हे लॅबची मान्याता प्रक्रिया  पुर्ण होण्यासाठी अत्यंत आवश्यक होते. सोमवारी तज्ज्ञ डॉ.प्रशांत ठाकरे यांनी रात्री 3 वाजता नमुन्यांची तपासणी करुन अन्य औपचारिकता पुर्ण केली. त्यानंतर या नमुन्यांचा अहवाल एम्सला पाठविला. हा अहवाल एम्सच्या अहवालासोबत जुळल्यामुळे आता एम्सकडून हा अहवाल आयसीएमआरला पाठविण्यात येईल. याच अहवालाच्या आधारावर आयसीएमआर लॅबला मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
          या लॅबकरिता आमच्या टीमने खुप परिश्रम घेतले आहे. रात्री 3 वाजेपर्यंत टीमने काम करत होते. एम्समध्ये नमुने जुळले आहे. आयसीएमआरला अहवाल पाठविला आहे. मी स्वत: तिथल्या अधिकार्यांशी बोललो आहे. लवकरच आपल्याला मान्यताही मिळेल अशी अपेक्षा आहे, असे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.मुरलीधर चांदेकर यांनी सांगितले.
          विद्यापीठात पुर्वीपासून लॅब तयार होती. आयसीएमआर व एम्सच्या नियमानुसार येथील तज्ज्ञांना ट्रेनिंग देण्यात आले आहे. ही लॅब सुरु होण्यास प्राधान्याने लक्ष दिले जात आहे. विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी अनेक दिवसांपासून याकरिता कठोर परिश्रम घेतले आहे. या महामारीला नियंत्रीत करण्यातकरिता ही चांगली सुविधा होईल असे पालकमंत्री  ॲड  यशोमती ठाकुर यांनी सांगितले.
00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती