जंतनाशक मोहिमेंतर्गत मुलामुलींना जंतनाशक गोळ्याचे वितरण

 


जंतनाशक मोहिमेंतर्गत मुलामुलींना जंतनाशक गोळ्याचे वितरण

 

            अमरावती, दि. 13 (जिमाका): राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेंतर्गत वयोगट 1 ते 19 वर्षातील मुलामुलींना केंद्रस्तरावर जंतनाशक गोळी दिल्या जात आहे. या मोहिमेचा आज मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता मोहपात्रा यांच्या हस्ते रेवसा प्राथमिक शाळेतील बालकांना जंतनाशक गोळी देऊन प्रारंभ करण्यात आला.

 

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश असोले, जिल्हा माताबाल संगोपन अधिकारी डॉ. सुभाष ढोले, उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. मंगेश मानकर, रेवसा येथील सरपंच, उपसरपंच, तालुका वैद्यकीय अधिकारी, आरोग्य संस्थेचे वैद्यकीय अधिकारी, अंगणवाडी सेविका, शिक्षक आदी उपस्थित होते.

 

          जंतनाशक मोहिम अंतर्गत 1 ते 19 वर्ष वयोगटातील मुलामुलींना आज गोळी दिली गेली नसल्यास त्यांना दि. 20 फेब्रुवारीला देण्यात येईल. नोंदणी न झालेल्या व शाळा बाह्य मुलामुलींना अंगणवाडी स्तरावर गोळ्या दिल्या जाईल. जंतनाशक गोळी पात्र लाभार्थ्यांकरीता सुरक्षित असून ही गोळी चावुन खावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. असोले यांनी केले.

0000

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती