मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत धामणगाव रेल्वे येथे माविमच्या स्वयंसहाय्य महिला बचत गटांचे भव्य प्रदर्शन

 

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत धामणगाव रेल्वे येथे

माविमच्या स्वयंसहाय्य महिला बचत गटांचे भव्य प्रदर्शन

              

            अमरावती, दि. 8 (जिमाका): स्वयंसहाय्य महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी दि. 9 ते 12 फेब्रुवारी 2024 दरम्यान नवतेजस्विनी तालुकास्तरीय प्रदर्शनीचे आयोजन आरोही रिसोर्ट, शिवाजी चौक, धामणगाव रेल्वे  येथे करण्यात आले आहे. या विक्री प्रदर्शनीला जास्तीत जास्त नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनिल सोसे यांनी केले.

 

            देशाच्या सर्वांगीण विकासासाठी महिलांचे सशक्तीकरणासाठी त्यांना संघटीत करणे, प्रशिक्षित करणे, स्वावलंबी करणे, महिलांशी संबंधित योजना राबविणाऱ्या सर्व शासकीय यंत्रणाचे प्रतिनिधी एका छताखाली एकत्र येऊन विविध योजनांचे लाभ लाभार्थ्यांना देणे व त्या लाभार्थ्यांचा सन्मान सोहळा आयोजित करणे या उद्देशाने मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान महिला आर्थिक विकास महामंडळमार्फत राज्यामध्ये राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून स्वयंसहाय्य महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी नवतेजस्विनी तालुका स्तरीय  प्रदर्शनीचे आयोजन आयोजन करण्यात येत आहे.

 

प्रदर्शनीमध्ये धामणगाव रेल्वे येथील 40 स्वयंसहाय्य महिला बचत गट तसेच चांदूर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील प्रती तालुका 10 स्वयं सहाय्य बचत गट असे एकूण 60 बचत गटांचे  स्टाँल लावण्यात येत आहे. या प्रदर्शनीमध्ये ग्रामीण भागातील बचत गटांद्वारे  उत्पादित विविध खाद्य पदार्थ, तसेच इतर आकर्षक वस्तू नागरिकांना खरेदी करिता ठेवण्यात येणार आहे. या नवतेजस्विनी भव्य प्रदर्शनी व विक्रीमध्ये 10 स्टाँल शाकाहारी ज्यामध्ये रोडगे, पिठल, ज्वारी,बाजरी भाकरी, बासुंदी, मांडे, पुरणपोळी या विदर्भातील ग्रामीण भागातील मुख्य आकर्षन असलेल्या खाद्यपदार्थांचा समावेश आहे.

 

प्रदर्शनी निमित्ताने  विविध विषयांवर आधारित चर्चा व मार्गदर्शन सत्र, संवाद कार्यशाळा चे आयोजन करण्यात आले आहे. या मध्ये महिलांच्या उद्योग वाढीसाठी मार्गदर्शन सत्र, कौश्यल्य विकास विविध महामंडळे/ शासकीय योजनांची माहिती देणारे कार्यक्रम, बँक कर्जाबाबत माहिती, सकस आहार रेसिपी स्पर्धा, मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाबाबत माहिती इत्यादीच उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

 

             या प्रदर्शनी मध्ये बचत गटांद्वारे उत्पदीत मिक्स मिलेटस कडधान्य, सर्व प्रकारचे मसाले, डिंक लाडू, ज्वारी, बाजरी, ढोकळा, हेल्दी आरोग्या करिता मोरिंगा पावडर, हळद पावडर, मिरची पावडर ,सर्व प्रकारचे लोणचे, खारोडी, जवस चटणी, खडू चक्का तेल, शुद्ध देशी गाईचे तूप, गाईचे शेणाच्या धूप बत्ती, मुंग वडी, व बांबू पासून विविध आकर्षक वस्तू व गृह उपयोगी वस्तू विक्रीकरिता या नवतेजस्विनी भव्य प्रदर्शनी मध्ये मिळणार आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती