ध्वनीची मर्यादा राखून 15 महत्वाच्या दिवशी ध्वनीक्षेपक वापरास सवलत;जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

 

ध्वनीची मर्यादा राखून 15 महत्वाच्या दिवशी ध्वनीक्षेपक वापरास सवलत;जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

 अमरावती, दि. 16 (जिमाका): बंद जागा वगळता इतर ठिकाणी वर्षातून 15 सण, उत्सव व महत्वाच्या दिवशी ध्वनीची मर्यादा राखून ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरण्यास परवानगी देणारी अधिसूचना  जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज जारी केली.  

          श्रोतगृहे, सभागृहे, सामूहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागांखेरीज इतर ठिकाणी ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरण्यासाठी ध्वनीची विहित मर्यादा राखून 15 महत्वाच्या दिवशी सकाळी 6 ते रात्री 12 या वेळेत सवलत जाहीर करण्यात आली आहे.

त्यानुसार यंदा छत्रपती शिवाजी महाराज जयंती (19 फेब्रुवारी), बाबासाहेब आंबेडकर जयंती (14 एप्रिल), श्रीरामनवमी (17 एप्रिल), बौध्द र्पोणिमा (23 मे), श्रीकृष्ण जयंती (26 ऑगस्ट), गणेश  चतुर्दशी (7 सप्टेंबर), अनंत चतुर्दशी/ईद-ए-मिलाद (16 सप्टेंबर), नवरात्र पंचमी (7 ऑक्टोबर), नवरात्र अष्टमी (10ऑक्टोबर), नवरात्र नवमी (11 ऑक्टोबर), दसरा (12 ऑक्टोबर), दिवाळी सण धनत्रयोदशी (29 ऑक्टोबर), दिवाळी सण लक्ष्मीपूजन (1 नोव्हेंबर), नाताळ (25 डिसेंबर), नूतन वर्ष (31 डिसेंबर) या 15 सणांच्या दिवशी ही सवलत जाहीर करण्यात आली आहे.

या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हा परिषद, महानगरपालिका, ध्वनी प्राधिकरण व ध्वनी प्रदुषण नियंत्रण प्राधिकरणाची राहील. ध्वनी प्रदूषण नियम 2000 अंतर्गत स्थापित ध्वनी प्राधिकरणाने त्यांच्याकडे प्राप्त तक्रारींवर मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही करावी, तसेच प्राधिकरणाने निदर्शनास आणून दिलेल्या बाबींवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांनी कार्यवाही करावी, असे आदेश देण्यात आले आहेत.

00000

 

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती