महाडीबीटी प्रणालीः महाविद्यालय स्तरावरील प्रलंबित अर्ज निकाली काढा- सहाय्यक आयुक्त

 

महाडीबीटी प्रणालीः महाविद्यालय स्तरावरील प्रलंबित अर्ज निकाली काढा- सहाय्यक आयुक्त

          अमरावती, दि. 13 (जिमाका):  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती, प्रवर्गासाठी शिष्यवृत्ती व अन्य योजनांचा लाभ ऑनलाईन महाडीबीटी प्रणालीद्वारे दिला जातो. शैक्षणिक वर्ष 2023-24 मधील महाडीबीटी प्रणालीवर 6 हजार 941 अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित आहेत. अशा महाविद्यालयांनी आपल्यास्तरावर प्रलंबित अर्जातील त्रुटीची पूर्तता करुन तात्काळ निकाली काढावे, असे आवाहन समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त माया केदार यांनी केले आहे.

 

सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गासाठी भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी परीक्षा फी योजना, राजश्री शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतीपूर्ती योजना व व्यावसायिक पाठ्यक्रमांशी संलग्न वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता या योजना राबविण्यात येतात.

 

महाडीबीटी प्रणालीवर सन 2023-24 वर्षातील अनुसूचित जाती प्रवर्गाचे एकूण 6 हजार 941 अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित आहे. तसेच काही महाविद्यालयाचे शिष्यवृत्ती अर्ज मागील वर्षीच्या तुलनेत कमी प्रमाणात नोंदणीकृत झालेले आहे. प्रलंबित व नोंदणी कमी झाल्याबाबत कार्यालयामार्फत वेळोवेळी पत्रव्यवहाराव्दारे आणि ऑनलाईन व्हीडीओ कॉन्फरन्सव्दारे संबंधित महाविद्यालयांना सूचित करण्यात आले आहे. परंतु अद्यापही संबंधित महाविद्यालयांनी अर्ज मंजूरी करीता जिल्हा कार्यालयाकडे सादर केलेले नाही. ही गंभीर बाब असून मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेपासून वंचीत राहू शकतो. त्यामुळे महाविद्यालयांतील प्राचार्यांनी आपल्या महाविद्यालय स्तरावरील प्रलंबित असलेले पात्र अर्ज जिल्हा लॉगिन वर पाठविण्यात यावे. तसेच शिष्यवृत्ती अर्जाचे नोंदणीचे प्रमाण वाढवावे व विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये त्रुटि पूर्ततेसाठी परत केलेले अर्जाची संबंधित महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून त्वरीत त्रुटिपूर्तता करून पात्र अर्ज जिल्हा लॉगिनवर पाठविण्यात यावे.

 

महाविद्यालय स्तरावर प्रलंबित महाविद्यालयाची नावे

          तक्षशिला महाविद्यालय अमरावती, शासकीय विदर्भ ज्ञान महाविद्यालय अमरावती, श्री शिवाजी कला वाणिज्य महाविद्यालय अमरावती, डॉ. राजेंद्र गोडे इन्स्टिट्यूट ऑॅफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च अमरावती, श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अभियांत्रिकी महाविद्यालय अमरावती.

 

मागील वर्षाच्या तुलनेत कमी प्रमाणात नोंदणीकृत महाविद्यालयाची नावे

          जी. डी. पाटील सांगळूकर महाविद्यालय दर्यापूर, शासकीय तंत्रनिकेत अमरावती, पुंडलिक प्रशासकीय महाविद्यालय राठी नगर अमरावती, भारतीय महाविद्यालय अमरावती, तक्षशिला तंत्रनिकेतन महाविद्यालय अमरावती, विद्याभारती महाविद्यालय अमरावती.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती