विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात कर्करोग संदर्भात मार्गदर्शन

 







विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात कर्करोग संदर्भात मार्गदर्शन

          अमरावती, दि.20 (जिमाका):  विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय, अमरावती येथे ‘एक झेप वेदनेच्या मुक्ततेसाठी’ मोटीवेशनल कॅन्सर अवेरनेस कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले. यावेळी कर्करोग वैद्यकीय तज्ज्ञाव्दारे कर्करोग संदर्भात रुग्णांना मार्गदर्शन करण्यात आले.

वैद्यकीय अधिक्षक डॉ. श्री. अमोल स. नरोटे, तृप्ती जवादे व कर्करोग किमोथेरपी विभाग प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी डॉ.रोहिणी पाटील, डॉ. अजय कडूकार व केका रॉय यांनी रुग्णालयात उपचारा करिता येणाऱ्या कर्करोग रुग्णांना भयभीत न होता चांगले जीवन व्यतीत करण्यासाठी प्रेरनात्मक मार्गदर्शन केले. याचबरोबर ब्रेस्ट कॅन्सर रुग्णांना मोफत ब्रेस्टप्रोस्टेट देण्यात आले. त्यानंतर आय.एम.ए अध्यक्ष डॉ. अधिन कुमार देशमुख यांनी रुग्णांना मोलाचे मार्गदर्शन केले.

यावेळी नेत्र ओप्थलगिक सोसायटीचे अध्यक्ष डॉ. राजेश जवादे, अनेस्थेसिया सोसायटीचे अध्यक्ष डॉ. राधा सावदेकर अमरावती, आशिष डगवार, डॉ.मोनाली ढोले डॉ. रोहन काळमेघ आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश मेटे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनिता हिवसे, नोडल अधिकारी डॉ. माधव ढोपरे, डॉ उज्जला मोहोड, डॉ.सपना गुप्ता, डॉ श्याम गावंडे, सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार तृप्ती रा. जवादे यांनी केले तर सूत्रसंचालन एन.सी.डी. वैद्यकीय समुपदेशक दिनेश हिवराळे यांनी केले.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती