Monday, February 19, 2024

ऋषिकेश रानडे यांच्या 'गर्जा महाराष्ट्र' ने रंगली संगीत मैफिल पोवाड्यातून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन;महासंस्कृती महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी भरगच्च कार्यक्रम, अमरावतीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 







ऋषिकेश रानडे यांच्या 'गर्जा महाराष्ट्र' ने रंगली संगीत मैफिल

पोवाड्यातून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन;महासंस्कृती महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी भरगच्च कार्यक्रम, अमरावतीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

अमरावती, दि.19 (जिमाका): पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र राज्य व जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती यांच्या वतीने सायन्सकोर मैदान अमरावती येथे आयोजित महासंस्कृती महोत्सवात दुसऱ्या दिवशी मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीचे पार्श्वगायक  ऋषिकेश रानडे यांच्या गर्जा महाराष्ट्र या संगीत मैफिलीने रंगत आणली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्य पोवाडा सादर करून या संगीत मैफिलीने छत्रपती शिवाजी महाराज यांना आदरांजली वाहिली.

 

   महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख कायम राहावी तसेच ग्रामीण लोककला जिवंत ठेवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने 18 ते 22 फेब्रुवारी पर्यंत पाच दिवशीय महासंस्कृती महोत्सवाचे सायन्सकोर मैदान येथे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी सायंकाळी  मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीचे पार्श्वगायक  ऋषिकेश रानडे यांच्या गर्जा महाराष्ट्र या संगीत मैफिल व पोवाड्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाला मनपा आयुक्त देविदास पवार,निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर,  उपायुक्त संजय पवार, उपायुक्त नरेंद्र वानखडे आदींची उपस्थिती होते.

 

कार्यक्रमाच्या सुरवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याला हारार्पण करण्यात आले. तसेच दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमस्थळी फटाक्यांच्या अतिषबाजीत छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले.

             ऋषीकेश रानडे, श्रेया खराबे ,सारंग जोशी यांनी मराठी चित्रपटसृष्टितील प्रसिद्ध गीतांचा नजराणा प्रेक्षकांसमोर सादर केला. अमरावतीकरांनी सुद्धा या संगीत मैफिलीला भरभरून प्रतिसाद दिला.महासंस्कृती महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा अमरावतीकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद या संगीत मैफिलीला लाभला हे विशेष!

 

प्रेक्षकांची फर्माईश अन गायकांचा प्रतिसाद

 

महाराष्ट्र शासनाच्या वतीने अमरावतीकरांसाठी एक  आगळी वेगळी संगीतमय मेजवाणी महासंस्कृती महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित केलेली होती.अलीकडे संगीतमय लाईव्ह शो अमरावतीत होत नसल्याने सोमवारी ऋषिकेश रानडे यांच्या माध्यमातून महासंस्कृती महोत्सवात ही एक पर्वणी अमरावतीकरांना मिळाली. यावेळी प्रेक्षकांनी केलेल्या फर्माईश वर गायकांनी सुद्धा त्याच स्फूर्तीने प्रतिसाद देत हिंदी, मराठी चित्रपट सृष्टीतील गितांसह सुफी, गझल, ग्रामीण भागातील  गीतांचा नजराणा सादर केला.

 

बचत गटांच्या प्रदर्शनीला उत्तम प्रतिसाद

 

महासंस्कृती महोत्सवाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण बळकट करण्यासाठी बचत गटांच्या विविध प्रदर्शनीचे देखील आयोजन कार्यक्रमस्थळी करण्यात आले होते. यावेळी उपस्थित नागरिकांनी प्रदर्शनीला उत्तम प्रतिसाद देत स्वादिष्ट व्यंजनांचा देखील आस्वाद घेतला.

०००००००

No comments:

Post a Comment

जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ

  जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ अमरावती, 13 : सर्वांसाठी घरे उपलब्ध होण्यासाठी श...