Wednesday, February 28, 2024

बांधकाम कामगारांना गृहपयोगी वस्तु संचाचे वितरण सुरु; वाटपाच्या ठिकाणी गर्दी न करण्याचे आवाहन

 

बांधकाम कामगारांना गृहपयोगी वस्तु संचाचे वितरण सुरु;

 वाटपाच्या ठिकाणी गर्दी न करण्याचे आवाहन

अमरावती, दि. 28 (जिमाका): नोंदणीकृती सक्रिय (जिवीत) बांधकाम कामगारांना गृहपयोगी वस्तु संच वितरीत करण्यात येत आहे. तसेच गृहपयोगी वस्तु संच वितरीत करण्यासाठी तालुकास्तरावर नियोजन करण्यात आले असून प्रत्येक बांधकाम कामगारांना संच मिळणार आहे. त्यामुळे बांधकाम कामगारांनी वाटपाच्या ठिकाणी गर्दी करु नये, असे आवाहन जिल्हा कार्यकारी अधिकारी तथा सहाय्यक कामगार आयुक्त यांनी केले आहे.

 

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई अंतर्गत जिल्ह्यात दि. 21 फेब्रुवारी 2024 पासून नोंदीत सक्रिय (जिवीत) बांधकाम कामगारांना गृहपयोगी वस्तु संच बांधकाम कामगारांचे बायोमॅट्रीक व फोटो घेऊन वाटप करण्यात येत आहे. हा वाटप सुनिल इंटरप्राईजेस, प्लॉट, नं. 23, जुना बायपास, एम. आय. डी. सी. बडनेरा रोड, अमरावती येथे सुरु आहे. गृहपयोगी वस्तु संच कुटुंबात एकाच व्यक्तीला देण्यात येतो. तसेच गृहपयोगी वस्तू संच वाटपाचे तालुका स्तरावरील कार्यालयामार्फत नियोजन सुरू असून कोणताही बांधकाम कामगार वंचित राहणार नाही. तरी वाटपाच्या ठिकाणी गर्दी करू नये, असे पत्राव्दारे कळविण्यात आले आहे.

000000

No comments:

Post a Comment

जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ

  जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ अमरावती, 13 : सर्वांसाठी घरे उपलब्ध होण्यासाठी श...