Tuesday, February 13, 2024

महाराजस्व अभियानांतर्गत धारणी येथे शिबीराचे आयोजन

 

महाराजस्व अभियानांतर्गत धारणी येथे शिबीराचे आयोजन

 

            अमरावती, दि. 13 (जिमाका): महसूल व वन विभागामार्फत जिल्ह्यात 31 मार्चपर्यंत महाराजस्व अभियान राबवण्यात येत आहे. धारणी तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांच्या सातबारामध्ये बहुतांश ठिकाणी नावाची, आडनावाची नोंद नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्याअनुषंगाने शेतकऱ्यांच्या सातबारामध्ये नावाची, आडनावाची नोंद नसल्यास ती समाविष्ट करण्यासाठी सर्व गावांमध्ये तलाठी आणि मंडळ अधिकारी यांचेमार्फत अभियानातंर्गत विशेष शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या नागरिकांच्या सातबारामध्ये आडनावांची नोंद नाहि किंवा आडनावाच्या जागी कोरकू अशी नोंद आहे, अशा व्यक्तीने तलाठी किंवा तहसिल कार्यालय, धारणी येथे संपर्क करून आपल्या सातबारावरील नाव दुरूस्ती करून घ्यावे, असे आवाहन धारणी तालुक्याचे तहसिलदार यांनी केले आहे.

000000

No comments:

Post a Comment

जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ

  जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ अमरावती, 13 : सर्वांसाठी घरे उपलब्ध होण्यासाठी श...