उपचारानंतर कोरोनाबाधित रुग्णांचा प्रथम चाचणी अहवाल निगेटिव्ह



अमरावती, दि. 19 : अमरावती येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात स्थापित कोविड रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधितांचा उपचारानंतरचा प्रथम चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे.

            येथील हाथीपुरा परिसरातील निधन झालेल्या नागरिकाच्या कुटुंबातील चार व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे त्यांच्यावर सुपर स्पेशालिटी रूग्णालयातील कोविड रूग्णालयात उपचार होत आहेत. या उपचारानंतर सदर व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. त्यामुळे तपासणीसाठी त्यांचे स्वॅब पुन्हा पाठविण्यात आले. त्यानुसार त्यांचा प्रथम चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे.  याबाबत दक्षता म्हणून द्वितीय चाचणी पुन्हा करण्यात येत असून, लवकरच तोही अहवाल प्राप्त होईल. त्यानंतर सदर व्यक्तींना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येईल.  

             

                                    000  

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती