पाच दिवसांचा ‘महासंस्कृती महोत्सव’;महोत्सवाच्या यशस्वितेसाठी सुक्ष्म नियोजन करा- जिल्हाधिकारी सौरभ कटियार

 

पाच दिवसांचा ‘महासंस्कृती महोत्सव;महोत्सवाच्या यशस्वितेसाठी सुक्ष्म नियोजन करा- जिल्हाधिकारी सौरभ कटियार

 





अमरावती, दि. 7 (जिमाका) :  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध प्रांतातील संस्कृतीचे आदानप्रदान, संवर्धन, स्वातंत्र्य लढ्यातील लढवय्यांची माहिती जनसामान्यांपर्यत पोहचविण्याच्या उद्देशाने अमरावती येथे पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन केले जाणार आहे. महोत्सवाच्या यशस्वितेसाठी परिपूर्ण आराखडा व सुक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज येथे दिले.

 

            जिल्हास्तरावर घेण्यात येणाऱ्या महासंस्कृती महोत्सवाच्या आयोजन समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, महापालिकाचे उपायुक्त नरेंद्र वानखडे, सहायक आयुक्त भुषण पुसदकर, सहायक माहिती अधिकारी सतिश बगमारे तसेच अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.

 

जिल्हाधिकारी श्री. कटियार म्हणाले की, महासंस्कृती महोत्सवात महाराष्ट्रातील विविध प्रदेशांतील संस्कृती दर्शविणारे कार्यक्रम तसेच जिल्ह्यातील स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन मिळावा यासाठी त्यांच्या कलागुणानुसार विविध कार्यक्रम आयोजन करण्यात येईल. सोबतच शिवचरित्रावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम, भारूड, गोंधळ, पोवाडा, खडी गंमत, कोळीगीत, लोककलेतील विविध प्रकार, स्थानिक कला प्रकार, नाटक, कवी संमेलन, व्याखानमाला अशा कार्यक्रमांची रेलचेल असेल. या महोत्सवामध्ये शासनाच्या विविध विभागाचे व महिला बचत गटांचे स्टॉलही येथे उपलब्ध असतील.

 

महासंस्कृती महोत्सव दि. 17 ते 21 फेब्रुवारी दरम्यान घेण्याचे नियोजन आहे. महोत्सवाच्या अनुषंगाने विविध कार्यक्रमांबाबत स्वतंत्रपणे उपसमित्या तयार कराव्यात. त्याद्वारे प्रत्येक कार्यक्रमाबाबत सविस्तर चर्चा करून परिपूर्ण आराखडा निश्चित करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिले.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती