Posts

Showing posts from May, 2018
Image
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या  134  व्या तुकडीचे दीक्षान्त संचलन दिमाखात   राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे छात्रसैनिक हे देशातील तरुणांचे आदर्श - राष्ट्रपती रामनाथ कोविंद पुणे दि.  30 :   राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे  ‘ सेवा परमो धर्म ’  हे ब्रीद वाक्य आहे. छात्रसैनिकांनी या मंत्राचा कधीही विसर पडू देवू न ये.  मानवतेच्या रक्षणासाठी सदैव सज्ज राहण्याचे  आ वाहन करून राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे छात्रसैनिक हेच  देशातील तरुणांचे  आदर्श असल्याचे गौरोद्गार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी  आज काढले. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) मैदानावर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या  134  व्या तुकडीतील छात्रसैनिकांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या प्रमुख उपस्थितीत दिक्षांत संचलन केले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी छात्रसैनिकांच्या संचलनाची मानवंदना स्वीकारली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले ,  तुमच्या कठोर मेहनतीचे फळ आज तुम्हाला मिळत आहे. या यशात तुमच्या आई वडिलांचा सुद्धा महत्त्वाचा वाटा आहे. खडतर प्रशिक्षण हेच आपल्याला कठीणातील कठीण आव्हानासाठी सज्ज करत असते. शिस्त ,  धाडस
Image
‘ पढो परदेश ’  अंतर्गत महाराष्ट्रातील २३४ अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना लाभ नवी दिल्ली ,  दि. ३० : अल्पसंख्याक समाजातील गुणवान विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी शैक्षणिक कर्जावर सूट देणा-या  केंद्र शासनाच्या  ‘ पढो परदेश ’  योजनेंतर्गत गेल्या तीन वर्षात महाराष्ट्रातील २३४ विद्यार्थ्यांनी लाभ घेतला आहे.  अल्पसंख्याक समाजातील गुणवान विद्यार्थ्यांना परदेशात पदव्युत्तर शिक्षण ,  एमफील व पीएचडी हे संशोधनात्मक अभ्यास पूर्ण करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालयाच्यावतीने  ‘ पढो परदेश ’  योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत वर्ष २०१४-१५ ते २०१६-१७ या कालावधीत देशभरातील ३६ राज्य व केंद्र शासित प्रदेशातील एकूण ३ हजार ६८७  विद्यार्थ्यांनी लाभ घेतला आहे. यात महाराष्ट्रातील २३४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. राज्यातील जैन समाजाच्या ९९ विद्यार्थ्यांनी घेतला लाभ परदेशात उच्च शिक्षण घेणा-या महाराष्ट्रातील मुस्लिम ,  ख्रिश्चन ,  बौध्द  , जैन ,  पारसी आणि शीख या अल्पसंख्याक समाजातील गुणवान मुला-मुलींना  ‘ पढो परदेश ’  योजनेंतर्गत शैक्षणिक कर्जाच्या व्याजातून
Image
रुपी बँक संदर्भात गुंतवणुकदारांचे हित सुरक्षित राहावे - मुख्यमंत्री मुंबई, दि. 30   :रिझर्व्ह बॅक ऑफ इंडियाने गुंतवणुकदारांचे हित सुरक्षित राहावे या दृष्टीने रुपी बॅकेला मार्गदर्शन करावे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले. रूपी बॅकेच्या संदर्भात आज मंत्रालयात आयोजित बैठकीला सहकारमंत्री सुभाष देशमुख , आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर एन.एस. विश्वनाथन , आरबीआयचेकार्यकारी संचालक सुदर्शन सेन , मुख्य महाव्यवस्थापक नीरज निगम , सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव एस.एस. संधू यासह रूपी बॅकेच्या प्रशासकीय मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते. रूपी बॅकेतील गुंतवणुकीदारांच्या ठेवी या सर्वसामान्यांच्या आहेत.त्यामुळे गुंतवणुकदारांचे हित सुरक्षित राहण्याला प्राथम्य देण्यात यावे, असे मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.
पेरणीयोग्य पावसाशिवाय पेरण्या करू नयेत! मुंबई ,  दि.२९: मान्सूनचे केरळात आगमन झाले असले तरी अद्याप तो महाराष्ट्रात आलेला नाही. त्याचे महाराष्ट्रात आगमन झाल्यानंतर सुद्धा पेरणीची घाई करू नये ,  असे आवाहन राज्य सरकारतर्फे करण्यात येत आहे. १ जूननंतर विदर्भ ,  मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मान्सूनपूर्व सरी कोसळतील ,  असा अंदाज आहे. परंतू कमाल तापमान अधिकच असेल. या कालावधीत मुंबई आणि कोकणात ढगाळी वातावरण आणि किरकोळ पाऊस पडेल. या कालावधीत विदर्भ ,  मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळ आणि वीजांपासून नागरिकांनी आपले संरक्षण करावे आणि पुरेशी खबरदारी घ्यावी ,  असे आवाहन करण्यात येत आहे.  या कालावधीत झाडांखाली ,  मोकळ्या जागेत ,  टिनाच्या शेडखाली ,  वीजप्रवाह असलेल्या तारांखाली किंवा विद्युत रोहित्रांनजीक आसरा घेऊ नये ,  तर सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा ,  असेही आवाहन करण्यात येत आहे. 0000
Image
पालकमंत्र्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पणन अधिकाऱ्यांशी चर्चा तूर खरेदी केंद्रे सुरु करण्याबाबत तत्काळ कार्यवाही -           पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील            अमरावती,   दि. 28   :  शेतक-यांची   तूर खरेदी   पूर्ण होण्यासाठी खरेदी केंद्रे सुरु करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पणन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा केली असून त्याबाबत तत्काळ कार्यवाही होईल, असे पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी आज येथे सांगितले.   तूर   खरेदी केंद्रे सुरु करावीत व त्यापूर्वी खरेदी केलेल्या तुरीचे पैसे अदा करण्याच्या मागणीसाठी आमदार बच्चू कडू यांनी केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर श्री.कडू यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांची बैठक पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली, त्यावेळी ते बोलत होते. या चर्चेनंतर श्री. कडू यांनी आंदोलन मागे घेतले. आमदार रमेश बुंदिले, जिल्हाधिकारी अभिजित बांगर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.नितीन व्यवहारे, जिल्हा उपनिबंधक गौतम वालदे आदी उपस्थित होते. खरेदी केंद्रे सुरु करण्याबाबत पालकमंत्री श्री. पोटे-पाटील यांनी दूरध्वनीवरून मुख्यमंत्री
Image
घाबरण्यासारखी कोणतीही परिस्थिती नाही ,  तरीही आवश्यक उपाययोजनांची पूर्तता निपा विषाणू आजाराचा एकही रुग्ण महाराष्ट्रात नाही आजारासंदर्भातील लक्षणे आढळल्यास तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल व्हावे -  सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत मुंबई ,  दि.  22  : केरळमध्ये उद्भवलेल्या निपा विषाणुच्या आजारासारखा एकही रुग्ण महाराष्ट्रात आढळलेला नाही. याबाबत घाबरण्यासारखी कोणतीही परिस्थिती राज्यात नाही ,  पण तरीही या आजारासंदर्भातील काही लक्षणे आढळल्यास रुग्णांनी डॉक्टरांशी तातडीने संपर्क साधावा ,  असे आवाहन सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केले आहे. राज्यात या आजाराचा एकही रुग्ण नसला तरी खबरदारीचे उपाय म्हणून सर्व शासकीय तसेच खासगी रुग्णालयांना सूचित करण्यात आले आहे. मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयासह राज्यातील प्रमुख शासकीय रुग्णालयांमध्ये विलगीकरण कक्ष ( isolation ward)  सुरु करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे ,  अशी माहिती डॉ. सावंत यांनी आज मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. मंत्रालयात आज मंत्री डॉ. सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत यासंदर्भात उच्चस्तरीय बैठक झाली ,  त्यात
विधानपरिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्वैवार्षिक निवडणूक 488 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क अमरावती, दि. 21 : विधानपरिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणूकीत 489 मतदारांपैकी 488 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.   मतदानाची एकूण टक्केवारी 99.80 इतकी आहे.             तहसील कार्यालय स्तरावर एकूण 14 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली होती. सकाळी 8 ते दुपारी 4 यावेळेत मतदान शांततेत पार पडले. मतदार यादीत महापालिकेचे 92 सदस्य, जिल्हा परिषदेचे 59 सदस्य, पंचायत समित्यांचे सभापती 14, नगर परिषद 249 सदस्य,    नगरपंचायत 75 असे एकूण 489 सदस्यांचा समावेश आहे. त्यापैकी 249 पुरुष मतदारांनी तर 239 स्त्री मतदारांनी अशा एकूण 488 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान केंद्रनिहाय आकडेवारी            धारणी 25 पैकी 25 (100 टक्के), चिखलदरा 25 पैकी 25 (100 टक्के), अंजनगाव सुर्जी 34 पैकी 34 (100 टक्के), अचलपूर 50 पैकी 50 (100 टक्के), दर्यापूर 28 पैकी 28 (100 टक्के), चांदूर बाजार 27 पैकी 27 (100 टक्के), भातकुली 22 पैकी 21 (95.45 टक्के*), मोर्शी 30 पैकी 30 (100 टक्के), अमरावती 98 पैकी 98 (