जिल्‍हाधिकारी व महानगरपालिका आयुक्‍त यांनी केली प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी नागरिकांशी साधला संवाद

 






जिल्‍हाधिकारी व महानगरपालिका आयुक्‍त यांनी केली प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी

नागरिकांशी साधला संवाद

 

अमरावती दि.१९ :  जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल व महानगरपालिका आयुक्‍त प्रशांत रोडे यांनी आज प्रतिबंधित क्षेत व साईमंदीर परिसर, अकोली गाव, साईनगर, अकोली चौक या ठिकाणची पाहणी करुन नागरिकांशी संवाद साधला. प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांशी संवाद साधताना त्‍यांनी नियमाचे पालन करावे अश्‍या सुचना दिल्‍या. त्‍यांची विचारपूस केली की त्‍यांना काही अडचणीतर नाही ना. जे रुग्‍न आहे त्‍यांनी  काळजी घ्‍यावी व इतरांना त्‍यांचा प्रादुर्भाव होणार नाही यांची दक्षता घ्‍यावी. प्रशासनाने दिलेल्‍या सर्व सुचनांचे तंतोतंत पालन करावे. लक्षणे नसलेल्या व गृह विलगीकरणात असलेल्या व्यक्तींकडून अनेकदा नियम पाळले जात नाहीत. अशांकडून संक्रमणाचा धोका वाढतो. त्यामुळे त्यांच्यावर कडक दंडात्मक कार्यवाही व्हावी.

या व्यक्तींशी संबंधित यंत्रणेने नियमित संपर्क ठेवावा. त्यांच्यावर घरावर ठळक अक्षरात फलक लावून कुटूंबातील सर्व सदस्यांची तत्काळ कोरोना चाचणी करावी. गृह विलगीकरणाचे नियम न पाळणा-यांकडून बंधपत्र लिहून घ्यावे. उल्लंघन करतांना दुसऱ्यांदा आढळून आल्यास त्याच्याकडून 25 हजार दंड वसूल करण्यात येणार आहे. तसेच संबंधिताच्या मालमत्ता करमध्ये दंड नमूद केल्या जावून वसूल केल्या जाणार आहे. त्याचे काटेकोर पालन होत नसल्यास किंवा संबंधितांनी यासाठी नकार दिल्यास त्यांना कोविड सेंटरला भरती करण्‍यात यावे. घरोघरी जाऊन सर्वेक्षण करुन  ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर द्यावा, असेही त्यांनी सांगितले.

        साईनगर, अकोली गाव, सार्इमंदिर परिसर, अकोली चौक परिसरात जिल्‍हाधिकारी महोदयांनी नागरिकांशी संवाद साधला व त्‍यांना त्रिसुत्रीचा वापर करण्‍याच्‍या सुचना दिल्‍या. मास्‍क लावणे अनिवार्य असून स्‍वतःहा लावावेच व इतरांनाही लावण्‍यासाठी प्रवृत्‍त करावे. मास्‍क लावावे, वारंवार हात धुवावे व सामाजिक अंतर ठेवावे या तिन बाबी कोरोना रोखण्‍यासाठी महत्‍वाच्‍या आसून प्रत्‍येकाने ते अंगिकरले पाहिजे.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती