मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी व्यापक जनजागृती करा
-मुख्य
कार्यकारी अधिकारी संजीता मोहपात्रा
अमरावती, दि.23 (जिमाका): आगामी लोकसभा निवडणूकीमध्ये कोणताही
मतदार मतदानापासून वंचित राहू नये तसेच मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा व
ग्रामस्तरावर व्यापक जनजागृती करावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्विप
नोडल अधिकारी संजीता मोहपात्रा यांनी केले.
जिल्ह्यातील मतदार सक्षम बनविणे, मतदानाची टक्केवारी वाढविणे,
निवडणूकीबाबत नागरीक जागरुक होऊन अधिक सजग व्हावा व देशातील लोकशाही बळकट होऊन तरुण,
महिला, दिव्यांग, ग्रामीण व आदीवाशी क्षेत्रातील लोकांचा सहभाग वाढावा याकरिता जिल्ह्यात
स्विप प्लॉन तयार करुन त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरीय स्विप
समिती स्थापन करण्यात आलीआहे. या समितीची बैठक आज मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या
दालनात आज पार पडली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, उपमुख्य
कार्यकारी अधिकारी एम.एम कुळकर्णी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कैलास घोडके, जिल्हा
आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, समाज कल्याण अधिकारी राजेंद्र जाधवर, नगरपरिषद प्रशासन
अधिकारी सुमेध अलोणे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे आदी तसेच विविध विभागाचे
अधिकारी उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता मोहपात्रा म्हणाल्या की,
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी गावपातळीवर वार्ड सभा घेणे, महाविद्यालयामध्ये निवडणूक
आणि मतदानासाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन, संकल्प पत्रांचे वाटप व गोळा करणे, कलापथक,
लोकनृत्य, जिंगल्स, पोस्टर बॅनर अशा विविध माध्यमाद्वारे जनजागृती करावी. जिल्हास्तरावर
मानवी श्रृखंलाचे आयोजन, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांद्वारे मतदान जनजागृती रॅली, शासकीय
कार्यालय व गर्दीच्या ठिकाणी सेल्फी पाईंट तयार करणे, नैतीक मतदान प्रशिक्षण अशा विविध
उपक्रमातून जनजागृती करावी. यासाठी स्विप समितीच्या विविध विभागांनी सुक्ष्म नियोजन
करुन समन्वयाने काम करावे. तसेच स्थलांतरित कामगार, अर्बन व आदिवासी क्षेत्रात मतदानाची
टक्केवारी वाढविण्यासाठी विशेष मोहिम राबवावी, अशाही सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
0000
.jpg)
.jpg)
.jpg)
No comments:
Post a Comment