पेरणीयोग्य पावसाशिवाय पेरण्या करू नयेत!

मुंबईदि.२९: मान्सूनचे केरळात आगमन झाले असले तरी अद्याप तो महाराष्ट्रात आलेला नाही. त्याचे महाराष्ट्रात आगमन झाल्यानंतर सुद्धा पेरणीची घाई करू नयेअसे आवाहन राज्य सरकारतर्फे करण्यात येत आहे.
१ जूननंतर विदर्भमराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मान्सूनपूर्व सरी कोसळतीलअसा अंदाज आहे. परंतू कमाल तापमान अधिकच असेल. या कालावधीत मुंबई आणि कोकणात ढगाळी वातावरण आणि किरकोळ पाऊस पडेल. या कालावधीत विदर्भमराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळ आणि वीजांपासून नागरिकांनी आपले संरक्षण करावे आणि पुरेशी खबरदारी घ्यावीअसे आवाहन करण्यात येत आहे.
 या कालावधीत झाडांखालीमोकळ्या जागेतटिनाच्या शेडखालीवीजप्रवाह असलेल्या तारांखाली किंवा विद्युत रोहित्रांनजीक आसरा घेऊ नयेतर सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावाअसेही आवाहन करण्यात येत आहे.
0000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती