खेळाडू क्रीडागुण सवलत प्रस्ताव दि. 20 मार्चपर्यंत मागविले

 

खेळाडू क्रीडागुण सवलत प्रस्ताव दि. 20 मार्चपर्यंत मागविले

             अमरावती, दि.15 (जिमाका): माध्यमिक उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेस प्रविष्ट होणाऱ्या जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रावीण्य मिळविलेल्या तसेच विभाग, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभाग असलेल्या खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे वाढीव गुण देण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. क्रीडा सवलत वाढीव गुणांचा प्रस्ताव दोन प्रतीत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे दि. 20 मार्च 2024 पर्यंत सादर करावेत, असे जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी कळविले आहे.

क्रीडा गुण सवलत योजनेचा सेवाहमी कायद्दामध्ये समावेश असून ऑनलाईन पोर्टल सिस्टीम प्रक्रीयेमध्ये यापुर्वीच्या शासन निर्णयानुसार राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळांडूना ऑनलाईन अर्ज भरणे शक्य होते. सुधारित शासन निर्णयानुसार क्रीडा गुण सवलतीसाठी जिल्हा व विभागस्तर स्पर्धेचा समावेश झाल्याने ऑनलाईन प्रक्रीयेमध्ये सुधारित दुरूस्ती करण्याबाबत संबंधित यंत्रणेस संचालनाव्दारे कळविण्यात आले आहे. तथापि असे खेळाडू गुणांपासून वंचित राहू नये या करिता जिल्हा व विभागस्तरीय स्पर्धेतील प्राविण्य प्राप्त खेळाडू विद्यार्थ्यांनी ऑफलाईन अर्ज सादर करावे. राज्यस्तर, राष्ट्रीयस्तरावरील खेळांडूचे प्रास्तव ऑनलाईन सादर करावे. तांत्रिक अडचण असल्यास ऑॅफलाईन अर्ज सादर करावा.

            प्रस्ताव दोन प्रतीत सादर करतांना शाळा, महाविद्यालयाचे कव्हरिंग लेटर, परिशिष्ठ अ शालेय स्पर्धा, परिशिष्ठ ई, परिशिष्ठ ब, संघटना स्पर्धा, परिशिष्ठ 10, स्पर्धेचे उच्चतम कामगिरीचे प्रमाणपत्र, हॉल टिकीट इत्यादी कागदपत्रे सादर करावीत. संघटना व शालेय ग्रेस गुण प्रस्ताव वेगवेगळे सादर करावे. दि. 20 डिसेंबर, 2018 च्या शासन निर्णयाव्दारे 6 वी ते 12 वी मध्ये खेळला असला तरी ग्रेस गुणासाठी 10 वी व 12 वी असतांना स्पर्धेत सहभागाची अट आहे. 10 वी असतांना खेळांडूने सवलत घेतली असल्यास 12 वीमध्ये सवलत घेण्यासाठी 11 वी आणि 12 वीमध्ये खेळात सहभाग अथवा प्राविण्य मिळविणे आवश्यक राहिल. प्रमाणपत्राच्यावर यापुर्वी सवलत, लाभ घेतल्यास जे खेळाडू थेट राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाले असतील तर ते खेळाडू क्रीडागुणास पात्र असणार नाही. प्रति खेळाडू 25 रुपये प्रमाणे बँक ऑॅफ इंडिया येथे विभागीय परिक्षा मंडळ यांचे चलान प्रस्तावासोबत देणे आवश्यक आहे. एकविध खेळाची राज्य संघटनाची यादी संचालनालयाव्दारे प्राप्त झालेली नाही. तरी प्रस्ताव स्विकारण्यात येत आहे. क्रीडागुण सवलतीस प्राप्त असलेल्या एकविध खेळाच्या राज्य संघटनेची यादी संचालनालयाकडून तसेच एकविध जिल्हा, राज्य संघटनेमार्फत विहित कालावधीत स्पर्धेचा विस्तृत अहवाल प्राप्त झाल्यास शिफारस करण्यात येईल.

 

क्रीडा सवलत गुण मिळणेबाबत पात्र खेळ : आर्चरी, बॅडमिंटन, बास्केबॉल, सायकलिंग, फुटबॉल, हॅन्डबॉल, ज्युदो, लॉनटेनिस, टेबल टेनिस, जलतरण, कबड्डी बेसबॉल, कराटे, वुशू, सुब्रतो मखर्जी कप फुटबॉल, सेपक टकरा, सॉफ टेनिस, मल्लखांब, बॉल बॅडमिटन, बुध्दीबळ, थ्रोंबॉल, योगासन, सिकई मार्शल आर्ट, डॉजबॉल,टेनिक्वॉईट, ॲथलेटिक्स, वेटलिफ्टींग, बॉक्सींग, तलवारबाजी, जिम्नॅस्टिक्स, हॉकी, व्हॉलीबॉल, रायफल शुटींग, तायक्वांदो, कुस्ती सॉफ्टबॉल, नेटबॉल, स्क्वॅश, नेहरू कप हॉकी, रग्बी, मॉडर्न पेन्टँथलॉन, खो-खो, कॅरम, क्रिकेट, रोलर स्केटिंग, हॉकी, किक बॉक्सींग, रोलबॉल, शुटींगबॉल, आट्या पाट्या या खेळाकरिता सवलत गुण देण्यात येणार आहे.

 

अपूर्ण प्रस्ताव सादर केल्यास कुठलाही पत्र व्यवहार केला जाणार नाही. प्रमाणपत्रावर यापुर्वी सवलत घेतल्यास परत गुणांचा लाभ देण्यात येणार नाही. यानुसार शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू विद्यार्थ्यांचे क्रीडा सवलत गुणांचे प्रस्ताव दि. 20 मार्चपर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत. विहित मुदतीनंतरचे प्रस्ताव स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी. तसेच एकविध खेळाच्या अधिकृत संघटनांनी जिल्हास्तर, विभागस्तर, राज्यस्तर स्पर्धेचे संपुर्ण विस्तृत अहवाल या कार्यालयात सादर करावे. अहवाल सादर न झाल्यास व त्यावाचुन खेळाडू वंचित राहील्यास हे कार्यालय जबाबदार राहणार नाही. यांची नोंद संबंधितांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.

00000

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती