Tuesday, February 13, 2024

वरुड तालुक्यात मधकेंद्र योजनेसंदर्भात शुक्रवारी शिबीराचे आयोजन

 

वरुड तालुक्यात मधकेंद्र योजनेसंदर्भात शुक्रवारी शिबीराचे आयोजन

 

अमरावती, दि. 13 (जिमाका): खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मधकेंद्र योजना(मधमाशापालन) संपुर्ण राज्यात कार्यान्वित झालेली आहे. या योजनाची माहिती समाजातील सर्व घटकांना व्हावी यासाठी दि. 16 फेब्रुवारी रोजी पंचायत समिती सभागृह, ता. वरूड येथे शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी केले आहे.

 

मधकेंद्र योजनेअंतर्गत महिला, युवक-युवती, सुशिक्षीत बेरोजगार, आदिवासी जेष्ठ नागरिक, अनुसूचित जाती जमाती, इतर मागासवर्ग, भटक्या विमुक्त जमाती, स्वातंत्र सैनिक,स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट, स्वयसहाय्यता युवा गट शेतकरी, शेतमजूर, भूमिहीन, पारंपारीक कारागीर इत्यादी समाजातील सर्वच घटकांना मध योजनेचा लाभ देण्यात येतो. याशिवाय महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना इत्यादी योजना राबविण्यात येतात. योजनेंतर्गत उद्योजकांना विविध उद्योग उभारण्यासाठी अर्थसहाय्य व अनुदानाचा लाभ देण्यात येतो.

000000

No comments:

Post a Comment

जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ

  जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ अमरावती, 13 : सर्वांसाठी घरे उपलब्ध होण्यासाठी श...