Posts

Showing posts from February, 2021

भानखेडा परिसरातील 33 हजार कोंबड्या नष्ट करण्याची प्रक्रिया पूर्ण

Image
  बर्ड फ्लू प्रतिबंधक कारवाई भानखेडा परिसरातील 33 हजार कोंबड्या नष्ट करण्याची प्रक्रिया पूर्ण   *नुकसानग्रस्तांना मिळणार सानुग्रह अनुदान अमरावती, दि. 28 :   भानखेडा परिसरातील एका पोल्ट्री फार्मवरील कोंबड्यांत बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव आढळल्याने परिसरातील विविध फार्मवरील सुमारे 33 हजार 500 कोंबड्या शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्याची प्रक्रिया आज पूर्ण करण्यात आली.   नुकसानग्रस्त पोल्ट्रीधारकांना भरपाईपोटी प्रतिपक्षी 90 रुपये प्रतिपक्षी सानुग्रह मदत पोल्ट्री मालकांना देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली. अमरावती तालुक्यातील भानखेडा परिसरातील धीमान पोल्ट्री फार्मवरील    कुक्कुटवर्गीय पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाल्याचा अहवाल भोपाळच्या राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेने दिला. त्यामुळे उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत यांच्याकडून तपासणी होऊन या परिसरातील एक कि. मी. त्रिज्येच्या परीघातील क्षेत्र संक्रमित क्षेत्र व 10 किमी त्रिज्येच्या परिघातील क्षेत्र सर्वेक्षण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले. संसर्गजन्य आजार प्रतिबंध कायद्यान्वये भानखेड पर

लॉकडाऊन व संचारबंदी एक आठवड्याने वाढवली

Image
  कोरोना प्रतिबंधक उपाययोजना लॉकडाऊन व संचारबंदी एक आठवड्याने वाढवली   अमरावती, दि. 27 : कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांत यापूर्वीच अमरावती महापालिका क्षेत्र व अचलपूर नगरपालिका क्षेत्र व लगतचा काही परिसर कंटेनमेंट झोन घोषित करून संचारबंदी लागू करण्यात आली. हे निर्बंध पुढील आठवड्यापर्यंत (8 मार्च) कायम ठेवण्यात आले आहेत. अंजनगाव सुर्जी नगरपालिकेचे क्षेत्रही तेथील बाधितांची संख्या पाहता कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. या तिन्ही शहरांत दि. 1 मार्चच्या सकाळी 6 वाजतापासून दि. 8 मार्चच्या सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहणार आहे.             जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी ही माहिती दिली.   साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुढील काही काळ निर्बंध आवश्यक असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर पुढील स्थिती पाहून निर्णय घेतला जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी दिली.             वैद्यकीय सेवा, जीवनावश्यक सेवा यांना या निर्णयातून यापूर्वी दिलेली सवलत व त्यासाठी निश्चित केलेल्या वेळा कायम आहेत. त्यानुसार अमरा

चाचणी कीट व औषधांचा पुरेसा साठा ठेवा - जिल्हाधिकारी शैलेश नवाल

Image
  जिल्हाधिका-यांकडून   जिल्हा रूग्णालयाची   पाहणी चाचणी कीट व औषधांचा पुरेसा साठा ठेवा -           जिल्हाधिकारी   शैलेश नवाल   अमरावती, दि. 27:    कोरोना साथीच्या नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाव्दारे विविध उपाययोजना होत असताना बाधितांवर तत्काळ उपचार होण्यासाठी आरटीपीसीआर कीट, रॅपीड ॲन्टीजेन कीट व ऑक्सीजन या घटकांचा पुरेसा साठा उपलब्ध असणे अत्यंत गरजेचे आहे. याअनुषंगाने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज जिल्हा सामान्य रुग्णालयाला प्रत्यक्ष भेट देऊन औषधीसाठा व इतर सुविधांबाबत तपासणी केली. रुग्णांवर तत्काळ उपचार होण्याच्या दृष्टीने औषधांचा पुरेसा साठा ठेवावा, असे निर्देश त्यांनी यंत्रणेला दिले.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, अति. जिल्हा शल्य चिकित्सक सतिश हुमणे यांच्यासह आरोग्य अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते. कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता जिल्ह्यात उपलब्ध खाटा, आवश्यक नियोजन व इतर सुविधा आदींबाबत आरोग्य यंत्रणेने सजग राहून कामे करावीत. आयटीआय परिसरात चाचणी केंद्र पुरेशा क्षमतेने कार्यान्वित व्हावे, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले. जिल्ह्यात कोरोनामुक्त झ

विभागीय आयुक्तांकडून कोविड प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा

Image
  विभागीय आयुक्तांकडून कोविड प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा तिवसा, मोर्शी, दर्यापूर येथील उपचार केंद्रे सुरू होणार शहरातही खाटांची संख्या वाढवावी -            विभागीय आयुक्त पीयुष सिंह   अमरावती, दि. 26 : जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांत तिवसा येथील ट्रॉमा केअर सेंटरसह मोर्शी व दर्यापूर येथेही उपचार केंद्रे सुरु होणार आहेत. शहरातही उपचारांसाठी आवश्यक रुग्णालये खासगी रुग्णालये आदी ठिकाणी खाटांची संख्या वाढवावी , असे निर्देश विभागीय आयुक्त पीयुष सिंह यांनी आज येथे दिले. कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी बैठक विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह, पोलीस अधिक्षक हरी बालाजी, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अनिल रोहणकार, डॉ. काळे, डॉ. जयश्री नांदुरकर आदी उपस्थित होते.   जिल्ह्यात चाचण्यांची संख्या वाढविण्

जिल्हा वार्षिक योजनेत महिला व बालकल्याणासाठी 3 टक्के निधी राखीव ठेवण्यात येणार

Image
जिल्हा वार्षिक योजनेत महिला व बालकल्याणासाठी 3 टक्के निधी राखीव ठेवण्यात येणार               मुंबई, दि. 25 : आगामी आर्थिक वर्षापासून जिल्हा वार्षिक योजनेत महिला व बालकल्याणाकरिता 3 टक्के निधी राखीव ठेवण्यात येणार आहे. महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी याबाबत आग्रह धरला होता.             महिला व बाल कल्याणाकरीता जिल्हा स्तरावर सध्या कार्यान्वीत असलेल्या योजना अल्प प्रमाणात आहेत. त्यामुळे त्यामध्ये भरीव वाढ होणे आवश्यक आहे. जिल्हा वार्षिक योजना 2021-22 चे वार्षिक आराखडे तयार करताना विविध घटकांसाठीच्या योजनांसाठी निधीचे प्रमाण किती असावे याबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामध्ये महिला व बाल कल्याणाकरिता चिन्हांकित निधीबाबतही (इव्हॅल्युएटेड फन्ड्स फॉर वुमन ॲण्ड चाईल्ड वेल्फेअर) सुचनांचा समावेश आहे.             महिला व बाल कल्याणाकरीता जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2021-22 पासून महिला व बाल कल्याणाकरीता काही अतिरिक्त जिल्हास्तरीय योजना राबविण्यात येणार आहेत. त्याकरीता जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2021-22 मध्ये महिला व बाल कल्याणाकरीता 3

एचआरसीटी चाचणीचे दर निश्चित

Image
  कोरोना प्रतिबंधक उपाययोजना एचआरसीटी चाचणीचे   दर   निश्चित जादा दर आकारणाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाहीसह फौजदारी गुन्हा   अमरावती, दि. 25 :   कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोविड तसेच नॉन कोविड रुग्णांवर खासगी रुग्णालयांमध्ये करण्यात येणाऱ्या विविध उपचारांचे व   चाचण्यांचे   दर    सार्वजनिक आरोग्य विभागाव्दारे निर्धारित करण्यात आले आहेत.   त्यानुसार रुग्णालयांनी तसेच तपासणी केंद्रानी शासनाने निश्चित केलेल्या   दराप्रमाणेच रुग्णांकडून उपचाराकरीता व   चाचण्यांकरीता आकारणी करण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले आहेत.   या उपचार, चाचण्या व तपासण्यांसाठी जादा दर घेणाऱ्या रुग्णालयांवर आता दंडात्मक कार्यवाहीसह फौजदारी गुन्हा दाखल करुन रुग्णालय किंवा तपासणी केंद्र सील बंद करण्याची कार्यवाही केल्या जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.       कोरोनाबाधित रूग्णाला विविध प्रकारच्या तपासण्याव्यतिरिक्त सी. टी.   स्कॅनसारख्या तपासण्यांची आवश्यकता भासत असल्याने कोविड व नॉनकोविड रूग्णांसाठी एचआरसीटी चाचणीचे   दर   निश्चित करण्यात

सालबर्डी यात्रा न भरविण्याबाबत बैतुल जिल्हाधिका-यांना पत्र

Image
  सालबर्डी यात्रा न भरविण्याबाबत बैतुल जिल्हाधिका-यांना पत्र अमरावती, दि. 25 :   अमरावती जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने प्रतिबंधक उपाययोजना होत आहेत. त्यामुळे सालबर्डी यात्रा भरवू नये, असे पत्र जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी बैतुल जिल्हाधिका-यांना पाठविले आहे. मध्यप्रदेशातील प्रभातपट्टनच्या जनपद पंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांनी सालबर्डी यात्रेबाबत प्रसिद्धीपत्रक वितरीत केल्याचे निदर्शनास आले आहे. वास्तविक महाराष्ट्राच्या हद्दीत यात्रा न भरविण्याबाबत यापूर्वीच सूचित करण्यात आले आहे. यात्रेसाठी यात्रेकरूंची वर्दळ व वाहतूक महाराष्ट्रातूनच होणार असल्याने कोविड 19 साथीची लागण मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे यात्रा न भरविण्याबाबत कार्यवाही करण्याचे जिल्हाधिका-यांनी पत्रात नमूद केले आहे. 00000

विनामास्क व बेशिस्त बुलेटस्वाराचा वाहन परवाना रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई

Image
  विनामास्क व बेशिस्त बुलेटस्वाराचा वाहन परवाना रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई वाहन ताब्यात घेण्यासह २ हजारांचा दंड   अमरावती , दि. २४ : मास्क न घातलेल्या व यंत्रणेकडून थांबण्याची सूचना करूनही बेपर्वाईने वाहन चालवत भरधाव वेगात पळून जाणाऱ्या एका बेशिस्त व बेजबाबदार युवकाचे वाहन ताब्यात घेण्यासह दोन हजार दंड व वाहन परवाना रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले आहेत. सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार , कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी काल मंगळवारी सायंकाळनंतर शहरातील बसस्थानक , रेल्वेस्थानक आदी विविध ठिकाणांची पाहणी केली. या पाहणीदरम्यान गाडगेनगराजवळ एक मास्क न घातलेला बुलेटस्वार आपल्या साथीदारासह वेगात जात असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यावरून जिल्हाधिकारी पथकातील कर्मचाऱ्याने संबंधित बुलेटस्वाराला थांबण्याची सूचना केली. मात्र , सदर बुलेटस्वाराने वेगात वाहन चालवत उड्डाण पुलावरून इर्विन चौकमार्गे खापर्डे बगिच्याकडे पोबारा केला. दरम्यान , पथकाने त्याचा पाठलाग करत त्याच्या वाहनाचा नंबर नोंदवून घेतला

तीनशे अतिरिक्त खाटांचे नियोजन जिल्हाधिकारी शैलेश नवाल

Image
कोरोना प्रतिबंधक उपाययोजना तीनशे अतिरिक्त खाटांचे नियोजन जिल्हाधिकारी शैलेश नवाल   अमरावती, दि. 24 : कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता रुग्णालयांची यंत्रणा सुसज्ज करण्यात येत आहे. उपचारांसाठी अतिरिक्त 300 खाटांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार इतरही सोयी- सुविधा आवश्यकता लक्षात घेऊन तजवीज करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले. जिल्हाधिका-यांनी आज कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांबाबत आरोग्य यंत्रणा व संबंधित विभागाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, डॉ. विशाल काळे, डॉ. जयश्री नांदुरकर आदी यावेळी उपस्थित होते. श्री. नवाल म्हणाले की, संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न सर्वांनी समन्वयाने करावे. सध्या 1600 खाटांव्यतिरिक्त 300 अतिरिक्त खाटा वाढविण्यात येतील. चाचण्यांचे   प्रमाण वाढवावे. ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा ठेवावा.   दरम्यान लसीकरणाचेही काम गतीने   पूर्ण होणे आवश्यक आहे.   कोरोना विषाणूचे संक्रमण रोखायचे असे