अमरावती विद्यापीठातील कोरोना चाचणी लॅबची पालकमंत्र्यांकडून पाहणी











अमरावती, दि. 18 : कोरोना संशयित रुग्णांच्या थ्रोट स्वॅबची तपासणी अहवाल स्थानिकरित्या तत्काळ प्राप्त व्हावेत, यासाठी अमरावती विद्यापीठ परिसरात उभारण्यात आलेल्या कोरोना चाचणी लॅबची पाहणी पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केली.
कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने तत्काळ चाचणी अहवाल प्राप्त व्हावेत या दृष्टीने लॅब निर्माण करण्यासाठी पालकमंत्री ॲड. ठाकूर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विविध मंत्र्यांकडे पाठपुरावा केला.
            त्याअनुषंगाने येथील विद्यापीठात सुसज्ज कोरोना विषाणू तपासणी प्रयोगशाळा स्थापित करण्यात आली आहे. नुकतीच या लॅबमध्ये अत्याधुनिक चाचपणी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे नमुन्यांचे अहवाल प्रलंबित राहण्याच्या समस्येचे निराकरण होईल. पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सदर लॅबची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. तेथील सुविधांचा व साहित्य सामुग्रीचा आढावा घेतला. प्रयोगशाळेतील सुविधांची पाहणी करुन पालकमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. ही सुविधा कायम राहणार असून, संसर्ग प्रतिबंधासाठी उपाययोजनांना त्यामुळे गती मिळेल व नागरिकांचे आरोग्याचे रक्षण होईल, असे यावेळी पालकमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी त्यांच्यासोबत आमदार बळवंतराव वानखडे तसेच माजी जि. प. सभापती जयंतराव देशमुख, प्र- कुलगुरू डॉ. राजेश जयपुरकर, कुलसचिव डॉ. देशमुख, डॉ पी. व्ही. ठाकरे, डॉ पी ए गावंडे, डॉ एन ए घनवते, प्रज्ञा साऊरकर, नीलू सोनी, शशिकांत रोडे, संदीप त्रिपाठी आदी उपस्थित होते.
            विद्यापीठात स्थापित करण्यात आलेल्या कोरोना लॅबमध्ये सीआयसी युनिटचे विशेषज्ञ डॉ. प्रशांत ठाकरे यांच्यासह चमू नियुक्त करण्यात आली आहे. थ्रोट स्वॅब तपासणीच्या अनुषंगाने आयसीएमआर (इंडियन कॉन्सील मेडीकल रिसर्च) ऑनलाईन मार्गदर्शन करणार आहे. बॉयोपेस्टी कॅबिनेट व आर्टिफिसीआर या दोन्ही मशीनची चाचपणी करण्यात आली असून, एका तासात 12 थ्रोट स्वॅबची तपासणी लॅबमध्ये केली जाऊ शकते.

           

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती