Monday, February 22, 2021

चाचण्यांची संख्या दुपटीहून अधिक करणार - जिल्हाधिकारी शैलेश नवाल

 



चाचण्यांची संख्या दुपटीहून अधिक करणार

                        जिल्हाधिकारी शैलेश नवाल

अमरावती, दि. 22 : जिल्ह्यात कोरोना संक्रमितांचा आकडा लक्षात घेता, कोरोना चाचणीचे प्रमाण वाढविण्यात येणार आहे. ही संख्या दुपटीहून अधिक वाढविणार असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे दिली.

सद्य:स्थितीत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ व विविध प्रयोगशाळांतून दीड हजारांहून अधिक अहवाल प्राप्त होत आहेत. आता ही चाचण्यांची  क्षमता वाढवून सुमारे पाच हजार चाचण्यांपर्यंत वाढविण्यात येणार आहे. कोरोनाबाबत खातरजमेसाठी आरटीपीसीआर चाचणीवर भर देण्यात येत आहे. कोरोनाची कुठलीही लक्षणे असलेल्या किंवा बाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या जिल्ह्यातील नागरिकांनी आरटीपीसीआर कोरोना चाचणीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले.

बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे अधिकाधिक चाचण्या करण्यात येतील. नागरिकांनी सजग राहून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले. प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कडक कार्यवाही करण्यात येणार आहे. दंडात्मक कारवाईसह फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असून, तसे आदेश जिल्हाधिका-यांनी यापूर्वीच जारी केले आहेत.

                        000


No comments:

Post a Comment

जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ

  जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ अमरावती, 13 : सर्वांसाठी घरे उपलब्ध होण्यासाठी श...