महासंस्कृती महोत्सवात स्थानिक कलाकारांना मिळणार व्यासपीठ जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा






 

महासंस्कृती महोत्सवात स्थानिक कलाकारांना मिळणार व्यासपीठ

 

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

 

           अमरावती, दि. 9 (जिमाका): जिल्ह्यातील संस्कृती दर्शनाच्या कार्यक्रमाचे आयोजन पर्यटन, सांस्कृतिक कार्य विभाग व जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळावे, लुप्त होत चाललेल्या, कला, परंपरा तसेच संस्कृतीचे जतन, संवर्धन आदी माहिती जनसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी जिल्ह्यात 18 ते 22 फेब्रुवारी या कालावधीत महासंस्कृती महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. हा महोत्सव शहराच्या मध्यभागी असलेल्या सायन्‍सस्कोर मैदानात आयोजित करण्यात येत आहे. या सांस्कृतिक महोत्सवामध्ये जास्तीत-जास्त स्थानिक कलावंतांनी सहभागी होऊन आपली कला सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.

       जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा, महापालिका आयुक्त देविदास पवार, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, जिल्हा नियोजन अधिकारी अभिजीत म्हस्के, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय आसोले तसेच विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

      श्री. कटियार म्हणाले, सायन्सस्कोर मैदानावर आयोजित महासंस्कृती उत्सव सर्वांसाठी नि:शुल्क राहणार आहे. महोत्सवात मेळघाटातील आदिवासी कोरकू कलाकारांच्या विविध कला तसेच नृत्य यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. यावेळी सांस्कृतिक रंगमंचावरील कार्यक्रम, राज्य तसेच जिल्ह्याची संस्कृती दर्शविणारे कार्यक्रम, लोककलेतील विविध प्रकार जसे पोवाडा, भारुड, भजन, कीर्तन, खडीगंमत यांचे सादरीकरण होणार आहे. स्थानिक तसेच दुर्मिळ व लुप्त होणाऱ्या लोककला व संस्कृती यांचे कार्यक्रम, देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम, विविध क्रीडा स्पर्धा, पथनाट्य, जिल्हा परिषदेच्या शाळा तसेच अंगणवाडीमार्फत विशेष कार्यक्रम, स्वयंसेवी संस्थांमार्फत जिल्हा विशेष कार्यक्रम, जिल्ह्यातील स्थानिक उत्सव कार्यक्रम तसेच जिल्ह्यातील प्रसिध्द व्यक्तींचा सत्कार समारंभ यावेळी करण्यात येईल. विविध शासकीय विभागांचे स्टॉल्स येथे लावण्यात येणार आहे. जिल्ह्यातील स्थानिक कलाकारांना यानिमित्ताने त्यांची कला सादर करण्याची उत्तम संधी मिळत आहे. नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून आस्वाद घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती