Posts

Showing posts from February, 2024

केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेंतर्गत अर्थसहाय्य योजना; अर्ज करण्याचे आवाहन

  केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेंतर्गत अर्थसहाय्य योजना; अर्ज करण्याचे आवाहन               अमरावती, दि. 28 (जिमाका): एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय धारणी कार्यक्षेत्राअंतर्गत केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजना सन 2023-24 अंतर्गत रेडीमेट होजीअरी गारमेंट करीता अर्थसहाय्य योजनाचा लाभ घेण्याकरीता अर्ज मागविण्यात आले आहेत.इच्छुक आदिवासी पुरूष, महिला समुह, बचत गट यांनी   अर्ज करण्याचे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी धारणी रिचर्ड यानथन यांनी केले आहे.               केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजना सन 2023-24 चा लाभ घेण्याकरीता अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकडून नि:शुल्क अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनाचे अर्ज धारणी, चिखलदरा, अंजनगाव व अचलपूर, तालुक्यातील लाभार्थ्यांकरीता प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, धारणी या ठिकाणी व नांदगाव खंडेश्वर, भातकुली, अमरावती, चांदुर रेल्वे, धामणगाव रेल्वे व दर्यापूर तालुक्यातील लाभार्थ्यांसाठी अपर आयुक्त आदिवासी विकास येथे तसेच मोर्शी, वरूड, तिवसा व चांदुर बाजार तालुक्यातील लाभार्थांकर

पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा; प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये 56 उमेदवारांची विविध पदांवर प्राथमिक निवड

  पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा; प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये 56 उमेदवारांची विविध पदांवर प्राथमिक निवड   अमरावती, दि.28 (जिमाका): जिल्हा कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व मॉडेल करिअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानाने बुधवार दि. 21 फेब्रुवारी रोजी   शासकिय तांत्रीक विद्यालय परिसर, अमरावती येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा प्लेसमेंट ड्राईव्ह संपन्न झाला. या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये 56 उमेदवारांची विविध पदांवर प्राथमिक निवड करण्यात आली असून या रोजगार मेळाव्यामध्ये नोकरी इच्छुक उमेदवारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.   ऑनलाइन, ऑफलाईन प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये 155 उमेदवारांनी सहभाग घेतला. त्यापैकी 134 उमेदवारांनी प्रत्यक्ष येऊन मुलाखती देऊन 56 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली. कार्यक्रम प्रसंगी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर, कौशल्य विकास अधिकारी श्री. ठाकरे आदी उपस्थित होते.   या मेळाव्यामध्ये रतन असोसिएट प्रा.लि.अमरावती, पी.पी.एस.एनर्जी, अमरावती, स्टारलाईट फायनांसीयल प्रा.लि. अमरावती, बायज्य

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना; नविन व नुतनीकरण अर्ज ऑनलाईन सादर करण्याचे आवाहन

  अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना;   नविन व नुतनीकरण अर्ज ऑनलाईन सादर करण्याचे आवाहन   अमरावती, दि. 28 (जिमाका): जिल्हातील विविध महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क परिक्षा शुल्क प्रतिपुर्ती व इतर योजनाचे नविन व नुतनीकरण अर्ज ऑनलाईन प्रणालीवर भरण्याची प्रक्रिया कार्यन्वीत झाली आहे. विद्यार्थी व महाविद्यालयांनी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी रिचर्ड यानथन यांनी केले आहे.   आदिवासी विकास विभागाकडून राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क परिक्षा शुल्क प्रतिपुर्ती योजनेचा लाभ दिला जातो. ही योजना प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धारणी अंतर्गत येत असलेल्या सर्व शासकिय निमशासकिय अनुदानित, विनाअनुदानित, कायम विना अनुदानित महाविद्यालयात राबविली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शैक्षणिक सत्र 2023-24 साठी https://mahadbtmahait.gov.in ही प्रणाली नोहेंबर 2023 पासुन कार्यान्

बांधकाम कामगारांना गृहपयोगी वस्तु संचाचे वितरण सुरु; वाटपाच्या ठिकाणी गर्दी न करण्याचे आवाहन

  बांधकाम कामगारांना गृहपयोगी वस्तु संचाचे वितरण सुरु;   वाटपाच्या ठिकाणी गर्दी न करण्याचे आवाहन अमरावती, दि. 28 (जिमाका): नोंदणीकृती सक्रिय (जिवीत) बांधकाम कामगारांना गृहपयोगी वस्तु संच वितरीत करण्यात येत आहे. तसेच गृहपयोगी वस्तु संच वितरीत करण्यासाठी तालुकास्तरावर नियोजन करण्यात आले असून प्रत्येक बांधकाम कामगारांना संच मिळणार आहे. त्यामुळे बांधकाम कामगारांनी वाटपाच्या ठिकाणी गर्दी करु नये, असे आवाहन जिल्हा कार्यकारी अधिकारी तथा सहाय्यक कामगार आयुक्त यांनी केले आहे.   महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई अंतर्गत जिल्ह्यात दि. 21 फेब्रुवारी 2024 पासून नोंदीत सक्रिय (जिवीत) बांधकाम कामगारांना गृहपयोगी वस्तु संच बांधकाम कामगारांचे बायोमॅट्रीक व फोटो घेऊन वाटप करण्यात येत आहे. हा वाटप सुनिल इंटरप्राईजेस, प्लॉट, नं. 23, जुना बायपास, एम. आय. डी. सी. बडनेरा रोड, अमरावती येथे सुरु आहे. गृहपयोगी वस्तु संच कुटुंबात एकाच व्यक्तीला देण्यात येतो. तसेच गृहपयोगी वस्तू संच वाटपाचे तालुका स्तरावरील कार्यालयामार्फत नियोजन सुरू असून कोणताही बांधकाम कामगार वंचित राहणार नाह

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ; विविध प्रशिक्षणासाठी अर्ज मागविले

  साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ; विविध प्रशिक्षणासाठी अर्ज मागविले             अमरावती, दि. 28 (जिमाका): साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, जिल्हा कार्यालय अमरावतीमार्फत मांतग समाज व तत्सम बारा पोट जातीतील उमेदवारांकडून विविध प्रशिक्षणासाठी अर्ज मागविले आहे. इच्छुक पात्र प्रशिक्षणार्थ्यांनी अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक ज.म. गाभणे यांनी केले आहे.   मांतग समाज व तत्सम बारा पोट जातीतील प्रशिक्षणार्थीसाठी सन 2024-25 आर्थिक वर्षाकरिता 267 प्रशिक्षणार्थीचे उदिष्टे प्राप्त झाले आहे. पात्र प्रशिक्षणार्थीनी विहित नमुन्यात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित जिल्हा कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन पोलीस कमिशनर ऑफिस मागे कॅम्प रोड, अमरावती येथे सादर करावा.   प्रशिक्षणासाठी अटीशर्ती याप्रमाणे : प्रशिक्षणार्थी हा मातंग समाजाचा व तत्सम बारा पोट जातीतील असावा. प्रशिक्षणार्थी महराष्ट्रातील रहिवासी असावा. प्रशिक्षणार्थ्यांचे वय 18 ते 50 वयोगटातील असावे. प्रशिक्षणार्थींने यापुर्वी शासनाच्या, महामंडळाच्या को

संत गाडगेबाबा यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

Image
  संत गाडगेबाबा यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन              अमरावती, दि. 23 (जिमाका): थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी सुरज वाघमारे यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.           याप्रसंगी उपजिल्हाधिकारी विजय जाधव, उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, तहसिलदार प्रशांत पडघम, अधीक्षक निलेश खटके तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 00000

महासंस्कृती महोत्सवात नागरिकांनी घेतली मतदानाची प्रतिज्ञा

Image
  महासंस्कृती महोत्सवात नागरिकांनी घेतली मतदानाची प्रतिज्ञा           अमरावती, दि. 23 (जिमाका): पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या वतीने सायन्स स्कोर मैदान येथे महासंस्कृती महोत्सवात विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी दि. 22 फेब्रुवारी रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित ‘सविधान’ हे महानाट्य सादर करण्यात आले. या महानाट्याच्या प्रारंभी उपस्थित सर्व नागरिकांना आगामी लोकसभा निवडणुकीत मतदान करण्यासंदर्भात प्रतिज्ञा देण्यात आली. यावेळी उपस्थित सर्व रसिक, नागरिकांनी लोकशाहीवर निष्ठा ठेऊन देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त नि:पक्षपाती व शातंतापुर्ण वातावरणातील निवडणूकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणूकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू, अशी प्रतिज्ञा घेतली.             प्रतिज्ञेकरिता अप्पर जिल्हाधिकारी सुरज वाघमारे, उपायुक्त श्यामकांत म्हस्के, उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, उपमुख कार्यकारी अधिकारी कैला

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी व्यापक जनजागृती करा -मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता मोहपात्रा

Image
  मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी व्यापक जनजागृती करा -मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता मोहपात्रा   अमरावती, दि.23 (जिमाका): आगामी लोकसभा निवडणूकीमध्ये कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये तसेच मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा व ग्रामस्तरावर व्यापक जनजागृती करावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्विप नोडल अधिकारी संजीता मोहपात्रा यांनी केले.   जिल्ह्यातील मतदार सक्षम बनविणे, मतदानाची टक्केवारी वाढविणे, निवडणूकीबाबत नागरीक जागरुक होऊन अधिक सजग व्हावा व देशातील लोकशाही बळकट होऊन तरुण, महिला, दिव्यांग, ग्रामीण व आदीवाशी क्षेत्रातील लोकांचा सहभाग वाढावा याकरिता जिल्ह्यात स्विप प्लॉन तयार करुन त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरीय स्विप समिती स्थापन करण्यात आलीआहे. या समितीची बैठक आज मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात आज पार पडली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम.एम कुळकर्णी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कैलास घोडके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, समाज कल्याण अधिकारी राजेंद्र जाधवर, नगरपरिषद प

बेवारस दुचाकी वाहनाचे पुराव्यासह दावा दाखल करण्याचे आवाहन

  बेवारस दुचाकी वाहनाचे पुराव्यासह दावा दाखल करण्याचे आवाहन             अमरावती, दि. 23 (जिमाका):  येथील पोलीस स्टेशन, राजापेठ येथे सन 2021 ते 2023 पर्यंत बेवारस वाहने तसेच दिर्घ कालावधीपासून अभिलेखावर नोंद नसलेली 46 प्रकारचे वाहने भंगार अवस्थेत पडलेली आहे. या बेवारस वाहनाचे दुचाकी मालकांनी पुरावा दाखल करण्याचे आवाहन  वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा दाताळकर यांनी केले आहे.               बेवारस वाहनाची उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे तपासणी केली असता वाहन मालकाचे  नाव व पत्ता आढळुन आलेले नाही. बेवारस वाहने कोणाच्या मालकीची असल्यास त्यांनी त्याबाबत कागदपत्रे सादर करावी. वाहन मालकांनी आपल्या वाहनाचा मालकी हक्क न सादर केल्यास वाहनांची 60 दिवसानंतर(2 महिने) लिलाव प्रक्रिया करण्यात येईल. लिलाव प्रक्रियेपुर्वी वाहन मालकांना कागदपत्रांची पुर्तता करूनच वाहने परत दिली जाणार आहे. तरी दुचाकी वाहन मालकांनी वाहनाचे मुळ कागदपत्र व आधारकार्ड सह पोलीस स्टेशन राजापेठ (0721-2672010) येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा दाताळकर मो.क्र. 9923647985 व सुनिल विधाते मो.क्र.

संविधान महानाट्यातून अमरावतीकरांनी अनुभवला घटना निर्मितीचा संघर्ष महासंस्कृती महोत्सवाची संविधान महानाट्याने सांगता

Image
  संविधान महानाट्यातून अमरावतीकरांनी अनुभवला घटना निर्मितीचा संघर्ष महासंस्कृती महोत्सवाची संविधान महानाट्याने सांगता   अमरावती, दि.22 (जिमाका) : महासंस्कृती महोत्सवाच्या शेवटच्या आणि पाचव्या दिवशी 'संविधान- डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या महानाट्यातून घटना निर्मितीचा प्रत्यक्ष संघर्ष अमरावतीकरांनी अनुभवला. स्वातंत्र्य चळवळीपासून ते स्वातंत्र्यप्राप्तीचा आणि त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या संविधान निर्मितीचा सखोल व बोलका जीवनपट महानाट्यातील कलाकारांनी रंगमंचावर जिवंत केला. या महानाट्याने पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाची   सांगता झाली. अमरावतीकरांनी या संविधान महानाट्याला भरभरून प्रतिसाद देत महानाट्य बघण्यासाठी गर्दी केली.             पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र राज्य व जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती यांच्या वतीने 18 फेब्रुवारीपासून सायन्सस्कोर मैदान येथे पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. चार दिवसांच्या विविध सांस्कृतिक, लोककला, संगीतमय कार्यक्रमाच्या आयोजनानंतर   नितीन बनसोड दिग्दर्शित व अमन कबीर लिखित 'संविधान-डॉ. बाब

शासन आपल्या दारी अभियानातंर्गत पंधरवाडा मोहिम; अनाथ बालकांना विविध प्रमाणपत्राचे होणार वाटप

  शासन आपल्या दारी अभियानातंर्गत पंधरवाडा मोहिम; अनाथ बालकांना विविध प्रमाणपत्राचे होणार वाटप   अमरावती, दि.22 (जिमाका): जिल्हा महिला व बाल विकास विभागामार्फत शासन आपल्या दारी अभियानातंर्गत पंधरवाडा मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील अनाथ बालकांना विविध प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर समर्पित कक्ष स्थापन करण्यात आला असून अनाथ बालक व त्यांच्या नातेवाईकांनी आवश्यक कागदपत्रे सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले आहे.   जिल्ह्यातील अनाथ मुलांना आधार कार्ड, रेशन कार्ड, जातीचा दाखला, महाराष्ट्र राज्याचे अधिवास,   राष्ट्रीयत्वाचा दाखला व मतदान कार्ड इत्यादी उपलब्ध करून देण्यासाठी दि.24 फेब्रुवारी ते 5 मार्च 2024 या कालावधीत पंधरवाडा मोहिम राबविण्यात येत आहे. यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर समर्पित कक्ष स्थापन करण्यात आला असून संबंधित तहसिलदार तथा अध्यक्ष तालुका बाल संरक्षण समिती(सर्व) व बाल विकास प्रकल्प अधिकारी(ग्रामीण) तथा सदस्य सचिव तालुका बाल संरक्षण समिती(सर्व)अमरावती यांच्याकडे तर जिल्हास्तरावर जिल्हा महिला व

अधिकृत कंपणीमार्फतच आरोग्य मित्राची नियुक्ती; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

  अधिकृत कंपणीमार्फतच आरोग्य मित्राची नियुक्ती; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन   अमरावती, दि.22 (जिमाका):   महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत अंगीकृत रुग्णालयामध्ये रुग्णांच्या मार्गदर्शनासाठी आरोग्यमित्रांची नियुक्त करण्यात आली आहेत. काही संस्थाव्दारे आरोग्यमित्र नियुक्तीसंदर्भात जाहिराती व्हायरल होत आहे. अशा अफवा व भाम्रक जाहिरातीवर तरुणांनी विश्वास न ठेवण्याचे आवाहन प्रधान मंत्री जन आरोग्य योजनाचे विभागीय व्यवस्थापक सुनील वाठोरे यांनी केले आहे. आरोग्य मित्रांची नियुक्ती अधिकृती संस्थेकडून केली जात असून नियुक्ती संदर्भात कोणतेही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.   राज्य शासनाची महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना 2012 पासून तर केंद्र शासनाची प्रधानमंत्री जन आरोग्य योजना 2018 पासून राज्यात राबविली जात आहे. तसेच 1 एप्रिल 2020 पासून दोन्ही योजना एकत्रित कार्यान्वित करण्यात आली आहे. योजनाची माहिती व मार्गदर्शनासाठी तसेच प्रणालीवर रुग्णांचे कागदपत्रांची नोंदणी करण्यासाठी आरोग्यमित्र नियुक्त केले जातात

महासंस्कृती महोत्सवामध्ये पालकमंत्र्यांची विशेष उपस्थिती:कलाकारांना दिली उत्स्फूर्त दाद; महासंस्कृती महोत्सवात भक्ती आणि कलेचा अनोखा संगम -पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

Image
  महासंस्कृती महोत्सवामध्ये पालकमंत्र्यांची विशेष उपस्थिती:कलाकारांना दिली उत्स्फूर्त दाद;   महासंस्कृती महोत्सवात भक्ती आणि कलेचा अनोखा संगम -पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील   अमरावती, दि. 21 (जिमाका) : देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे. त्यानिमित्ताने भारतीय संस्कृतीचे जतन करून स्थानिक कलाकारांना त्यांची कला सादर करण्याची संधी देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन राज्यभर करण्यात येत आहे. येथील स्थानिक कलाकारांना महोत्सवाच्या माध्यमातून आदिवासी नृत्य, कोरकू, गोंधळ, भारुड, कला, संस्‍कृती सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळाले आहे. भक्ती आणि कलेचा अनोखा संगम महासंस्कृती महोत्सवात बघायला मिळत आहे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्ये मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी आज येथे केले.                सायन्स स्कोर मैदान येथे आयोजित महासंस्कृती महोत्सवाला पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी आज भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पार्श्वगायिका बेला शेंडे यांच्या प्रमुख उपस्थ

शासकीय तंत्रनिकेतन येथील सुरक्षाभिंतीचे पालकमंत्र्याच्या हस्ते भूमिपूजन; नवीन शैक्षणिक धोरणामुळे कुशल मनुष्यबळ निर्मिती होईल -पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

Image
  शासकीय तंत्रनिकेतन येथील सुरक्षाभिंतीचे पालकमंत्र्याच्या हस्ते भूमिपूजन; नवीन शैक्षणिक धोरणामुळे कुशल मनुष्यबळ निर्मिती होईल -पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील           अमरावती, दि. 21 (जिमाका) : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून शिक्षणाच्या विविध संधी निर्माण होवून कौशल्य व व्यावहारिक शिक्षणाला प्राधान्य देण्यात येईल. या शैक्षणिक धोरणामुळे देशात मोठ्या प्रमाणात कुशल मनुष्यबळ निर्माण होऊन स्वयंरोजगारक्षम युवापिढी तयार होईल, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्ये मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी आज येथे केले.   शासकीय तंत्रनिकेतन, अमरावती येथील सुरक्षाभिंतीचे भूमिपूजन पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. आमदार प्रविण पोटे-पाटील, एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष किरण पातुरकर, माजी नगरसेवक तुषार भारतीय, सार्वजनिक बांधकाम विभागाचे   मुख्य अभियंता गिरीश जोशी, रुपा गिरासे, शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. विजय मानकर, विभाग प्रमुख डॉ. एस.पी. बुरघाटे, डॉ. एस.प

पोलीस विभागाच्या बळकटीकरणासाठी भरीव निधी देणार -पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील अठरा चारचाकी व दहा दुचाकी वाहनांचे शहर पोलीस विभागाला हस्तांतरण ; प्रशिक्षण सभागृहाचे लोकार्पण

Image
  पोलीस विभागाच्या बळकटीकरणासाठी भरीव निधी देणार   -पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील   अठरा चारचाकी व दहा दुचाकी वाहनांचे शहर पोलीस विभागाला हस्तांतरण ; प्रशिक्षण सभागृहाचे लोकार्पण               अमरावती, दि. 21 : नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस विभाग अहोरात्र आपले कर्तव्य बजावत असतो. कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पार पाडताना पोलीस विभागाचे सर्व सुविधायुक्त अत्याधुनिकीकरण होणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने पोलीस विभागाच्या बळकटीकरणासाठी नवीन वर्षाच्या अर्थसंकल्पात शहर व ग्रामीण पोलीस विभागाला मागणीनुसार भरीव निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे आश्वासन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्ये मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी आज येथे दिले.   पोलीस कवायत मैदान येथे आयोजित कार्यक्रमात पोलीस आयुक्तालयाला नवीन अठरा चारचाकी व दहा दुचाकी वाहनांचे हस्तांतरण आणि पोलीस आयुक्तालयातील प्रशिक्षण सभागृहाचे लोकार्पण पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे-पाटील