भरडधान्य खरेदी नोंदणीसाठी 15 फ्रेबुवारीपर्यंत मुदतवाढ
भरडधान्य खरेदी नोंदणीसाठी 15
फ्रेबुवारीपर्यंत मुदतवाढ
अमरावती, दि. 1 (जिमाका) : आधारभूत किंमत खरेदी योजनेत भरडधान्य ज्वारी व
मका खरेदीसाठी शेतकरी बांधवांची ऑनलाईन नोंदणीसाठी अर्ज मागविले होते. परंतु
नोंदणी पुरेशी झालेली नसल्याने भरडधान्य खरेदीच्या ऑनलाईन नोंदणीकरीता मुदतवाढ
देण्यात आली आहे. तरी पात्र व इच्छूक शेतकऱ्यांनी दि. 15 फ्रेबुवारी पर्यंत ऑनलाईन
नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी, अमरावती यांनी केले आहे.
आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत राज्य शासनामार्फत
भरडधान्य ज्वारी व मका खरेदीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी करण्यासाठी जिल्हा मार्केटिंग
अधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यात अचलपूर, मोर्शी, वरुड, धामणगाव रेल्वे या चार
तालुक्यात खरेदी केंद्रे उघडण्यात आली आहेत.
शेतकरी नोंदणी करतांना या हंगामापासून ज्या शेतकऱ्यांचा
7/12 त्यामध्ये पिकपेऱ्याची नोंद असावी,आधार कार्ड, ॲक्टीव बँक खातेची अचूक माहिती
या सर्व तपसिल दयावा, त्याशिवाय नोंदणी पूर्ण होत नाही. त्या शेतकऱ्याने लाईव्ह फोटो अपलोड करण्यासाठी
स्वत: खरेदी केंद्रावर उपस्थित राहण्याबाबत जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयामार्फत
कळविण्यात आले आहे.
00000
Comments
Post a Comment