पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा; प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये 56 उमेदवारांची विविध पदांवर प्राथमिक निवड

 

पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा;

प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये 56 उमेदवारांची विविध पदांवर प्राथमिक निवड

 

अमरावती, दि.28 (जिमाका): जिल्हा कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व मॉडेल करिअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानाने बुधवार दि. 21 फेब्रुवारी रोजी  शासकिय तांत्रीक विद्यालय परिसर, अमरावती येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा प्लेसमेंट ड्राईव्ह संपन्न झाला. या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये 56 उमेदवारांची विविध पदांवर प्राथमिक निवड करण्यात आली असून या रोजगार मेळाव्यामध्ये नोकरी इच्छुक उमेदवारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

 

ऑनलाइन, ऑफलाईन प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये 155 उमेदवारांनी सहभाग घेतला. त्यापैकी 134 उमेदवारांनी प्रत्यक्ष येऊन मुलाखती देऊन 56 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली. कार्यक्रम प्रसंगी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर, कौशल्य विकास अधिकारी श्री. ठाकरे आदी उपस्थित होते.

 

या मेळाव्यामध्ये रतन असोसिएट प्रा.लि.अमरावती, पी.पी.एस.एनर्जी, अमरावती, स्टारलाईट फायनांसीयल प्रा.लि. अमरावती, बायज्युस ट्युशन क्लासेस अमरावती, नवभारत फर्टीलायझर अमरावती, एम.आर.टेक्नोसर्व अमरावती इत्यादी खाजगी आस्थापनेचे प्रतिनिधींनी उपस्थित राहून उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या

 

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी यंग प्रोफेशनल क्रपा अरगुलेवार, यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे संचालन पंकज कचरे यांनी तर आभार प्रदर्शन अश्विनी जयसिंगपुरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्राचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

0000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती