शिवाजी महाविद्यालयात 14 फेब्रुवारीला रोजगार मेळावा; तरुणाईला मिळणार रोजगारांची संधी

 शिवाजी महाविद्यालयात 14 फेब्रुवारीला रोजगार मेळावा;

 तरुणाईला मिळणार रोजगारांची संधी

 

            अमरावती, दि. 09 (जिमाका) : कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय अमरावती तर्फे रोजगार मेळाव्याचे आयोजन येत्या 14 फेब्रुवारी, 2024 रोजी श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय अमरावती येथे होणार आहे. मेळाव्यामध्ये गरजु विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविण्यासाठी आवश्यक कागदपत्रासह प्रत्यक्ष उपस्थित राहावे, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालयाचे उपायुक्त द.ल. ठाकरे यांनी केले आहे.

 

 नोकरीच्या शोधात असलेल्या सुशिक्षित बेरोजगार तरुणाईला स्थानिक तसेच इतर विभागातील नामवंत खाजगी कंपन्या, कारखाने आणि उद्योगसमुहांच्या माध्यमातुन चांगल्या रोजगारांच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच भाग म्हणून  निवड जागेवरच मोहीम रोजगार मेळाव्यामध्ये राबविण्यात येत आहे. त्यात विविध उद्योजकांना आवश्यक असणाऱ्या वेगवेगळ्या पात्रतेच्या पदासाठी कंपन्याचे प्रतिनिधि प्रत्यक्ष उपस्थित राहुन उमेदवारांच्या थेट मुलाखती घेतील व मुलाखत देऊन पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना लगेचच नोकरीची संधी मिळेल. या मेळाव्यामध्ये गरजु विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविण्याकरीता http://shorturl.at/kmGMW या लिंकवर जाऊन निशुल्क ऑनलाईन नोंदणी करावी. यापुर्वी नोंदणी केली नसल्यास www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर जावुन सेवायोजन नोंदणी करावी. तसेच रोजगार मेळाव्याच्या दिवशी स्वखर्चाने बायोडाटा, पासपोर्ट फोटो, व आवश्यक कागदपत्रासह प्रत्यक्ष उपस्थित रहावे.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती