Sunday, April 12, 2020

प्रत्येक तालुक्यात कोविड केअर सेंटर - जिल्हाधिकारी शैलेश नवाल

           कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी आवश्यक उपाययोजनांच्या अनुषंगाने प्रत्येक तालुक्यात कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येत आहे. तेथील सुविधा अद्ययावत ठेवण्याचे निर्देश जिल्हा आपत्ती प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले आहेत.
         केंद्र शासनाच्या सूचनेनुसार राज्य शासनाकडून कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी रुग्णालयांची वर्गवारी करण्यात आली आहे. लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी कोरोना केअर रुग्णालये असून सौम्य लक्षणे असलेल्यांसाठी कोरोना हेल्थ सेंटर तर तीव्र लक्षणे असलेल्यांकरिता कोरोना हॉस्पिटल अशी त्रिस्तरीय वर्गवारी केली आहे.त्यानुसार जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात कोविड केअर सेंटर कार्यान्वित करण्यात येत आहे. कोविड हेल्थ सेंटरही सुरु करण्यात येत असून, सर्व सुविधा अद्ययावत कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत.
        तपासणी मोहिम अधिक व्यापक व काटेकोर करावी.  संस्थात्मक अलगीकरण केंद्र, निवारा शिबिरे याठिकाणी आवश्यक सुविधा पुरविल्या जाव्यात.           ग्रामस्तरावरील कार्यवाहीही काटेकोरपणे झाली पाहिजे.  ग्रामसेवक, आशा वर्कर,  अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून सर्वेक्षण झाले आहे. त्या प्राप्त माहितीनुसार योग्य कार्यवाही व्हावी.  तहसिलदार, गट विकास अधिकारी यांनी समन्वय ठेवून सर्व कामे नियोजनपूर्वक करावीत. ग्रामीण भागात धान्य वाटप सुरु आहे. त्याठिकाणी गर्दी होणार नाही. सामाजिक अंतर राखले जाईल याची दक्षता घ्यावी, असेही निर्देश त्यांनी दिले.  

०००

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...