साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ; विविध प्रशिक्षणासाठी अर्ज मागविले

 

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ; विविध प्रशिक्षणासाठी अर्ज मागविले

            अमरावती, दि. 28 (जिमाका): साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, जिल्हा कार्यालय अमरावतीमार्फत मांतग समाज व तत्सम बारा पोट जातीतील उमेदवारांकडून विविध प्रशिक्षणासाठी अर्ज मागविले आहे. इच्छुक पात्र प्रशिक्षणार्थ्यांनी अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक ज.म. गाभणे यांनी केले आहे.

 

मांतग समाज व तत्सम बारा पोट जातीतील प्रशिक्षणार्थीसाठी सन 2024-25 आर्थिक वर्षाकरिता 267 प्रशिक्षणार्थीचे उदिष्टे प्राप्त झाले आहे. पात्र प्रशिक्षणार्थीनी विहित नमुन्यात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित जिल्हा कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन पोलीस कमिशनर ऑफिस मागे कॅम्प रोड, अमरावती येथे सादर करावा.

 

प्रशिक्षणासाठी अटीशर्ती याप्रमाणे : प्रशिक्षणार्थी हा मातंग समाजाचा व तत्सम बारा पोट जातीतील असावा. प्रशिक्षणार्थी महराष्ट्रातील रहिवासी असावा. प्रशिक्षणार्थ्यांचे वय 18 ते 50 वयोगटातील असावे. प्रशिक्षणार्थींने यापुर्वी शासनाच्या, महामंडळाच्या कोणत्याही प्रशिक्षण योजनेचा लाभ घेतलेला नसावा.  प्रशिक्षणार्थींचे वार्षिक उत्पन्न 3 लाखापेक्षा जास्त नसावे. एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस योजनेचा लाभ घेता येईल. प्रशिक्षणार्थींने आधार कार्ड जोडलेल्या बँक खात्याच्या तपशिल सादर करावा. दिव्यांग प्रशिक्षणार्थींना 5 टक्के आरक्षणानुसार प्राध्यान देण्यात येईल.

 

आवश्यक कागदपत्रे: जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, राशनकार्ड, आधारकार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्र, आधार लिंक पासबुक प्रत, पासपोर्ट साईज फोटो.

0000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती